लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने झिंगाबाई टाकळी येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज फ्लॅट ओनर्स को-आॅपरेटिव्ह सोसायटीचा पाणी पुरवठा बंद करू नका, असा अंतरिम आदेश महानगरपालिका पाणी पुरवठा विभाग व आॅरेंज सिटी वॉटर कंपनी यांना दिला. त्यामुळे सोसायटीतील रहिवाशांना दिलासा मिळाला.सोसायटीचे पाणी मीटर डिसेंबर-२०१७ ते ३१ आॅगस्ट २०१९ पर्यंत निकामी होते. सप्टेंबर-२०१९ मध्ये नवीन मीटर बसविण्यात आले. त्यानंतर गेल्या मे महिन्यात सोसायटीला तब्बल ९६ हजार ५४६ रुपयाचे बिल पाठविण्यात आले. त्यात बिलाच्या कालावधीची माहिती स्पष्ट करण्यात आली नाही. त्यामुळे सोसायटीने सरासरी बिलाचा हिशेब लावून ६ हजार रुपये रोख व १४ हजार रुपये आॅनलाईन जमा केले. परिणामी, पाणी पुरवठा विभागाने सोसायटीला २६ जून रोजी पत्र पाठवून चुकीचे बिल भरल्याची माहिती दिली. त्या आधारावर पाणी पुरवठा खंडित केला जाण्याची शक्यता लक्षात घेता, सोसायटीने ग्राहक मंचमध्ये तक्रार दाखल केली आहे. कोरोना काळात पाणी पुरवठा बंद केला गेल्यास रहिवाशांची गैरसोय होईल, असे सोसायटीचे म्हणणे आहे. मंचने तक्रारीवरील सुनावणीनंतर सोसायटीला पाणी बिलाचे आणखी २० हजार रुपये जमा करण्यास सांगितले व प्रतिवादींना वरील अंतरिम आदेश दिला. सोसायटीतर्फे अॅड. सौरभ राऊत व अॅड. व्ही. आर. बसेशंकर यांनी कामकाज पाहिले.
ग्राहक मंच : पाणी पुरवठा खंडित करण्यास मनाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2020 8:23 PM
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने झिंगाबाई टाकळी येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज फ्लॅट ओनर्स को-आॅपरेटिव्ह सोसायटीचा पाणी पुरवठा बंद करू नका, असा अंतरिम आदेश महानगरपालिका पाणी पुरवठा विभाग व आॅरेंज सिटी वॉटर कंपनी यांना दिला. त्यामुळे सोसायटीतील रहिवाशांना दिलासा मिळाला.
ठळक मुद्देतुकडोजी सोसायटीतील रहिवाशांना दिलासा