लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सदर येथील कॉफी हाऊस चौकामध्ये निर्माणाधीन उड्डाण पुलासाठी उभारण्यात आलेला लोखंडी पिलर मंगळवारी दुपारी एका कारवर कोसळला. त्यामुळे कारचे प्रचंड नुकसान झाले. कार चालक व कारमध्ये बसलेल्या व्यक्ती सुदैवाने बचावल्या.उड्डाण पुलाचे काम करणाऱ्या अधिकाºयांनी घटनेनंतर जेसीबीच्या साहाय्याने पिलर कारवरून उचलून बाजूला केला. दरम्यान, परिसरातील नागरिकांनी उड्डाण पुलाच्या कामात दाखविण्यात येत असलेल्या निष्काळजीपणावर तीव्र रोष व्यक्त केला. त्यांनी दोषी अधिकाºयांवर कारवाई करण्याची मागणी केली. गोपाल नंदनवार असे कार चालकाचे नाव आहे. ते या रोडवरून कारने जात होते. पिलर बोनेटवर कोसळल्यामुळे कारमधील कोणत्याही व्यक्तीला दुखापत झाली नाही. परंतु, पिलर कारच्या मधोमध कोसळला असता तर जीवितहानी होऊ शकली असती. कारमधील मागच्या सिटवर दोन व्यक्ती बसल्या होत्या.---------दुचाकी चालक वाचला नसताप्रत्यक्षदर्शी नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, एखादा दुचाकी चालक पिलरच्या खाली आला असता तर, तो वाचू शकला नसता. सुदैवाने असे घडले नाही.
नागपुरात निर्माणाधीन उड्डाण पुलाचा पिलर कारवर कोसळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2018 1:17 AM
सदर येथील कॉफी हाऊस चौकामध्ये निर्माणाधीन उड्डाण पुलासाठी उभारण्यात आलेला लोखंडी पिलर मंगळवारी दुपारी एका कारवर कोसळला. त्यामुळे कारचे प्रचंड नुकसान झाले. कार चालक व कारमध्ये बसलेल्या व्यक्ती सुदैवाने बचावल्या.
ठळक मुद्देसदरमधील घटना : सुदैवाने प्राणहानी टळली