लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने तक्रारकर्त्या ग्राहकाच्या हिताचे विविध आदेश जारी करून डी. एल. सव्वालाखे प्रमोटर्स अॅन्ड डेव्हलपर्स यांना दणका दिला आहे.मनोज मेहता असे तक्रारकर्त्या ग्राहकाचे नाव असून, ते जुना सक्करदरा येथील रहिवासी आहेत. मेहता यांचे ७ लाख ६८ हजार १२२ रुपये १२ टक्के व्याजासह परत करण्यात यावे आणि मेहता यांना शारीरिक-मानसिक त्रासापोटी २० हजार व तक्रारीच्या खर्चापोटी १० हजार अशी एकूण ३० हजार रुपये भरपाई अदा करावी, असे आदेश मंचने डेव्हलपरला दिले आहेत. संबंधित रकमेवर १८ नोव्हेंबर २०१४ ते प्रत्यक्ष रक्कम अदा करण्याच्या तारखेपर्यंत व्याज लागू करण्यात आले आहे. या आदेशांची अंमलबजावणी करण्यासाठी डेव्हलपरला ३० दिवसाची मुदत देण्यात आली आहे. मंचचे अध्यक्ष संजय पाटील, सदस्य चंद्रिका बैस व सुभाष आजणे यांनी हा निर्णय दिला.तक्रारीतील माहितीनुसार, मेहता यांनी डी. एल. सव्वालाखे डेव्हलपर्सच्या मौजा चुरडी, ता. तिरोडा, जि. गोंदिया येथील रुचिरा योजनेतील एक सदनिका १३ लाख ५० हजार रुपयात खरेदी केली होती. त्याकरिता १३ जुलै २०१४ रोजी डेव्हलपरला ७ लाख २२ हजार १२२ रुपये दिले. त्यानंतर १९ आॅगस्ट २०१४ रोजी डेव्हलपरने विक्रीचा करारनामा करून दिला. त्यावेळी मेहता यांनी डेव्हलपरला ४६ हजार रुपये दिले. करारानुसार मार्च-२००० किंवा त्यापूर्वी सदनिकेचा ताबा द्यायचा होता. परंतु, डेव्हलपरने वेळेत सदनिकेचे बांधकाम पूर्ण केले नाही. सदनिकेची विविध कामे अद्याप अपूर्ण आहेत. त्यामुळे मेहता यांनी त्यांची रक्कम व्याजासह परत मिळण्यासाठी डेव्हलपरला कायदेशीर नोटीस बजावली होती. त्याची दखल घेण्यात आली नाही. परिणामी मेहता यांनी मंचमध्ये धाव घेतली होती. डेव्हलपर नोटीस तामील होऊनही मंचसमक्ष हजर झाले नाही. करिता, तक्रारीवर एकतर्फी कार्यवाही करण्यात आली.आरोप सिद्धडेव्हलपरने मेहता यांची पूर्ण रक्कम व्याजासह परत करणे आवश्यक आहे. डेव्हलपर मंचची नोटीस तामील होऊनही गैरहजर राहिले. त्यांनी आपली बाजू मांडली नाही. त्यामुळे डेव्हलपरवरील आरोप सिद्ध होतात, असे निरीक्षण मंचने निर्णयात नोंदवले आहे.
ग्राहक मंच : डी. एल. सव्वालाखे डेव्हलपर्सला दणका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2019 10:30 PM
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने तक्रारकर्त्या ग्राहकाच्या हिताचे विविध आदेश जारी करून डी. एल. सव्वालाखे प्रमोटर्स अॅन्ड डेव्हलपर्स यांना दणका दिला आहे.
ठळक मुद्देतक्रारकर्त्याची रक्कम व्याजासह परत करण्याचा आदेश