शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतीलच नाही, अवघ्या महाराष्ट्रातील बिग फाईट! अमित ठाकरे वि. सदा सरवणकर..., ठाकरेंकडून कोण?
2
पुन्हा गुवाहाटी दौरा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतलं कामाख्या देवीचं दर्शन!  
3
अमित ठाकरेंना माहीममधून उमेदवारी; संजय राऊतांनी एका वाक्यात दिली प्रतिक्रिया
4
मनसेचे आदित्य ठाकरेंच्या वरळीत तगडे आव्हान; उद्धव ठाकरे अमित ठाकरेंविरोधात उमेदवार देणार? 
5
JMM चे ३५ उमेदवार ठरले; कल्पना सोरेनही निवडणुकीच्या रिंगणात उतरणार!
6
विधानसभा २०२४: एकाच घरात दाेन पक्ष! राणे, नाईकांच्या कुटुंबात उमेदवारीसाठी वेगळे तंबू
7
गुटख्यातून जितकी कमाई, तितकीच डाग साफ करण्यात खर्च करते सरकार; तरीही का लागत नाही बॅन?
8
Share Market : आधी घसरण मग तेजी, शेअर बाजारात चढ-उतार सुरुच; बजाज फिनसर्व्ह, एचडीएफसी वधारले
9
१०० कोटींचा भ्रष्टाचार प्रकरण: बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझेला सशर्त जामीन मंजूर
10
सीनिअर सिटिझन्ससाठी सुपरहिट आहे Post Officeची 'ही' स्कीम, ५ वर्षात केवळ व्याजातूनच मिळतील ₹१२,३०,०००
11
आजचे राशीभविष्य : मित्रांकडून आणि विशेषतः स्त्रीवर्गाकडून लाभ होईल, व्यापारात फायदा होईल
12
१०५ काँग्रेस, ९५ उद्धवसेना, ८४ शरद पवार गट... अखेर महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला!
13
"मी काळवीटाची शिकार केली नाही!" बिष्णोईच्या धमक्यांदरम्यान सलमान खानचा व्हिडीओ व्हायरल
14
गुरुपुष्यामृत योग: दत्तगुरु-लक्ष्मीकृपेचा सुवर्ण योग; ‘या’ ६ गोष्टी करा, अमृत पुण्य मिळवा!
15
'केजीएफ' स्टार यश 'रामायण' मध्ये साकारणार रावणाची भूमिका, स्वत:च कन्फर्म करत म्हणाला...
16
गुरुपुष्यामृत योग: १० राशींना शुभ-लाभ, धनलक्ष्मीची अपार कृपा; अचानक धनलाभ, दिवाळीला भरभराट!
17
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४: यंदाच्या वेळी मुंबईत मराठी मतदारांचा कौल कुणाला?
18
संशयास्पद वाटले तर लगेच जप्ती! निवडणुकीसाठी पालिका आयुक्तांच्या तपास यंत्रणांना सूचना
19
१० व्या महिन्यात झाली डिलिव्हरी, सुप्रसिद्ध अभिनेत्री ३९ व्या वर्षी झाली आई! सर्वांकडून अभिनंदन
20
अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे घड्याळ चिन्ह गाेठवले जाणार का? गुरुवारी हाेणार सुनावणी

देश आणि संविधान वाचविण्यासाठी संविधान प्रेमिंनी एकत्र यावे

By गणेश हुड | Published: October 19, 2024 3:21 PM

योगेंद्र यादव यांचे आवाहन : १५० मतदार संघात राबवणार भारत जोडो अभियान

गणेश हूड / नागपूर

नागपूर  : सत्ताधाऱ्यांकडून देशातील संविधान, लोकशाही विचार संपवून हुकूमशाही लादण्याच्या प्रयत्नांना लोकसभा निवडणुकीत ब्रेक लागला. परंतु ही लढाई अर्धवट आहे. हरियाणातील निकालाने आपली जबाबदारी आणखी वाढली आहे. परंतु महाराष्ट्रातील परिस्थिती वेगळी आहे. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र व उत्तर प्रदेशाने  देश वाचविण्याचे काम केले. देश आणि संविधान वाचविण्यासाठी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत संविधान प्रेमिंनी एकत्र यावे, असे आवाहन स्वराज इंडियाचे संस्थापक व  राजकीय विश्लेषक योगेंद्र यादव यांनी शनिवारी पत्रपरिषदेत केले. नागपूर ही सामाजिक न्यायाची भूमी आहे. डॉ. बाबासाहेब आंबेकर यांची भूमी आहे. भारत जोडो अभियान देशभरातील सामाजिक संघटनांचे एक व्यासपीठ आहे. 

देशातील हुकूमशाही विरोधात व संविधान वाचविण्यासाठी राज्यातील २८८ मतदारसंघापैकी १५० मतदार संघात  भारत जोडो अभियान विधानसभा निवडणुकीत पूर्ण शक्तीनिशी महाविकास आघाडीच्या बाजुने उभे राहील. निवडणुकीतंर राज्यातील भाजप सरकार गेले तरी ही आमची लढाई पुढील २५ ते ३० वर्षे सुरू राहील. म्हणूनच ही लढाई सोपी नाही. ही लढाई आपण जिंकल्यास दुसरे प्रजासत्ताक खऱ्या अर्थाने अस्तित्वात येऊ शकेल. असा विश्वास योगेंद्र यादव यांनी व्यक्त केला. यावेळी  भारत जोडो अभियानाचे महराष्ट्र समन्वयक  संजय मंगला गोपाल, काँग्रेसचे नेते प्रफुल्ल गुडधे, सामाजिक कार्यकर्ते विलास भोंगाडे, प्रा. सुषमा भड यांच्यासह विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

व्हीव्हीपॅटच्या चिठ्ठ्यांची गणना व्हावीईव्हीएमचा प्रश्न गंभीर आहे. इलेक्ट्रॉनिक यंत्र असल्याने हॅक होवू शकते. फेरफार होवू शकतात. जे सत्तेत असलेले लोक याचा गैरफायदा घेवू शकतात. निवडणूक आयोगाला कणा नाही. ते कोणताही निर्णय घेवू शकतात. देशभरातील विरोधीपक्षांनी व्हीव्हीपॅट मतगणनेची मागणी केली आहे. त्यानुसार मतगणना व्हावी, असे मत योगेंद्र यादव यांनी व्यक्त केले.  

जाननिहाय गणना व्हावी देशात आरक्षणाची मागणी होत आहे. जात निहाय गणनेतून कुठला समाज आर्थिक व सामाजिकदृष्या मागास आहे. हे यातून स्पष्ट होईल. त्यानुसार आरक्षण देणे शक्य होईल. सविधानातही सामाजिक न्यायाच्या भूमिकेतून आरक्षण दिले असल्याचे योगेंद्र यादव म्हणाले.

टॅग्स :Yogendra Yadavयोगेंद्र यादवnagpurनागपूरPoliticsराजकारण