लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरात कोरोनाबाधित रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी आता २० दिवसावर पोहोचला आहे. एप्रिल महिन्याच्या अखेरीस हा कालावधी १२ दिवसाचा होता. त्याचप्रमाणे मृत्यूदराचा वेग कमी असला, तरी दोन टक्क्यांच्या खाली आला आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६२ टक्क्यांच्या वर गेले असल्याने नागपूरकरांना काहिसा दिलासा मिळू लागला आहे. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीस शहरातील कोरोना रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी १० दिवसाचा होता, तर मृत्यूदर ६.६ टक्के होता. ही स्थिती बदलण्यास जवळपास दीड ते दोन महिन्याचा कालावधी लागला आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही जवळपास तीन पटीने वाढले आहे.दुपटीचा कालावधी वाढला१० जूनची रुग्णसंख्या गृहीत धरल्यास शहरात ८६३ होती. हा आकडा दुप्पट होण्यासाठी जवळपास २० दिवसाचा कालावधी लागला आहे. २१ मे रोजी ४०४ रुग्ण होते. ही रुग्णसंख्या दुप्पट होण्यास १५ दिवसाचा कालावधी लागला. ६ मे रोजी २२९ रुग्णसंख्या होती. ती दुप्पट होण्यासाठी १२ दिवस लागले. शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढू लागल्यानंतर, सुरुवातीला दुपटीचा कालावधी १० दिवसाचा होता.मृत्यूदर घसरतोयनागपुरात सुरुवातीपासून मृत्यूदर कमी आहे. मार्च महिन्यात पहिल्या रुग्णाची नोंद झाली असलीतरी या महिन्यात एकाही मृत्यूची नोंद नव्हती. २० दिवसानंतर ४ एप्रिल रोजी पहिल्या मृत्यूची नोंद झाली. एप्रिल महिन्यात तीन मृत्यू झाले. मे महिन्यात ८ तर जून महिन्यात ४ मृत्यूची नोंद आहे. पण रुग्णसंख्येत वाढ होत असतानाही आता हा दर २ टक्क्यांच्या खाली आहे.बरे होण्याचे प्रमाण लक्षणीयशहरात कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत असली तरी दुसरीकडे उपचारानंतर घरी जाणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही वेगाने वाढत चालले आहे. बुधवारपर्यंत एकूण रुग्णांच्या तुलनेत बरे झालेल्या रुग्णांचे प्रमाण ६६ टक्के एवढे होते. ३१ एप्रिलपर्यंत हे प्रमाण केवळ ३१.८५ टक्के होते. रुग्णांना घरी सोडण्याच्या धोरणामध्ये बदल करण्यात आल्याने हे प्रमाण वाढल्याचे दिसते.
नागपूरकरांना दिलासा : मृत्यूदर कमी, बरे होणारे तिप्पट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2020 10:09 PM
शहरात कोरोनाबाधित रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी आता २० दिवसावर पोहोचला आहे. एप्रिल महिन्याच्या अखेरीस हा कालावधी १२ दिवसाचा होता. त्याचप्रमाणे मृत्यूदराचा वेग कमी असला, तरी दोन टक्क्यांच्या खाली आला आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६२ टक्क्यांच्या वर गेले असल्याने नागपूरकरांना काहिसा दिलासा मिळू लागला आहे
ठळक मुद्देरुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी १५ वरून २० दिवसावर