शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
2
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
3
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
4
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
5
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
6
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
7
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
8
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
9
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
10
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
11
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
12
राहुल गांधी यांच्याविरोधात तामिळनाडुतील 30 पोलिस ठाण्यात तक्रारी; कारण काय?
13
ऑडिशनमध्ये १०० वेळा रिजेक्ट झाला 'हा' स्टारकिड; डिप्रेशनचाही केला सामना, म्हणाला...
14
"अक्षय शिंदेला गोळ्या घालून मारणं फारच सहज झालं, त्याला...", उदयनराजेंची संतप्त प्रतिक्रिया
15
"आता मी एकालाही जिवंत सोडणार नाही", अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरपूर्वी काय घडलं?
16
Harini Amarasuriya : हरिणी अमरसूर्या बनल्या श्रीलंकेच्या नव्या पंतप्रधान, या पदावर विराजमान होणाऱ्या देशातील दुसऱ्या महिला
17
दिंडोरीत 'आत्राम' पॅटर्न? अजित पवारांचं गोकूळ झिरवळांनी वाढवलं टेन्शन!
18
IND vs BAN : दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी पोलिसांची मोठी कारवाई; 'त्या' २० जणांवर FIR दाखल
19
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य
20
अक्षय शिंदेचा पोलिसांकडून स्वसंरक्षणार्थ एन्काउंटर की ‘कुछ गडबड है’? CID तपास करणार

जनतेसोबत नाळ जोडून ठेवा; भाजप आमदारांना संघाचे बौद्धिक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2022 8:11 PM

Nagpur News हिवाळी विधिमंडळ अधिवेशनाच्या निमित्ताने उपराजधानीत आलेल्या भाजपच्या आमदारांनी मंगळवारी सकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीमबाग स्थित डॉ. हेडगेवार स्मृतिमंदिर परिसरास भेट दिली.

ठळक मुद्देसंघकार्य समजून घेण्यासाठी भेट देण्याचे आवाहन

नागपूर : हिवाळी विधिमंडळ अधिवेशनाच्या निमित्ताने उपराजधानीत आलेल्या भाजपच्या आमदारांनी मंगळवारी सकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीमबाग स्थित डॉ. हेडगेवार स्मृतिमंदिर परिसरास भेट दिली. राज्यातील सत्ताबदलानंतर प्रथमच आमदार संघस्थानी येत असल्याने संघातर्फे काय मार्गदर्शन करण्यात येते याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. परंतु सर्वांना संघाच्या कार्यपद्धतीची ओळख करून देण्यावरच भर राहिला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संघातर्फे जास्त ‘बौद्धिक’ टाळण्यात आले असले तरी जनतेसोबत नाळ जोडून ठेवा, असे सांगत हवा तो संदेश देण्यात आला आहे.

सकाळच्या सुमारास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात सर्व आमदार रेशीमबाग येथील हेडगेवार स्मृतिमंदिर परिसरात पोहोचले. यात राधाकृष्ण विखे पाटील, चंद्रकांत पाटील, रवींद्र चव्हाण यांच्यासह ज्येष्ठ मंत्र्यांचा समावेश होता. सर्व मंत्री व आमदारांनी आद्य सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार व द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतले. त्यानंतर मार्गदर्शन वर्गाला सुरुवात झाली. संघातर्फे विदर्भ प्रांत संघचालक राम हरकरे, महानगर संघचालक राजेश लोया, महानगर सहसंघचालक श्रीधर गाडगे हे उपस्थित होते.

संघ विचारधारा, कार्यप्रणाली, चालणारे उपक्रम यांची माहिती देण्यात आली. जिल्ह्याजिल्ह्यात आमदारांनी जनतेसोबत समन्वय जास्तीत जास्त कसा वाढेल यादृष्टीने कार्य केले पाहिजे, असा सल्ला यावेळी देण्यात आला. लोकप्रतिनिधींनी जनतेच्या समस्या डोळ्यासमोर ठेवूनच काम करावे, असे यावेळी श्रीधर गाडगे यांनी सांगितले. संघातर्फे दरवर्षी नागपुरात तृतीय वर्ष वर्गाचे आयोजन करण्यात येते. या वर्गाला आमदारांनी भेट द्यावी व तेथे जवळून संघकार्य व प्रशिक्षण प्रणाली जाणून घ्यावी, असे आवाहनदेखील त्यांनी केले. यावेळी भाजप आमदारांना ‘भविष्यातील भारत’ या पुस्तकाच्या प्रती देण्यात आल्या.

११३ आमदारांची उपस्थिती

रेशीमबागेत सर्व भाजप आमदारांना उपस्थिती अनिवार्य करण्यात आली होती. विधानसभा व विधान परिषद मिळून ११३ आमदारांची उपस्थिती. जे अनुपस्थित होते त्यांनी अगोदरच पक्ष पदाधिकाऱ्यांना याची कल्पना दिली होती.

मंत्र्यांचा ‘दक्ष’ पवित्रा

एरवी मंत्री तसेच नितेश राणे यांच्यासारखे सदस्य प्रसारमाध्यमांना सहजपणे प्रतिक्रिया देतात. मात्र संघभूमीत त्यांनी ‘दक्ष’ पवित्रा घेतला. येथे बोलणे योग्य होणार नाही व ती येथील परंपरा नाही, असे म्हणत त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलण्यास नकार दिला.

केवळ संघाची ओळख करून देण्यासाठी वर्ग

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारणा केली असता हा वर्ग केवळ भाजप आमदारांना संघाची ओळख करून देण्यासाठी होता, असे त्यांनी स्पष्ट केले. संघाच्या या वर्गाची उत्सुकता होती, असेदेखील ते म्हणाले. स्मृती भवन परिसरात प्रत्यक्ष संघस्थानी आल्यावर समाधान वाटतंय, महान नेत्यांच्या आठवणी इथे आहेत. आमची या स्थानावर श्रद्धा आहे व मागील २५ वर्षांपासून सातत्याने आमदार हिवाळी अधिवेशन काळात येथे येतात, असे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्रीदेखील स्वयंसेवकच होते

शिंदे गटातील आमदार संघस्थानी भेट देतील का, याबाबत उत्सुकता होती. मात्र तेथील एकही आमदार आला नाही. याबाबत मंत्री गिरीश महाजन यांना विचारणा करण्यात आली असता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेदेखील एकेकाळी स्वयंसेवकच होते. तेदेखील लवकरच संघस्थानी भेट देतील, असे त्यांनी प्रतिपादन केले.

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशन