शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत 'लोकमत'च्या बातमीवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
4
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
5
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
6
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
7
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
8
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
9
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
10
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
11
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
12
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
13
विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी शिक्षकांचे 'अपार' कष्ट; २५ टक्के नोंदणी अपूर्ण
14
शेती आणि शेतकरी - यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतून दोघेही हद्दपार!
15
‘कॉर्पोरेट’ प्रचार, फतवे अन् व्हायरल इंडिया; निवडणुकीचा प्रचार झालाय हाय-टेक
16
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

राजस्थानमध्ये भाजपाचे २२ आमदार संपर्कात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 12:48 AM

राजस्थानमध्ये जनमत भाजपाच्या विरोधात आहे. तेथील वसुंधरा राजे सरकार सत्तेतून जाणार हे अटळ आहे. लवकरच भाजपामध्ये मोठी फूट पडण्याची चिन्हे आहेत. तेथील २२ आमदार काँग्रेसच्या संपर्कात आहेत, असा गौप्यस्फोट अ.भा. काँग्रेस समितीचे महासचिव व राजस्थान प्रभारी अविनाश पांडे यांनी केला. मात्र, याबाबत कुठलाही निर्णय घेताना प्रदेश काँग्रेस समितीचे म्हणणे विचारात घेतले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

ठळक मुद्देअविनाश पांडे यांचा गौप्यस्फोट : वसुंधरा सरकारचा तख्तापलट अटळ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राजस्थानमध्ये जनमत भाजपाच्या विरोधात आहे. तेथील वसुंधरा राजे सरकार सत्तेतून जाणार हे अटळ आहे. लवकरच भाजपामध्ये मोठी फूट पडण्याची चिन्हे आहेत. तेथील २२ आमदार काँग्रेसच्या संपर्कात आहेत, असा गौप्यस्फोट अ.भा. काँग्रेस समितीचे महासचिव व राजस्थान प्रभारी अविनाश पांडे यांनी केला. मात्र, याबाबत कुठलाही निर्णय घेताना प्रदेश काँग्रेस समितीचे म्हणणे विचारात घेतले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.अविनाश पांडे यांची अ.भा. काँग्रेस कार्यसमितीमध्ये नियुक्ती झाली. यानंतर ते नागपुरात आले असता काँग्रेस कार्यकर्त्यांनी स्वागत केले. यावेळी पत्रकारांशी बोलताना पांडे म्हणाले, राजस्थानमध्ये गेल्या साडेचार वर्षात लोकसभेच्या दोन व विधानसभेच्या सहा जागांवर पोटनिवडणूक झाली. यापैकी दोन्ही लोकसभा व चार विधानसभेच्या जागा काँग्रेसने मोठ्या फरकाने जिंकल्या. काँग्रेसच्या जागा तेथे २१ वरून २५ झाल्या आहेत. यावरून जनतेला कल लक्षात येतो. येत्या निवडणुकीत काँग्रेस सत्तेवर तर भाजपा भुईसपाट झालेली दिसेल, असा दावा त्यांनी केला.राज्यस्थान सरकारने केलेली एकही घोषणा पूर्ण केली नाही. जनतेची फसवणूक करण्यात भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाचाही मोठा वाटा आहे. शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत होते. मात्र, झाली नाही. बँकांनी नव्याने पीककर्ज न दिल्यामुळे शेतकऱ्यांकडे बियाणे खरेदीसाठीही पैसे नव्हते. त्यामुळे नाराजी पसरली आहे. १८ हजार ७०० सरकारी शाळा बंद करून त्या आता पीपीपी तत्त्वावर खासगी व्यक्तींना दिल्या जात आहे. यामुळे ३९ हजार शिक्षक ररस्त्यावर आले आहेत. अशोक गहलोक यांच्या सरकारने सुरू केलेली राजीव गांधी आरोग्य योजना बंद करून ‘भामाशाह’ योजना सुरू करून एख कार्ड दिले आहे. मात्र, त्याचा लोकांना काहीच फायदा झालेला नाही. विकासाची संपूर्ण कामे ठप्प आहेत. त्यामुळे आता राजस्थानच्या लोकांना काँग्रेसच्या काळातील दिवस आठवत आहेत.‘आघाडी’बाबत प्रदेशला अहवाल मागितला २०० जागा स्वबळावर लढण्याची काँग्रेसची तयारी पूर्ण झाली आहे. पण राष्ट्रीय स्तरावर कुणाशी आघाडी करण्याचा निर्णय झाला तर त्याला प्रदेश काँग्रेसही सहकार्य करेल. काही जागांवर बसपाचा तर काहींवर प्रादेशिक आघाड्यांचा प्रभाव आहे. भाजपा विरोधी विचारांच्या पक्षांनी एकत्र यावे, अशी आपली भावना आहे. मात्र, जमिनीस्तरावर वस्तुस्थिती काय आहे, याचा अहवाल आपण ५ आॅगस्टपर्यंत प्रदेश काँग्रेसला मागितला आहे. संबंधित अहवाल आल्यावर याबाबत निर्णय घेतला जाईल.गहलोत-पायलट संयुक्त ताकद अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वात राजस्थानची निवडणूक होईल. संघटन महासचिव अशोक गहलोत यांचे प्रदेश काँग्रेसला पूर्ण समर्थन आहे. गहलोत व सचिन पायलट हे ‘एक और एक ग्यारह’ आहेत. जोश व होशचे उत्तम मिश्रण असून ते पक्षाची ताकद आहेत. भाजपाच्या फसव्या प्रचाराचा कार्यकर्त्यांवर परिणाम होणार नाही. निवडणुकीनंतर आमदारांशी चर्चा करून राहुल गांधी हे मुख्यमंत्रिपदाचा निर्णय घेतील, असेही पांडे यांनी स्पष्ट केले.नागपुरातून लढणार नाही नागपुरातून लोकसभेची निवडणूक लढण्यास आपण इच्छुक नाही. आपल्यावर पक्षाने राजस्थानची जबाबदारी सोपविली आहे. ती पूर्ण ताकदीने पार पाडू. नागपुरात पक्षाकडे अनेक सक्षम चेहरे आहेत, असेही त्यांनी सांगितले. 

 

टॅग्स :Avinash Pandeyअविनाश पांडेPoliticsराजकारण