लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: अमेरिकेच्या मुंबई दूतावासाचे कॉन्सेल जनरल डेव्हिड रांज यांनी गुरुवारी रेशीमबाग येथे डॉ.हेडगेवार स्मृती मंदिराला भेट दिली व डॉ.हेडगेवार यांच्या समाधीस्थळी नमन केले. यावेळी काय चर्चा झाली ते कळू शकले नाही कारण प्रसिद्धीमाध्यमांना आत प्रवेश करण्यास मज्जाव करण्यात आला होता. संघाचे महानगर संघचालक राजेश लोया व कार्यवाह अरविंद कुकडे यांनी त्यांचे स्वागत केले. रांज यांनी या भेटबाबत प्रसारमाध्यमांशी बोलण्यास नकार दिला.
कॉन्सेल जनरल डेव्हिड रांज यांची डॉ. हेडगेवार स्मृती मंदिराला भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2020 1:35 PM