शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
3
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
4
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
5
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
6
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
7
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
8
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
9
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
10
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
11
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
12
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
13
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
14
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
15
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
16
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
17
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
18
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
19
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
20
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."

मेट्रो रेल्वेसाठी गर्डर बॉक्सची निर्मिती

By admin | Published: May 25, 2016 2:52 AM

मेट्रो रेल्वे पुलाचे काम प्री-कास्ट तंत्रज्ञानाने करण्यात येणार आहे. यासाठी वर्धा रोडवर जामठ्याजवळ २२ एकरमध्ये वर्गवारीनुसार प्री-कास्ट बॉक्स गर्डर निर्मितीला प्रारंभ झाला आहे.

२२ एकरमध्ये प्रकल्प : वेळेची बचत होणारनागपूर : मेट्रो रेल्वे पुलाचे काम प्री-कास्ट तंत्रज्ञानाने करण्यात येणार आहे. यासाठी वर्धा रोडवर जामठ्याजवळ २२ एकरमध्ये वर्गवारीनुसार प्री-कास्ट बॉक्स गर्डर निर्मितीला प्रारंभ झाला आहे. दोन पिलरमध्ये पूर्वीच तयार झालेले गर्डर क्रेनच्या साह्याने बसविण्यात येणार आहे. त्यामुळे वेळेच्या बचतीसह नवीन तंत्रज्ञानाने पुलाचे काम अधिक मजबूत आणि वेगाने होणार आहे. दरदिवशी चार गर्डरची निर्मितीप्रकल्पात गेल्या आठवड्यात बॉक्स गर्डरची निर्मिती सुरू झाली. सध्या चार ते पाच गर्डर तयार झाले आहेत. या कामाला वेग येऊन दरदिवशी चार गर्डर तयार होणार आहे. पुलासाठी एकूण २,३९० गर्डरची निर्मिती करण्यात येणार आहे. प्रकल्पात गर्डरसाठी दोन क्रेनसह चार बेड तयार केले आहेत. गर्डर तयार झाल्यानंतर त्याला क्रेनच्या मदतीने हटविण्यात येते. पोलादाच्या मोठ्या ढाच्यात पोलाद आणि क्राँक्रिट टाकून तयार करण्यात येते. प्रकल्पात क्राँक्रिट तयार करण्यासाठी मोठे युनिट आहे. मजबुतीसाठी क्राँक्रिटची योग्य मिक्सिंग आवश्यक असते. या प्रकल्पात २०० पेक्षा कामगार काम करीत आहेत. बॉक्स गर्डरवर मेट्रो रेल्वेसाठी रुळ टाकण्यात येणर आहे. यावर दोन ट्रॅक (अप-डाऊन) राहील. पुलाखाली दोन पिलरमध्ये १० गर्डर राहतील. त्याच्या मजबुतीसाठी स्टीलच्या (एचटीसी) तारांनी एक दुसऱ्याला बांधण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)वेळेची बचत होणारप्री-कास्ट तंत्रज्ञानात गुणवत्ता असते. कमी गुंतवणुकीत कमी वेळेत काम होते. दिल्ली मेट्रो रेल्वेच्या पुलात लावलेल्या गर्डरच्या तंत्रज्ञानाने तयार होत आहे. पण येथे आकारमानात आंशिक बदल करण्यात आला आहे. शहरात काम करताना सुरक्षा आणि वाहतुकीत अडथळा येऊ नये म्हणून सेगमेंटल प्री-कास्ट बॉक्स गर्डर सर्वोत्तम आहे. एवढ्या मोठ्या आकाराच्या बॉक्सला साईटवर तयार करणे कठीण आहे. तयार गर्डर निश्चित अंतरावर बसविण्यात येणार आहे. -बृजेश दीक्षित, व्यवस्थापकीय संचालक,नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लि.