शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
2
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
3
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
4
अदानींना डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून दिलासा मिळणार? नवं सरकार मागे घेऊ शकते लाचखोरीचा खटला
5
धक्कादायक! संतापलेल्या महिला सफाई कर्मचाऱ्याने सरपंचाला केली चपलेने मारहाण
6
टीम इंडियाचा कॅप्टन रोहित ऑस्ट्रेलियात पोहचताच कोच गंभीर परतणार मायदेशी; जाणून घ्या त्यामागचं कारण...
7
'तुम्ही मला गप्प करू शकणार नाही...', काँग्रेसच्याच कार्यक्रमात राहुल गांधींचा माईक बंद झाला
8
विधानसभेत EVM ने केला घात?; शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत सूर; मोठं आंदोलन उभारणार!
9
या दिवशी होणार राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा, शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा दावा 
10
Gold Silver Price Today 26 November: सोनं ४,२३० आणि चांदी १०,२४० रुपयांनी झालं स्वस्त; आता इतक्या किंमतीत मिळतंय १० ग्राम सोनं
11
धीरेंद्र शास्त्रींवर अज्ञाताने मोबाईल फेकला; गालाला लागला, म्हणाले...
12
पुढील वर्षी २०२५ मध्ये सिनेप्रेमींना मिळणार बॉलिवूडची मेजवानी! हे बहुचर्चित सिनेमे होणार रिलीज
13
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
14
Video - ९० हजारांचं बिल पाहून ग्राहकाचं डोकं फिरलं, रागाच्या भरात हातोड्याने फोडली स्कूटर
15
राज्याभिषेकावरून वाद, उदयपूर पॅलेसमध्ये राडा, महाराणा प्रताप यांचे वंशज आमने सामने
16
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
17
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
18
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?
19
"एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्री व्हायचं नसेल, तर..."; रामदास आठवलेंनी सांगितला तोडगा
20
एकनाथ शिंदेंनी मोदी-शाहांकडे कळवला निर्णय; मुख्यमंत्रिपदावरून काय बोलले?

भरारी पथक ठेवणार खते व बियाण्यांवर नियंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2019 12:28 AM

खरीप हंगामात बी-बियाणे, रासायनिक खते व कीटकनाशकांच्या गुणवत्ता नियंत्रणासाठी कृषी विभागाकडून जिल्हा व तालुकानिहाय १३ भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. यामुळे यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक टळेल व अनाधिकृतरीत्या विक्री होणाऱ्या बियाणे व खतांच्या विक्रीवरही लगाम बसेल, असा दावा कृषी विभागाने केला आहे. तसेच शेतकऱ्यांसाठी २५ मे नंतर बियाणे विक्रीस उपलब्ध आहे.

ठळक मुद्दे२५ मे नंतर बियाणे विक्रीसाठी उपलब्ध : कृषी विभागाचे खरीपाचे नियोजन

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : खरीप हंगामात बी-बियाणे, रासायनिक खते व कीटकनाशकांच्या गुणवत्ता नियंत्रणासाठी कृषी विभागाकडून जिल्हा व तालुकानिहाय १३ भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. यामुळे यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक टळेल व अनाधिकृतरीत्या विक्री होणाऱ्या बियाणे व खतांच्या विक्रीवरही लगाम बसेल, असा दावा कृषी विभागाने केला आहे. तसेच शेतकऱ्यांसाठी २५ मे नंतर बियाणे विक्रीस उपलब्ध आहे.खरीप हंगाम तोंडावर आला आहे. त्यामुळे कृषी विभागाकडून खते व बियाण्यांचे नियोजन करण्यात आले आहे. यंदा ५ लाख ७ हजार ६०० हेक्टवर खरीपाची पेरणी होणार आहे. यात सर्वाधिक क्षेत्र कापसाने व्यापले असून, सोयाबीनचे क्षेत्र गेल्यावर्षी इतकेच कायम आहे. खरीपाचे नियोजन करताना लागणाऱ्या बियाण्यांचेही नियोजन करण्यात आले आहे. कृषी विभागाकडून महाबीज व इतर कंपन्यांकडून बियाण्यांची मागणी नोंदवण्यात येते. मात्र, काही वेळेस शेतकऱ्यांची फसवणूकही होते. काही ठिकाणी बोगस बियाणे विक्रीचे प्रकारही समोर येतात. शेतकऱ्यांची फसवणूक टळावी यासाठी कृषी विभागाकडून भरारी पथक स्थापन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील १३ ही तालुक्यात प्रत्येकी एक असे १३ भरारी पथक तयार करण्यात आले आहे. या पथकाचे तालुका स्तरावर तालुका कृषी अधिकारी हे प्रमुख आहेत. तर जिल्हा स्तरावर जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाचे कृषी विकास अधिकारी प्रवीण देशमुख हे प्रमुख आहेत. पथकांमार्फत जिल्ह्यात बियाणे, खते व कीटकनाशके योग्य दरात विक्री व निविष्ठा गुणवत्ता सहनियंत्रणाबाबत धडक मोहीम राबवण्यात येणार आहे. जिल्हास्तरीय समितीचे सहनियंत्रण जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्याकडे आहे. नियंत्रण कक्षाची स्थापनाखते, बियाणे व कीटकनाशकाच्या उपलब्धतेसंदर्भात तालुकास्तरीय नियंत्रण कक्ष पंचायत समिती स्थापन करण्यात येणार आहे. जि.प.च्या कृषी विभागात सुद्धा जिल्हास्तरीय नियंत्रण कक्ष राहणार आहे. १६ मे ते १५ ऑगस्ट दरम्यानच्या कालावधीसाठी नियंत्रण कक्ष राहणार असून, शेतकऱ्यांना काही अडचणी, तक्रारी असल्यास त्याची दखल घेण्यात येणार आहे. बीटी कापसाच्या बद्दलची तक्रार जिल्हा अधिक्षक व तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे करायची आहे. तर बीटी सोडून इतर पिकांबद्दलची तक्रार पं.स.चे कृषी अधिकारी व उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांकडे करायची आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीnagpurनागपूर