लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळासमोर बांधण्यात आलेली उंच इमारत ‘प्रोजोन पॉम’मुळे विमानाचे उड्डाण आणि लॅण्डिंगवर परिणाम होत आहे. याच कारणामुळे भारतीय विमानतळ प्राधिकरणाने (एएआय) इमारतीचे ना-हरकत प्रमाणपत्र (एनओसी) रद्द केले आहे.विमानतळाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एनओसी रद्द केल्यामुळे आणि नोटीस जारी केल्यानंतर फ्लॅटची नोंदणी करणारे अनेक ग्राहक कंपनीला मासिक हप्तेवारी अदा करण्यास कानाडोळा करीत आहेत. काही दिवसांपूर्वीच इमारत उभारणाऱ्या कंपनीचे अधिकारी विमानतळावर पोहोचून त्यांनी आपली व्यथा अधिकाºयांना सांगितली होती. कंपनीने वर्ष २०११ मध्ये या इमारतीसाठी एनओसी घेतली होती. उंची ११ मीटरपेक्षा जास्त वाढविल्यामुळे विमानांसाठी अडचणी निर्माण झाल्या आहेत. याच कारणामुळे आलिशान फ्लॅट स्कीमला सीझनमध्ये झटका बसला आहे.या दरम्यान मिहान इंडिया लिमिटेडने (एमआयएल) एका खासगी सल्लागार कंपनीकडून एरोनॉटिकल आॅब्सटिकल सर्वेक्षण सुरू केले आहे. सर्वेक्षण अहवाल ‘प्रोजोन’करिता सर्वाधिक अडचणीचा ठरणार आहे. विमानतळाच्या सभोवताल इमारतींच्या वाढत्या उंचीमुळे एमआयएलला सध्याची ३,२०० लांब धावपट्टी ५६० मीटरने कमी करण्याचा प्रस्ताव द्यावा लागला होता. विमानतळ विकासाकरिता नऊ वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या एमआयएल आता खासगीकरणाच्या प्रक्रियेत बरीच पुढे गेली आहे. खासगी भागीदार विमानतळासाठी दुसरी धावपट्टी तयार करणार आहे. अशास्थितीत धावपट्टीची लांबी कमी करण्याचा प्रस्ताव हा खासगीकरणात अडचण निर्माण करणारा असल्यामुळे एमआयएलने इमारतींच्या उंचीवर निर्बंध आणणे सुरू केले आहे. नियमानुसार विमानतळाच्या चारही बाजूला २० कि़मी.च्या टप्प्यात कोणत्याही उंच इमारतींच्या बांधकामासाठी भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे ना-हरकत प्रमाणपत्र घेणे बंधनकारक असते, परंतु या नियमाकडे सपशेल कानाडोळा करण्यात येत आहे.
नागपुरात एएआयच्या नियमांकडे कानाडोळा : उंच इमारती विमानांसाठी अडचण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2018 1:36 AM
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळासमोर बांधण्यात आलेली उंच इमारत ‘प्रोजोन पॉम’मुळे विमानाचे उड्डाण आणि लॅण्डिंगवर परिणाम होत आहे. याच कारणामुळे भारतीय विमानतळ प्राधिकरणाने (एएआय) इमारतीचे ना-हरकत प्रमाणपत्र (एनओसी) रद्द केले आहे.
ठळक मुद्देना-हरकत प्रमाणपत्र रद्द झाल्यामुळे ‘प्रोजोन’च्या हप्तेवारीवर परिणाम