शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
3
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
4
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा
5
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
6
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
7
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
8
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
9
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
10
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
11
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
12
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
13
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
14
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
15
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
16
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
17
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
18
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
19
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
20
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा

विधानसभेसाठी काँग्रेस लागणार कामाला : लोकसभेच्या पराभवावर गुरुवारी मंथन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2019 11:08 PM

लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवातून सावरत आता शहर काँग्रेसने आगामी विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी तयारी सुरू केली आहे. शहर कार्यकारिणीची बैठक अध्यक्ष विकास ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी देवडिया काँग्रेस भवनात होत असून तीत लोकसभेच्या पराभवावर मंथन तर विधानसभेच्या तयारीवर चर्चा केली जाणार आहे.

ठळक मुद्देबूथनिहाय आढावा घेणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवातून सावरत आता शहर काँग्रेसने आगामी विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी तयारी सुरू केली आहे. शहर कार्यकारिणीची बैठक अध्यक्ष विकास ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी देवडिया काँग्रेस भवनात होत असून तीत लोकसभेच्या पराभवावर मंथन तर विधानसभेच्या तयारीवर चर्चा केली जाणार आहे.लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला असला तरी गेल्या निवडणुकीच्या तुलनेत १ लाख ४० हजार मते वाढली आहेत. देशभरात झालेले काँग्रेसचे पानीपत पाहता नागपुरातील पराभव तुलनेत तेवढा मोठा नाही, असा दावा काँग्रेसजनांकडून केला जात आहे. निवडणुकीनंतर काँग्रेसची पहिल्यांदाच बैठक होत असून तीत लोकसभेतील मतदानाचा बूथनिहाय आढावा घेतला जाणार आहे. लोकसभेत शहरातील मोजकेच बूथ वगळता उर्वरित सर्वच बूथवर भाजपला मोठ्या प्रमाणात आघाडी मिळाली. काही बूथवर तर काँग्रेसला अपेक्षेच्या ५० टक्केही मते मिळाली नाहीत. यामुळे नेत्यांची चिंता वाढली आहे. बूथवरील मतदानाची आकडेवारी व अशी परिस्थिती का ओढवली याचे अहवाल ब्लॉक अध्यक्षांकडून मागविण्यात आले आहेत.विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने आता बूथनिहाय आढावा घेऊन संघटन अधिक मजबूत करण्यावर काँग्रेसतर्फे भर दिला जाणार आहे. विशेष म्हणजे बूथ प्रमुख बदलण्याची शक्यता आहे. तसेच पक्षाचे विविध सेल व अध्यक्षांची पुनर्बांधणी करणे, रिक्त जागांवर पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करणे, सदस्य नोंदणी अभियान राबविण्यावर चर्चा केली जाणार आहे.बूथ मॅनेजमेंटवर भरशहर काँग्रेसतर्फे शहरातील सर्व बूथचे ए,बी व सी असे वर्गीकरण करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात यातील बी व सी गटातील बूथवर जास्तीत जास्त लक्ष केंद्रित केले जाईल. त्यासाठी बूथ प्रमुख व सदस्यांवर विशेष जबाबदारी सोपविण्यात येईल. निष्क्रिय बूथ अध्यक्षांना बदलण्याची प्रक्रियादेखील सुरू करण्यात आली आहे. यावर बैठकीत सविस्तर चर्चा होणार आहे.

 

टॅग्स :congressकाँग्रेसAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019