शहरं
Join us  
Trending Stories
1
"दिवट्या आमदार...", पोर्शे प्रकरणावरून सुनील टिंगरे शरद पवारांच्या 'रडार'वर!
2
"मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामागील सूत्रधार..."; नरेंद्र पाटलांचा गंभीर आरोप
3
मोबाईलमधले फोटो, टोकाचं भांडण, रक्तरंजित प्रेम; महालक्ष्मीच्या हत्येच्या रात्री नेमकं काय घडलं?
4
NCP च्या जागेवर दावा; मुलाच्या उमेदवारीसाठी माजी आमदाराची उद्धव ठाकरेंकडे मागणी
5
एका घरात पाच मृतदेह! चार मुलींसह वडिलांनी संपवलं आयुष्य, कारण...
6
गौतम अदानींना ज्यांनी तारलं, त्यांनाच अमेरिकेत बसला लाखो डॉलर्सचा दंड; कारण काय?
7
IND vs BAN : जा रे जारे पावसा! दुसऱ्या दिवसाचा बहुतांश खेळ पाहण्यात नव्हे पाण्यात जाणार?
8
त्रिग्रही बुधादित्य राजयोग: ७ राशींना अनुकूल, सरकारी कामात लाभ; उत्पन्नात वाढ, मनासारखा काळ!
9
मुंबईत ठाकरेंच्या युवासेनेचा जल्लोष; सिनेट निवडणुकीत पुन्हा एकदा १० पैकी १० विजयी
10
विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात घ्या; शिंदेसेना, अजित पवार गटाची मागणी
11
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य: विविध पातळ्यांवर यश, किर्ती व लाभासह धन प्राप्ती होईल
12
'ती माझी मुलगी आहे...', IIFA सोहळ्यावेळी आराध्याबद्दल विचारताच ऐश्वर्याचं पत्रकाराला थेट उत्तर
13
आज शेअर बाजार खुला राहणार, NSE वर होणार विशेष ट्रेडिंग सेशन; कारण काय?
14
Zomatoच्या सह-संस्थापक आकृती चोप्रा यांचा राजीनामा; १३ वर्षाचा प्रवास थांबला, पाहा त्यांची Networth किती?
15
Bigg Boss Marathi Season 5: राखी सावंतची घरात एन्ट्री! 'ड्रामा क्वीन'ला पाहून निक्कीची झाली अशी अवस्था; प्रोमो व्हायरल
16
उद्धव युवासेनेचा अखेर सिनेटवर झेंडा; विद्यापीठाच्या निवडणुकीत अभाविपचा उडाला धुव्वा
17
अग्रलेख : फडणवीसांचा कबुलीनामा; अजित पवारांना सोबत घेतल्यानंतर ‘परिवार’ फारच अस्वस्थ
18
मतदारांची गैरसोय झाल्यास अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई; केंद्रीय निवडणूक आयोगाचा इशारा
19
बहिणींच्या पैशांवर नजर ठेवाल तर खबरदार...; फडणवीस यांचा विरोधकांना इशारा
20
मध्य रेल्वेवर उद्या ५ तासांचा मेगाब्लॉक; तिन्हा मार्गांवरील लोकल धावणार उशिरा

‘सेवाग्राम’साठी काँग्रेसचे मंथन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2018 11:00 AM

७६ वर्षांनंतर पहिल्यांदाच सेवाग्राम येथे अखिल भारतीय काँग्रेस कार्यकारिणीची बैठक होत असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी रविवारी आढावा बैठकीत दिली.

