शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाण्यात बिल न देता हॉटेलात जायची सवय तेच दावोसमध्ये केले; जयंत पाटलांचा शिंदेंना जोरदार टोला 
2
रावेरचे माजी आमदार आर. आर. पाटील यांचे निधन
3
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
4
Aiden Markram नं रुबाब दाखवला; पण Arshdeep Singh समोर तो फिका ठरला (VIDEO)
5
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
7
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
8
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
9
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
11
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
12
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
13
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
14
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
15
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
16
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी
17
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
18
"अरे देवा...", राहुल-अथियाने दिली गुडन्यूज; सूर्यकुमारची पत्नी देविशाच्या कमेंटनं मात्र वेधलं लक्ष
19
Maharashtra Election 2024: गडचिरोलीत किती ही बंडखोरी; कोणाच्या हाती आमदारकीची दोरी?
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?

नागपुरातील जामठा स्टेडियमच्या बांधकामाला परवानगीच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 10:36 AM

जामठा येथील विदर्भ क्रिकेट असोसिएशन (व्हीसीए)स्टेडियमच्या बांधकामाला जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिलीच नसल्याची माहिती समोर आली आहे.

ठळक मुद्देजय जवान जय किसान संघटनेची कारवाईची मागणीजिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्रतिज्ञापत्रात खुलासा 

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जामठा येथील विदर्भ क्रिकेट असोसिएशन (व्हीसीए)स्टेडियमच्या बांधकामाला जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिलीच नसल्याची माहिती समोर आली आहे. राज्य माहिती आयोगाला सादर शपथपत्रात जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सादर करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रात तसा खुलासा करण्यात आला आहे.असे असताना व्हीसीएने एवढे मोठे बांधकाम केलेच कसे व येथे आंतरराष्ट्रीय सामने कसे खेळविण्यात आले, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. जय जवान जय किसान संघटनेचे अध्यक्ष प्रशांत पवार व माहिती अधिकार कार्यकर्ते टी. एच.नायडू यांनी याकडे लक्ष वेधत, याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे.मौजा जामठा येथे २००८ मध्ये व्हीसीएने स्टेडियम उभारले. मात्र हे स्टेडियम उभारताना महत्त्वाच्या परवानगीच घेण्यात आल्या नाही. माहिती अधिकार कार्यकर्ते टी. एच. नायडू यांनी १२ जानेवारी २०१६ मध्ये माहिती अधिकारांतर्गत व्हीसीए स्टेडियमबाबत माहिती मागितली होती. मिळालेल्या माहितीवर समाधान न झाल्याने नायडू यांनी राज्य माहिती आयुक्त यांच्या नागपूर खंडपीठासमोर तक्रार दाखल केली. व्हीसीए स्टेडियमच्या बांधकामाबाबत माहिती उपलब्ध नसेल तर तसे प्रतिज्ञापत्र जिल्हाधिकाºयांनी खंडपीठासमोर सादर करावे. माहिती गहाळ झाली असल्यास महाराष्ट्र अभिलेख अधिनियम २००६ नुसार गुन्हा दाखल करून कार्यवाहीचा अहवाल खंडपीठासमोर सादर करावा, असे आदेश दिले होते. या आदेशानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी (प्रस्तुतकार) कमलेश हरिचंद्र शेंद्रे यांनी सादर केलेल्या शपथपत्रात स्टेडियमला जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे बांधकाम परवानगी प्रदान करण्यात आली नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. असे असताना जिल्हाधिकारी कार्यालयाने या स्टेडियमकडून मनोरंजन कर कसा वसूल केला व यातून आलेल्या निधीचा उपयोग कुठे केला, असा सवाल प्रशांत पवार यांनी उपस्थित करीत, याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्याचा तसेच आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला.या स्टेडियमची क्षमता ४० हजार प्रेक्षकांची आहे. येथे आंतरराष्ट्रीय सामने होतात. स्टेडियमला टाऊन प्लॅनिंग, पर्यावरण, नागपूर सुधार प्रन्यास व अग्निशमन या विभागाकडून परवानगी नाही. स्डेडियम अवैध असल्याने या ठिकाणी सामने भरविणे म्हणजे नागरिकांची सुरक्षा धोक्यात टाकण्यासारखे आहे. प्रसंगी दुर्घटना घडली तर आपद्ग्रस्तांना विम्याचा कुठलाही लाभ मिळणार नाही. त्यामुळे पूर्ण परवानगी मिळेपर्यंत येथे कुठलेही सामने खेळविले जाऊ नये, अशी मागणी करीत याबाबत इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिल(आयसीसी)कडे तक्रार करणार असल्याचे पवार यांनी सांगितले.

टॅग्स :Cricketक्रिकेट