जलालखेडा : नागपूर जिल्ह्यातील सर्व कोविड केअर सेंटर बंद करण्याचे आदेश आरोग्य विभागाने दिले आहे. जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असल्याने शासनाने हा निर्णय घेतला आहे. मात्र कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कोविड केअर सेंटर बंद करू नये. ती सप्टेंबर महिन्यापर्यंत सुरू ठेवावी. तसेच तेथील कंत्राटी मनुष्यबळ कार्यमुक्त करण्याचा जिल्हा शल्यचिकित्सक यांनी काढलेला आदेश रद्द करावा, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे. नरखेडचे नायब तहसीलदार पाटील यांच्यामार्फत शल्यचिकित्सकांना हे निवेदन देण्यात आले आहे. निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष, तालुका कार्याध्यक्ष अक्षय वीरखडे, दिनेश मुरोडिया, सामाजिक कार्यकर्ते अजय ठाकरे, किसनसिंग दरोगा, निखील कठाणे, नितीन बोकडे, महामंत्री हेमंत काळे आदींचा समावेश होता.
--
नायब तहसीलदार पाटील यांना निवेदन देताना अक्षय वीरखडे, अजय ठाकरे, दिनेश मुरोडिया.
230721\img-20210722-wa0386.jpg
फोटो ओळी. नायब तहसीलदार पाटील यांना निवेदन देताना अक्षय विरखडे, अजय ठाकरे, दिनेश मुरोडिया.