शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
2
ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!
3
IPL Auction 2025 : प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात
4
TATA IPL Auction 2025 Live : कोण खाणार 'भाव', कोण उधळला जाणार डाव; मेगालिलावात ५७७ खेळाडूं रिंगणात
5
IPL 2025 Auction : नेहरानं हेरला Jos Buttler चा चेहरा; GT च्या संघानं लगेच पर्समधून काढली एवढ्या कोटींची रक्कम
6
संभलमध्ये मशिदीच्या सर्व्हेदरम्यान हिंसाचार, जाळपोळ, दगडफेक, २ जणांचा मृत्यू 
7
"संजय राऊत वेडे, त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पाहिजे’’, शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली
8
भयंकर! इन्स्टावर मैत्री, बॉयफ्रेंडसोबत लग्न करण्यासाठी ५ वर्षांच्या लेकीचा काढला काटा अन्...
9
सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग, अजित पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड
10
३३०० कोटींची संपत्ती… भाजपच्या सर्वात श्रीमंत उमेदवाराचा निकाल काय लागला?
11
अखेर अनिरुद्ध-संजनाला घराबाहेर काढणार अरुंधती! 'आई कुठे काय करते'च्या अंतिम भागाचा प्रोमो रिलीज
12
महाराष्ट्राच्या निकालाचा भविष्यातील राष्ट्रीय राजकारणावर परिणाम, 'या' 5 पॉइंटमधून समजून घ्या...
13
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची अवस्था फारच बिकट; 'या' दोन विजयांनी पक्षाला मिळाला दिलासा
14
IND vs AUS : टीम इंडियानं सेट केलं ५३४ धावांचं टार्गेट; मग ऑस्ट्रेलियाला धक्क्यावर धक्के
15
'दैत्यांचा पराभव झाला...' कंगना राणौतची निकालावर प्रतिक्रिया; म्हणाली, "माझं घर तोडलं..."
16
Mahesh Sawant : "दोन बलाढ्यांसमोर टिकाव लागेल की नाही ही शंका होती, पण..."; महेश सावंतांनी स्पष्टच सांगितलं
17
वर्षभरानंतर किंग Virat Kohli च्या भात्यातून आली सेंच्युरी! सर Don Bradman यांना केलं ओव्हरटेक
18
जिथे BJP विरोधात थेट लढाई, तिथे काँग्रेसचे झाले पानिपत; 75 पैकी 65 जागा गमावल्या...
19
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : 'लोकांना शंका, निवडणुकीला आव्हान दिलं पाहिजे'; असीम सरोदेंनी निकालावर व्यक्त केली शंका
20
"सगळीकडे नाही तर निवडक ठिकाणी EVM हॅक'; महाराष्ट्राच्या निकालावर काँग्रेस नेत्याचे विधान

नागपुरात सायबरटेकचा घोळ निस्तारण्यासाठी कन्सलटंट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 3:11 PM

महापालिकेने शहरातील मालमत्तांचे सर्वेक्षण करण्याची जबाबदारी सायबरटेक सिस्टीम अ‍ॅण्ड साफ्टवेअर कंपनीवर सोपविली आहे. निर्धारित कालावधीत सर्वेक्षणाचे काम पूर्ण करता आलेले नाही. तसेच कंपनीने केलेल्या सर्वेक्षणात मोठ्या प्रमाणात त्रुटी असल्याने अद्यापही मालमत्ताधारकांना डिमांड मिळालेल्या नाही. सर्वेक्षणातील घोळामुळे कर वसुलीचे उद्दिष्ट गाठता आलेले नाही. असे असतानाही सायबरटेक कंपनीला वेळोवेळी मुदतवाढ देण्यात आली. आता हा सर्व घोळ निस्तारण्यासाठी प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सलटंट (पीएमसी) ची नियुक्ती करण्यात आली आहे.

