शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
2
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
3
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
4
"अरे देवा...", राहुल-अथियाने दिली गुडन्यूज; सूर्यकुमारची पत्नी देविशाच्या कमेंटनं मात्र वेधलं लक्ष
5
Maharashtra Election 2024: गडचिरोलीत किती ही बंडखोरी; कोणाच्या हाती आमदारकीची दोरी?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
7
Maharashtra Election 2024: लोकसभेला 62 पैकी 43 मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य; विदर्भातील लढतीचं गणित कसं?
8
AUS A vs IND A : ऑस्ट्रेलियात टीम इंडियाविरुद्ध चिटिंग? व्हिडिओ होतोय व्हायरल
9
सीबीआयने अधिकाऱ्याला लाच घेताना पकडले, घरात धाड टाकली, रोकडचा डोंगर सापडला
10
चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानात होईल आणि भारतही येईल, आता कमीपणा नाही; PCB अध्यक्षांची प्रतिक्रिया
11
'आम्ही भारताला फक्त शस्त्र विकत नाही, आमचं नातं विश्वासावर टिकून आहे', पुतिन स्पष्ट बोलले
12
Athiya Shetty-K L Rahul: अथिया शेट्टीने दिली गुडन्यूज, लग्नानंतर एका वर्षातच पाळणा हलणार; शेअर केली पोस्ट
13
सरन्यायाधीशांचा आज शेवटचा वर्किंग डे; सुप्रीम कोर्टात 'असं' काय घडलं, सगळेच हसले
14
उद्धव ठाकरेंची मशाल घराघरांत-समाजासमाजात आग लावणारी; CM एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
15
"कॉम्प्रोमाईज करणारा पुढे यशस्वी होतो"; मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना अजितदादा म्हणाले, "आमचं टार्गेट..."
16
आवडत्या जागी फिल्डिंग न दिल्याने रुसून बसला; मग 'मुंबई इंडियन्स'च्या माजी खेळाडूला संघाने 'बसवला'
17
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
18
सीएम सुक्खूंना मागविलेले समोसे सुरक्षा रक्षकांना वाटले गेले; CID चौकशी लावली, रिपोर्ट आला...
19
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
20
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले

सोनी इंडियाला ग्राहक मंचचा दणका :  दोषपूर्ण मोबाईल हॅन्डसेट दिला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2020 12:15 AM

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने दोषपूर्ण मोबाईल हॅन्डसेट विकण्याच्या प्रकरणात सोनी इंडिया कंपनीला दणका दिला. मंचद्वारे तक्रारकर्त्या ग्राहकाच्या हिताचे विविध आदेश जारी करण्यात आले.

ठळक मुद्देकिंमत सात टक्के व्याजासह परत करण्याचा आदेश

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने दोषपूर्ण मोबाईल हॅन्डसेट विकण्याच्या प्रकरणात सोनी इंडिया कंपनीला दणका दिला. मंचद्वारे तक्रारकर्त्या ग्राहकाच्या हिताचे विविध आदेश जारी करण्यात आले.सुनील सिन्नरकर असे तक्रारकर्त्या ग्राहकाचे नाव असून ते नरेंद्रनगर येथील रहिवासी आहेत. सिन्नरकर यांना मोबाईल हॅन्डसेटच्या किमतीचे २३ हजार ९६० रुपये व त्यावर सात टक्के व्याज अदा करण्यात यावे, असा आदेश मंचने सोनी कंपनीला दिला. २३ हजार ९६० रुपयावर ४ ऑगस्ट २०१७ ते प्रत्यक्ष रक्कम अदा करण्याच्या तारखेपर्यंत व्याज लागू करण्यात आले. तसेच, सिन्नरकर यांना शारीरिक-मानसिक त्रासाकरिता ५००० व तक्रार खर्चापोटी २००० अशी एकूण ७००० रुपये भरपाई मंजूर करण्यात आली. ही रक्कम कंपनीनेच द्यायची आहे. या आदेशांवर अंमलबजावणी करण्यासाठी कंपनीला एक महिन्याची मुदत देण्यात आली आहे.तक्रारीवर मंचचे अध्यक्ष संजय पाटील, सदस्य चंद्रिका बैस व सुभाष आजने यांच्यासमक्ष सुनावणी झाली. तक्रारीतील माहितीनुसार, सिन्नरकर यांनी १ एप्रिल २०१६ रोजी २३ हजार ९६० रुपयात सोनी कंपनीचा मोबाईल हॅन्डसेट खरेदी केला होता. आठ महिन्यानंतर मोबाईल हॅन्डसेटमध्ये ओव्हर हिटिंगची समस्या यायला लागली. त्यामुळे कॅमेरा व इतर फंक्शन्स बरोबर काम करीत नव्हते. दरम्यान, मोबाईल हॅन्डसेट काहीवेळा नि:शुल्क दुरुस्त करून देण्यात आला. परंतु, तो हॅन्डसेट पूर्णपणे दुरुस्त झाला नाही. त्यामुळे सिन्नरकर यांना नवीन मोबाईल हॅन्डसेट खरेदी करावा लागला. दरम्यान, त्यांनी सोनी कंपनी व इतरांविरुद्ध मंचमध्ये तक्रार दाखल केली. मंचची नोटीस तामिल झाल्यानंतर सोनी कंपनीने लेखी उत्तर दाखल करून स्वत:च्या समर्थनार्थ विविध मुद्दे मांडले व तक्रार खारीज करण्याची विनंती केली. शेवटी मंचने रेकॉर्डवरील पुरावे लक्षात घेता तक्रार अंशत: मंजूर करून वरीलप्रमाणे आदेश दिले.अनुचित व्यापार पद्धतीचा अवलंबसोनी कंपनीने ४ ऑगस्ट २०१७ रोजी तक्रारकर्त्याला पत्र पाठवून मोबाईल हॅन्डसेटची किंमत परत करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. परंतु, तक्रारकर्त्याला अद्याप ती रक्कम मिळाली नाही. हॅन्डसेट दोषपूर्ण होता हे कंपनीने अप्रत्यक्षपणे कबूल केले आहे. त्यामुळे या प्रकरणात कंपनीकडून दोषपूर्ण सेवा व अनुचित व्यापाराचा प्रकार घडला आहे असे निरीक्षण मंचने या निर्णयात नोंदवले.

टॅग्स :Nagpur District Consumer Forumनागपूर जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचMobileमोबाइल