लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गटबाजीने ग्रासलेली काँग्रेस सत्ता गमावल्यानंतरही सुधारण्याच्या स्थितीत नाही. गेल्या वेळी गटबाजीतून काँग्रेसच्या दोन गटांनी महात्मा गांधी यांची जयंती दोन वेगवेगळ्या ठिकाणी साजरी केली होती. यावर्षीही ती प्रथा कायम राखली जात आहे. शहर काँग्रेसतर्फे व्हेरायटी चौकात तर युवक काँग्रेसतर्फे चितार ओळ चौकातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.काँग्रेसच्या शहर कार्यकारिणीवरून सुरू झालेला वाद पुढे महापालिका निवडणुकीत उमेदवार पाडण्यापर्यंत गेला. प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्यावर शाई फेकण्यात आली. यानंतर महापालिकेतील विरोधी पक्षनेता निवडीत काँग्रेसमध्ये उभे दोन गट पडले. आता हा वाद टोकाला गेला असून, यावर्षीही गांधीजयंतीला काँग्रेसचे दोन कार्यक्रम होताना दिसणार आहेत. नागपूर शहर काँग्रेस व जागतिक अहिंसा दिवस समितीतर्फे सकाळी ८.३० वाजता व्हेरायटी चौकातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमाला माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, शहर अध्यक्ष विकास ठाकरे उपस्थित राहतील. या वेळी गांधीजींना आवडणाºया भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम गेल्या अनेक वर्षांपासून याच ठिकाणी आयोजित केला जातो.युवक काँग्रेसचे अध्यक्ष बंटी शेळके यांच्या नेतृत्वात सेंट्रल एव्हेन्यूवरील चितार ओळ चौकात महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर सकाळी ८.३० वाजता आणखी एक आदरांजली कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला माजी मंत्री सतीश चतुर्वेदी, नितीन राऊत, अनिस अहमद, माजी आ. अशोक धवड, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे व त्यांचे समर्थक नगरसेवक आदी उपस्थित राहणार आहेत. शेळके यांनी गेल्या वर्षी शहर काँग्रेसला वगळून हा दुसरा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी मुत्तेमवार विरोधी नेते या कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावर्षीही तसेच चित्र दिसणार आहे.
काँग्रेसची गांधी जयंतीही एकत्र नाहीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2017 12:30 AM
गटबाजीने ग्रासलेली काँग्रेस सत्ता गमावल्यानंतरही सुधारण्याच्या स्थितीत नाही. गेल्या वेळी गटबाजीतून काँग्रेसच्या दोन गटांनी महात्मा गांधी यांची जयंती दोन वेगवेगळ्या ठिकाणी साजरी केली होती.
ठळक मुद्देगटबाजी टोकाला : व्हेरायटी चौक व चितार ओळीत वेगवेगळे कार्यक्रम