ठळक मुद्देमनपावर दोन कोटींचा भार : नियुक्तीला स्थायी समितीची मंजुरी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेने शहरातील मालमत्तांचे सर्वेक्षण करण्याची जबाबदारी सायबरटेक सिस्टीम अ‍ॅण्ड साफ्टवेअर कंपनीवर सोपविली आहे. निर्धारित कालावधीत सर्वेक्षणाचे काम पूर्ण करता आलेले नाही. तसेच कंपनीने केलेल्या सर्वेक्षणात मोठ्या प्रमाणात त्रुटी असल्याने अद्यापही मालमत्ताधारकांना डिमांड मिळालेल्या नाही. सर्वेक्षणातील घोळामुळे कर वसुलीचे उद्दिष्ट गाठता आलेले नाही. असे असतानाही सायबरटेक कंपनीला वेळोवेळी मुदतवाढ देण्यात आली. आता हा सर्व घोळ निस्तारण्यासाठी प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सलटंट (पीएमसी) ची नियुक्ती करण्यात आली आहे. आर्थिक स्थिती बिकट असतानाही महापालिकेला यावर दोन कोटी खर्च करावे लागणार आहे़ या प्रस्तावाला गुरुवारी स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.विशेष म्हणजे सायबरटेकने शहरातील ५० टक्के मालमत्तांचा सर्वे केला आहे. यातील त्रुटी दूर करणे, कर आकारणी संदर्भातील वाद निकाली काढण्याचे काम कर आकारणी विभागातील अधिकारी व कर्मचारी करीत होते. याच कामासाठी पीएमसी नियुक्त करून यावर दोन कोटींचा निधी खर्च केला जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.शहरात साडेपाच लाख मालमत्ता असल्याची महापालिकेकडे नोंद आहे़ मात्र प्रत्यक्षात साडेसहा लाख मालमत्ता असून सर्व मालमत्तावर कर आकारला जात नाही. यामुळे महापालिकेच्या तिजोरीत महसूल जमा होत नाही. शहरातील सर्व मालमत्तांचे मूल्यांकन करून त्या कराच्या कक्षेत आणण्यासाठी सर्वेक्षणाचे काम हाती घेण्यात आले़याची जबाबदारी सायबरटेक कंपनीवर सोपविण्यात आली. ़ शहरातील मालमत्तांचा जीआयएस बेस डाटा आणि अन्य माहिती गोळा करण्याचे हे काम होते़ ६ लाख मालमत्तांचा डाटा ३० सप्टेंबर २०१७ पर्यंत गोळा करण्यास सांगण्यात आले़ परंतु ३ लाख ८३ हजार मालमत्तांचे सर्वेक्षण करण्यात आले. यातील ७० हजार मालमत्तांचा डाटा चुकीचा आढळून आला आहे.कंपनीला आॅक्टोबर २०१७ पर्यंत सर्वेक्षण पूर्ण करावयाचे होते. परंतु काम पूर्ण न झाल्याने डिसेंबर २०१७ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. त्यानतंर ३१ मार्चपर्यत व आता ३० जूनपर्यंत काम पूर्ण करण्यास सांगण्यात आले आहे़ या मुदतीत काम व्हावे यासाठी सायबरटेकसोबतच अनंत टेक्नॉलॉजी या कंपनीलाही काम देण्यात आले़ या दोन कंपन्या सर्वेक्षण करणार आहे. पीएमसी आतापर्यंत मालमत्ताचा गोळा करण्यात आलेला डाटा व अन्य बाबींची पडताळणी करणार आहे. तसेच मालमत्तांचे कर निर्धारणाची कामे वेळेत पूर्ण करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.सायबरटेकला दंड आकारण्याचा विचार नाही४शहरातील मालमत्तांचे सर्वेक्षण करण्याची जबाबदारी सायबरटेक कंपनीवर सोपविण्यात आली. निर्धारित कालावधीत सर्वेक्षण पूर्ण झालेले नाही. यासंदर्भात सायबरटेक कंपनीला दंड आकारण्याचा विचार नाही. मात्र चुकीच्या नोंदी करून युनिटची संख्या वाढविलेली असल्यास ही रक्कम कंपनीच्या बिलातून कपात केली जाईल, अशी माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा यांनी दिली.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाTaxकर