लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनामुळे शहरातील खासगी पशुवैद्यकीय दवाखाने बंद ठेवले जात आहेत. यामुळे तातडीचे उपचार करता येत नसल्याने जनावरांचा जीव धोक्यात येण्याची शक्यता आहे. अशा पशुपालकांच्या तक्रारी आहेत. याचा विचार करता खासगी पशुवैद्यकीय दवाखाने सुरू ठेवावेत, असे आवाहन महापालिकेचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. गजेंद्र्र महल्ले यांनी केले आहे.पशुवैद्यकीय सेवेचे अत्यावश्यक सेवेत समावेश आहे. शासनाने अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. नागपूर शहरात जनावरांची संख्या मोठी आहे. नागपूर शहरात खासगी २८ पशुवैद्यकीय दवाखाने आहेत. हे दवाखाने बंद ठेवल्यास वेळप्रसंगी जनावरांना ताातडीचे उपचार न मिळाल्यास त्यांचा जीव धोक्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे दवाखाने सुरू ठेवण्याचे आवाहन केले असल्याची माहिती महल्ले यांनी दिली.पशुखाद्य विक्री दुकाने सुरू ठेवानागपूर शहरात जनावरांची संख्या मोठी आहे. कोरोनामुळे दुकाने बंद ठेवल्यास जनावरांच्या खाद्याचा गंभीर प्रश्न निर्माण होईल. यामुळे शहरातील पशुखाद्य विक्रेत्यांनी आपली दुकाने सुरू ठेवावीत, असे आवाहन गजेंद्र महल्ले यांनी केले आहे. पशुखाद्य विक्रीची दुकाने बंद असल्याबाबत पशुपालकांच्या तक्रारी आहेत.