शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 10 जागांवरच मानावं लागलं समाधान; कुठे कोण जिंकलं? बघा संपूर्ण लिस्ट
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठी उलथापालथ; शेवटच्या फेरीत काँग्रेसने मारली बाजी
4
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: लाडक्या बहिणींची नारीशक्ती, भीमशक्तीमुळे महायुतीचा ऐतिहासिक महाविजय: रामदास आठवले
5
महाराष्ट्रात भाजपने 148 पैकी 132 जागा जिंकल्याच कशा? काँग्रेसने उपस्थित केला प्रश्न...
6
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “विधानसभा पराभवावर चिंतन करु, जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेस काम करत राहील”: नाना पटोले
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
9
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
10
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
11
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
12
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
13
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
14
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
15
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
16
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
17
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
18
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
19
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
20
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...

जनसंघर्ष यात्रेद्वारे काँग्रेस करणार एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2019 12:48 AM

तीन राज्यांमधील विजयानंतर काँग्रेस पक्षामध्ये नवचैतन्य संचारले आहे. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पूर्व विदर्भात कॉंग्रेसकडून जनसंघर्ष यात्रा काढण्यात येणार आहे. ही यात्रा १० जानेवारी रोजी नागपुरातून निघणार आहे. चार दिवस चालणाऱ्या यात्रेदरम्यान पूर्व विदर्भातील महत्त्वाच्या लोकसभा व विधानसभा क्षेत्रात काँग्रेस नेते जाणार आहेत. समारोपप्रसंगी मध्य प्रदेश, राजस्थान व छत्तीसगड या राज्यांचे मुख्यमंत्री येण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

ठळक मुद्दे१० जानेवारीपासून सुरुवात : समारोपाला तीन राज्यांचे मुख्यमंत्री येण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : तीन राज्यांमधील विजयानंतर काँग्रेस पक्षामध्ये नवचैतन्य संचारले आहे. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पूर्व विदर्भात कॉंग्रेसकडून जनसंघर्ष यात्रा काढण्यात येणार आहे. ही यात्रा १० जानेवारी रोजी नागपुरातून निघणार आहे. चार दिवस चालणाऱ्या यात्रेदरम्यान पूर्व विदर्भातील महत्त्वाच्या लोकसभा व विधानसभा क्षेत्रात काँग्रेस नेते जाणार आहेत. समारोपप्रसंगी मध्य प्रदेश, राजस्थान व छत्तीसगड या राज्यांचे मुख्यमंत्री येण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.नियोजित वेळापत्रकानुसार ८ जानेवारी रोजी जनसंघर्ष यात्रा निघणार होती, मात्र यात्रा दोन दिवस पुढे ढकलण्यात आली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हे या यात्रेत सहभागी होणार आहेत. १० जानेवारीला दीक्षाभूमी, ताजबाग, गणेश टेकडी या ठिकाणी ही यात्रा जाणार आहे. त्यानंतर कामठी, रामटेक येथे पोहोचेल. तुमसर, तिरोडा, गोंदिया, सडकअर्जुनी, साकोली, भंडारा, चिमूर, वरोरा, चंद्रपूर, गडचिरोली, ब्रम्हपुरी व परत नागपूर, असा सभेचा मार्ग असेल. प्रत्येक मुख्य ठिकाणी प्रदेशाध्यक्षांची सभा होणार आहे. एकूण १० ठिकाणी सभेचे नियोजन करण्यात आले आहे. १३ जानेवारीला या यात्रेचा समारोप होणार आहे. मतदारसंघात जाहीर सभा होणार असल्याचे ठाकरे यांनी सांगितले. राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने विजय मिळविला असून, या तीनही राज्यांतील मुख्यमंत्री समारोपप्रसंगी यावेत, असे पक्षाचे प्रयत्न आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, समारोपाची विशेष सभा २० जानेवारी रोजी आयोजित होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसagitationआंदोलन