शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुन्हा मुख्यमंत्रिपद?; पंतप्रधान मोदी घेणार निर्णय
2
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
3
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
4
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले
6
Maharashtra Assembly Election Result 2024: लोकमताचा ‘महा’कौल! कमळ फुलले, अन् धनुष्यबाण, घड्याळ खुलले; मुख्यमंत्री कोण?
7
सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत
8
कोमेजलेले कमळ फुलले! फडणवीसांचे मार्गदर्शन, बावनकुळेंची मेहनत, अन्‌ पक्षजनांनी केली कमाल
9
ठाणे एकनाथ शिंदेंचे, तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची; काँग्रेसची अवस्था बिकट
10
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
11
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
12
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
13
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
14
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
15
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
16
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
17
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
18
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
19
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
20
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...

व्यापाऱ्याच्या हत्येची सुपारी देणारा जेरबंद 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 12:16 AM

राजनांदगाव (छत्तीसगड) पोलिसांना गेल्या १० वर्षांपासून वॉन्टेड असलेला आरोपी सौरभ उत्तमचंद जैन (वय ३५, रा. रामाधीन मार्ग, कमल टॉकीजजवळ राजनांदगाव) याच्या गुन्हे शाखेच्या युनिट तीनमधील पथकाने मुसक्या बांधण्यात शुक्रवारी यश मिळवले.

ठळक मुद्देछत्तीसगड पोलिसांना १० वर्षांपासून होता वॉन्टेड : गुन्हे शाखेच्या पथकाची कामगिरी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राजनांदगाव (छत्तीसगड) पोलिसांना गेल्या १० वर्षांपासून वॉन्टेड असलेला आरोपी सौरभ उत्तमचंद जैन (वय ३५, रा. रामाधीन मार्ग, कमल टॉकीजजवळ राजनांदगाव) याच्या गुन्हे शाखेच्या युनिट तीनमधील पथकाने मुसक्या बांधण्यात शुक्रवारी यश मिळवले.आरोपी सौरभ जैन हा व्यापारी आहे. त्याने व्यावसायिक स्पर्धेतून करमचंद अग्रवाल नामक व्यावसायिकाची २००८ मध्ये सुपारी देऊन हत्या करण्याचा प्रयत्न केला होता. सौरभचा नोकर चुन्ना यानेच सुपारी घेऊन अग्रवाल यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. या प्रकरणाने त्यावेळी राजनांदगाव-रायपूरमध्ये खळबळ उडवून दिली होती. प्राणघातक हल्ल्यातून अग्रवाल बचावले. त्यावेळी पोलिसांनी चुन्नाला अटक केली होती. मात्र, सौरभ जैन फरार झाला होता. गेल्या १० वर्षांपासून तो भारतातील विविध शहरात वेळोवेळी पत्ता बदलवून राहत होता. राजनांदगावच्या गुन्हे शाखेला तो वॉन्टेड होता. त्याची माहिती छत्तीसगड पोलिसांनी सहा महिन्यांपूर्वी नागपूर पोलिसांनाही कळविली होती. त्या माहितीच्या आधारे शोधाशोध करून येथील गुन्हे शाखा युनिट ३ च्या पोलीस पथकाने सौरभ जैनचा पत्ता शोधला. गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आनंदम सिटी येथे आलिशान सदनिकेत राहत असल्याचे कळताच पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जगवेंद्रसिंग राजपूत, एपीआय ज्ञानेश्वर भेदोडकर, उपनिरीक्षक मोकाशे तसेच त्यांच्या सहकाºयांनी शुक्रवारी आरोपी सौरभ जैनला ताब्यात घेतले. ही माहिती राजनांदगाव पोलिसांना कळवून येथे बोलवून घेण्यात आले. त्यानंतर जैनला राजनांदगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.---

टॅग्स :Crimeगुन्हाArrestअटक