शहरं
Join us  
Trending Stories
1
"शाहू महाराजांना फोन आला अन् मधुरिमाराजेंनी..."; शेवटच्या १० मिनिटांत घडलेल्या राजकीय भूकंपाचे कारण समोर
2
त्यांनी बाळासाहेबांचे विचार आणि धनुष्यबाण गहाण ठेवले होते; शिंदेंसाठी CM शिंदेंची बॅटिंग, ठाकरेंवर हल्ला
3
राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेला संजय शिरसाट यांचं प्रत्युत्तर; स्पष्टच बोलले
4
भाजपाला मोठा धक्का, अपक्ष निवडणूक लढवत असलेल्या माजी महिला खासदाराचा पक्षाला राम राम
5
“कोल्हापूर उत्तर आम्ही ७ वेळा जिंकली, ७ दिवस भांडलो पण काँग्रेसने जागा सोडली नाही”: संजय राऊत
6
नवाब मलिकांवरून अजितदादा गटाने भाजपा-शिंदे गटाला फटकारलं; "कुणाला काही वाटू दे..."
7
राजेश लाटकर घेणार उद्धव ठाकरेंची भेट! कोल्हापुरात राजकीय घडामोडींना वेग
8
काँग्रेसच्या बालेकिल्ल्यातून यंदा काँग्रेसचेच चिन्ह झाले 'हद्दपार'
9
AUS vs IND : भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा! टीम इंडियासमोर मोठे आव्हान, शिखर धवननं दिला धीर
10
Sameer Bhujbal : दहा अपक्ष उमेदवारांनी माघार घेत समीर भुजबळ यांना दिला पाठिंबा
11
विराट कोहलीसाठी सिक्सर किंग युवीनं शेअर केली खास पोस्ट
12
महाले यांची माघार; भुजबळ, आहेर, गावित ठाम! दिंडोरीत नरहरी झिरवाळ यांना दिलासा
13
"मी यापुढे मराठी बोलणार नाही..."; रेल्वे टीसीचा मुजोरपणा, मराठी माणसाला धमकावलं
14
चातुर्मासाची सांगता: कार्तिकी एकादशी कधी आहे? विष्णुप्रबोधोत्सव महात्म्य अन् मान्यता
15
बारामतीचं राजकीय तापमान वाढणार: अजित पवारांना शह देण्यासाठी शरद पवार मैदानात; आज ६ ठिकाणी सभा!
16
Niva Bupa IPO : 'या' दिग्गज हेल्थ इन्शूरन्स कंपनीचा IPO येणार; किंमत किती, कधीपासून करता येणार अर्ज?
17
...यासाठी बाळासाहेब ठाकरे राज ठाकरेंना माफ करणार नाहीत; संजय राऊत भडकले
18
आजपासून महायुतीच्या प्रचाराचा प्रारंभ; पहिली सभा कोल्हापुरात, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार!
19
शुक्राचा गुरु राशीत प्रवेश: १० राशींवर धनलक्ष्मी कृपा, अचानक धनलाभाचे योग; शुभ-लाभाचा काळ!
20
Devayani Farande : मध्य नाशिक मतदारसंघात बंडखोरांच्या माघारीचा भाजपाच्या देवयानी फरांदेंना फायदा

राज्यातील राखीव मतदारसंघावर काँग्रेसचा फोकस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2018 1:41 PM

एकेकाळी राज्यातील विधानसभेचे राखीव मतदारसंघ हे काँग्रेसचा गड समजले जात होते. राखीव मतदारसंघांतील विजयामुळे काँग्रेसचा आकडा फुगत होता. मात्र, गेल्या निवडणुकीत राखीव मतदारसंघांमध्ये सुरुंग लावण्यात भाजपाला यश आले. त्यामुळे काँग्रेस घसरली व भाजपा वाढली. आता आपले ‘राखीव’ बालेकिल्ले परत मिळविण्यासाठी काँग्रेसने रणनीती आखली आहे. या मतदारसंघांचा अभ्यास करून वास्तविक परिस्थिती जाणून घेण्यासाठी प्रदेश काँग्रेसने विभागनिहाय उपसमित्या नेमल्या आहेत.

