लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या आदेशाचे पालन झाले नसल्यामुळे काही कर्मचाऱ्यांनी आॅर्डनन्स फॅक्टरी अंबाझरीचे वरिष्ठ महाव्यवस्थापक रवींद्र्रन विश्वनाथन यांच्याविरुद्ध अवमानना याचिका दाखल केली आहे.पंजाबराव गजभिये व इतर आठ कर्मचाऱ्यांचा याचिकाकर्त्यांमध्ये समावेश आहे. त्यांनी पदोन्नती मिळण्याकरिता केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणात याचिका दाखल केली होती. न्यायाधिकरणने त्यांना पदोन्नती देण्याचा आदेश दिला होता. त्या आदेशाला आॅर्डनन्स फॅक्टरीने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. २०१५ मध्ये उच्च न्यायालयाने ती याचिका निकाली काढून कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीवर कायद्यानुसार निर्णय घेण्याचे निर्देश दिलेत. त्या निर्देशाचे पालन झाले नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. त्या प्रकरणात न्यायालयाने कर्मचाऱ्यांच्या अर्जावर निर्णय घेण्यासाठी आॅर्डनन्स फॅक्टरीला तीन महिन्यांचा वेळ दिला. त्यावरही अंमलबजावणी करण्यात आली नाही. परिणामी कर्मचाऱ्यांनी अवमानना याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने विश्वनाथन यांना नोटीस बजावून यावर स्पष्टीकरण सादर करण्यास सांगितले आहे. प्रकरणावर ६ नोव्हेंबर रोजी पुढील सुनावणी होणार आहे. कर्मचाऱ्यांच्या वतीने अॅड. प्रवीण देशमुख यांनी कामकाज पाहिले.
आॅर्डनन्स फॅक्टरी अंबाझरीचे वरिष्ठ महाव्यवस्थापक रवींद्रन विश्वनाथन यांच्याविरुद्ध अवमानना याचिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2018 12:55 AM
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या आदेशाचे पालन झाले नसल्यामुळे काही कर्मचाऱ्यांनी आॅर्डनन्स फॅक्टरी अंबाझरीचे वरिष्ठ महाव्यवस्थापक रवींद्र्रन विश्वनाथन यांच्याविरुद्ध अवमानना याचिका दाखल केली आहे.
ठळक मुद्देहायकोर्ट : आदेशाचे पालन केले नाही