निवडणुका जिंकण्यासाठी काँग्रेस वापरणार सोशल मीडियाचे अस्त्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2022 10:06 PM2022-05-28T22:06:48+5:302022-05-28T22:07:15+5:30

Nagpur News स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आगामी निवडणुकीत सोशल मीडियाचा प्रभारी वापर करू, असे काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी जाहीर केले.

Congress will use social media to win elections | निवडणुका जिंकण्यासाठी काँग्रेस वापरणार सोशल मीडियाचे अस्त्र

निवडणुका जिंकण्यासाठी काँग्रेस वापरणार सोशल मीडियाचे अस्त्र

Next
ठळक मुद्देकाँग्रेसचे राज्यस्तरीय नवसंकल्प शिबिर

 

नागपूर : कोणत्याही विचारांच्या प्रचार-प्रसारासाठी सोशल मीडिया हे एक प्रभावी व सशक्त व्यासपीठ आहे. मात्र, हल्ली या माध्यमाचा गैरवापर करून समाज तोडण्याचे कृत्य भाजपद्वारे सुरू आहे. आम्ही मात्र सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेसमोर वास्तव मांडू. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आगामी निवडणुकीत सोशल मीडियाचा प्रभारी वापर करू, असे काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी जाहीर केले.

प्रदेश काँग्रेसच्या सोशल मीडिया विभागाच्या वतीने वनामती सभागृहात आयोजित राज्यस्तरीय नवसंकल्प शिबिरात ते बोलत होते. यावेळी माजी खा. विलास मुत्तेमवार, अ. भा. काँग्रेस कमिटी सोशल मीडिया प्रमुख रोहन गुप्ता, काँग्रेस प्रवक्त्या अलका लांबा, सोशल मीडिया तज्ज्ञ अमेय तिरोडकर, सोशल मीडिया प्रमुख विशाल मुत्तेमवार, आ. विकास ठाकरे, आ. अभिजित वंजारी, प्रवक्ते अतुल लोंढे उपस्थित होते.

यावेळी पटोले म्हणाले, देशाची एकात्मता भंग करण्याचा प्रयत्न भाजप करीत आहे. नागरिकांची दिशाभूल करायची व आपसांत भांडणे लावून सत्ता उपभोगायची हाच त्यांचा अजेंडा आहे; पण आता भाजपच्या अपप्रचाराला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी काँग्रेसचा सोशल मीडिया विभाग सज्ज झाला आहे. आम्ही सर्वांना सोबत घेऊन ही लढाई लढणार आहोत, असेही त्यांनी सांगितले. विशाल मुत्तेमवार यांनी नवसंकल्प शिबिराच्या आयोजनाचा उद्देश स्पष्ट केला. सोशल मीडिया विभागाच्या माध्यमातून काँग्रेसची विचारधारा, तत्त्व सर्व घटकांपर्यंत पोहोचविण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. शिबिराला राज्यभरातील सोशल मीडिया विभागाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रविवारी राष्ट्रीय नवसंकल्प शिबिर

- रविवारी वाडी - हिंगणा रोडवरील सॉलीटिअर बँकेट हॉलमध्ये राष्ट्रीय नवसंकल्प शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत, वरिष्ठ काँग्रेस नेते जयराम रमेश, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, काँग्रेस प्रवक्त्या अलका लांबा, सल्लागार सचिन राव, प्रवक्ते पवन खेरा तसेच काँग्रेसचे वरिष्ठ पदाधिकारी मार्गदर्शन करणार आहेत.

Web Title: Congress will use social media to win elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.