ठळक मुद्दे भेटी देऊन आढाव्यासाठी नेमल्या उपसमित्या : दलित नेते, अधिकाऱ्यांना पक्षात आणणार

कमलेश वानखेडे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एकेकाळी राज्यातील विधानसभेचे राखीव मतदारसंघ हे काँग्रेसचा गड समजले जात होते. राखीव मतदारसंघांतील विजयामुळे काँग्रेसचा आकडा फुगत होता. मात्र, गेल्या निवडणुकीत राखीव मतदारसंघांमध्ये सुरुंग लावण्यात भाजपाला यश आले. त्यामुळे काँग्रेस घसरली व भाजपा वाढली. आता आपले ‘राखीव’ बालेकिल्ले परत मिळविण्यासाठी काँग्रेसने रणनीती आखली आहे. या मतदारसंघांचा अभ्यास करून वास्तविक परिस्थिती जाणून घेण्यासाठी प्रदेश काँग्रेसने विभागनिहाय उपसमित्या नेमल्या आहेत.काँग्रेसने पक्षापासून दुरावलेल्या दलित नेते व मतदारांना जवळ करण्याचे प्रयत्न चालविले आहेत. सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचाºयांनाही पक्षात येण्यासाठी विनंती केली जात आहे. याचाच एक भाग म्हणून आता राखीव मतदारसंघात वातावरण निर्मिती करण्याची जबाबदारी ही उपसमिती पार पाडणार आहे. समिती जबाबदारी दिलेल्या विधानसभा मतदारसंघात जाऊन तेथील प्रमुख नेते व कार्यकर्त्यांच्या भेटी घेईल. मतदारसंघातील प्रतिष्ठित व्यक्ती, डॉक्टर, वकील, सीए, इंजिनिअर, उद्योगपती, व्यापारी यांच्या भेटी घेऊन त्यांच्याशी काँग्रेसच्या भूमिकेबाबत चर्चा करील. मतदारसंघातील धर्मगुरू, अनुसूचित जाती समाजातील प्रमुख नेते, लोकप्रतिनिधी यांच्या भेटी घेऊन काँग्रेसतर्फे अनुसूचित समाजासाठी केलेल्या व करण्यात येत असलेल्या कामांची माहिती देईल. समाजाचे मेळावे व शिबिर आयोजित केले जातील. मतदारसंघातील इतर समाजातील नेत्यांची माहिती गोळा केली जाईल. संबंधित मतदारसंघातील प्रभावी वक्त्यांची नावे गोळा करून ती प्रदेश काँग्रेसकडे कळविली जातील. याशिवाय अनुसूचित जाती समाजाचे स्थानिक व राज्य पातळीवरील प्रश्न समजून घेत त्याची माहिती प्रदेश काँग्रेसकडे पाठविली जाईल.राजकीय समीकरणांचा देणार अहवालही उपसमिती राखीव मतदारसंघांचा दौरा करेल. तेथील प्रमुख नेत्यांशी चर्चा करेल. दलित समाजातील, संघटनेतील प्रमुख सामाजिक कार्यकर्ते, नेते यांची भेट घेईल. निवडणुकीच्या दृष्टीने मतदारसंघात काय करणे आवश्यक आहे, याची माहिती घेईल. सद्यस्थितीत या मतदारसंघातील राजकीय समीकरणे कशी आहेत, ती पक्षाच्या बाजूने वळविण्यासाठी काय करणे आवश्यक आहे याचा एकूणच अहवाल प्रदेश काँग्रेसकडे सादर करण्याची जबाबदारी या समितीवर सोपविण्यात आली आहे.अशी आहे नागपूर विभागीय उपसमितीनागपूर विभागातील उमरेड, उत्तर नागपूर, भंडारा, अर्जुनी मोरगाव, चंद्रपूर हे अनुसूचित जातीसाठी राखीव मतदारसंघ आहे. या मतदारसंघांवर लक्ष देण्यासाठी नेमण्यात आलेल्या विभागीय उपसमितीमध्ये नुकतेच काँग्रेसमध्ये प्रवेश घेतलेले किशोर गजभिये, कृष्णकुमार शेंडे, बंडूभाऊ सावरबांधे, शकुर नागाणी, सुरेश भोयर यांचा समावेश करण्यात आला आहे. या समितीने ८ मार्चपासून दौरे सुरू केले आहेत. सोमवार, १२ मार्च रोजी ही समिती नागपुरातील देवडिया काँग्रेस भवनात येत आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसMaharashtraमहाराष्ट्र