ठळक मुद्देअशोक चव्हाण यांनी घेतला तयारीचा आढावाराहुल गांधींच्या पदयात्रेत हजारो कार्यकर्ते सहभागी होणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : काँग्रेसजन महात्मा गांधी यांच्या विचारसरणीला बांधलेले आहते. त्यामुळे निघणारा शांती मार्चकरिता शांततेने मार्च व्हावा. महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त सर्व काँग्रेसजन एकत्रित येणार आहेत. गांधी जयंती ऐतिहासिक दिवस असून, ७६ वर्षांनंतर पहिल्यांदाच सेवाग्राम येथे अखिल भारतीय काँग्रेस कार्यकारिणीची बैठक होत असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी रविवारी आढावा बैठकीत दिली.२ आॅक्टोबरला महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त सेवाग्राम येथे आयोजित कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर देवडिया काँग्रेस भवन येथे अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. अ.भा. काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मुकुल वासनिक, माजी खासदार विलास मुत्तेमवार, अ.भा. किसान काँग्रेसचे अध्यक्ष माजी खासदार नाना पटोले, शहर काँग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे, ग्रामीण काँग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र मुळक, ज्येष्ठ नेते बाबुराव तिडके, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश भोयर, माजी आमदार सुभाष धोटे, प्रदेश चिटणीस उमाकांत अग्निहोत्री, अतुल कोटेचा, अ‍ॅड. अभिजित वंजारी, विशाल मुत्तेमवार, पूर्व अध्यक्ष शेख हुसेन, मुजीब पठाण, शकूर नागाणी, यशवंत बाजीराव, डॉ. अविनाश वारजूरकर, बंडू सावरबांधे, भंडारा शहर काँग्रेसचे अध्यक्ष प्रेम सागर गणवीर, अमरावती शहर काँग्रेसचे अध्यक्ष किशोर बोरकर, विरोधी पक्षनेता बबलू शेखावत, गिरीश पांडव, शहर काँग्रेस कमिटीचे महासचिव डॉ. गजराज हटेवार, उपाध्यक्ष प्रा. दिनेश बानाबाकोडे, बंडोपंत टेंभुर्णे, सरचिटणीस जयंत लुटे, रमण पैगवार, प्रवक्ता व सरचिटणीस संदेश सिंगलकर, महिला काँग्रेस अध्यक्ष प्रज्ञा बडवाईक, महिला सचिव रिचा जैन, कुंदा राऊ त, तक्षशीला वागधरे प्रामुख्याने उपस्थित होते.यूपीएच्या अध्यक्ष सोनिया गांधी, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे सेवाग्रामला जाण्यासाठी नागपूर विमानतळावर आगमन होईल. येथून ते सेवाग्रामला जातील. बापुकुटी येथे संपूर्ण अ.भा. काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी प्रार्थना करतील. कार्यक्रमात महाराष्ट्रातील हजारो कार्यकर्ते सहभागी होतील. हा कार्यक्रम शांततेत व्हावा, असे अशोक चव्हाण म्हणाले. राहुल गांधी यांची पदयात्रा महात्मा गांधी यांच्या प्रतिमेपासून दुपारी १ ते १.३० च्या सुमारास सुरू होऊन दुपारी ३ ते ३.३० च्या सुमारास सर्कस मैदानात जाईल. येथे जाहीर सभा होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.व्हेरायटी चौकात आदरांजली कार्यक्रम२ आॅक्टोबरला गांधी जयंतीनिमित्त सर्वप्रथम सकाळी ८ वाजता व्हेरायटी चौक येथे गांधीजींना आदरांजली वाहण्याचा कार्यक्रम होईल. त्यानंतर सकाळी १० वाजता नागपुरातील सर्व पदाधिकारी, कार्यक र्ते सेवाग्रामसाठी रवाना होतील, अशी माहिती विकास ठाकरे यांनी दिली. ब्लॉक अध्यक्ष, नगरसेवक, पराभूत उमेदवार, विविध सेलचे अध्यक्ष, महिला काँग्रेस, युवक काँग्रेस शहर पदाधिकारी यांनी आपापल्या ब्लॉकमधून ३०० पेक्षा जास्त कार्यकर्त्यांना सोबत घेऊन मोठ्या संख्येने सेवाग्राम येथे रॅलीमध्ये समावेश करण्यासाठी निर्देश दिले. नागपूर शहर व ग्रामीण काँग्रेस कमिटीचे १० ते १५ हजार कार्यकर्ते सामील होतील, असे बैठकीत सांगण्यात आले.

मल्लिकार्जुन खरगे नागपुरात दाखलकाँग्रेसचे लोकसभेतील गटनेते व प्रदेश काँग्रेसचे प्रभारी खा. मल्लिकार्जुन खरगे रविवारी नागपुरात दाखल झाले. त्यांनी वर्धेच्या सभेसाठी नागपूर शहर व जिल्ह्यातून किती कार्यकर्ते जाणार आहेत याबाबतच्या तयारीचा आढावा घेतला. उपस्थित नेते व कार्यकर्त्यांना आवश्यक सूचना दिल्या. यावेळी विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते शरद रणपिसे, राज्याचे सहप्रभारी आशिष दुआ, शहर काँग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. मल्लिकार्जुन खरगे सोमवारी सकाळच्या सुमारास सेवाग्रामला जाणार असून कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेणार आहेत.

जिल्हा अध्यक्षांची बैठकप्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी विदर्भातील सर्व जिल्हा काँग्रेस अध्यक्षांची स्वतंत्र आढावा बैठक काँगे्रस कमिटीच्या मुख्य कार्यालयात घेतली. यावेळी जिल्हानिहाय तयारीचा आढावा घेण्यात आला.

टॅग्स :congressकाँग्रेस