- रिक्त ७० हजार जागा त्वरित भरण्याची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पेट्रोल, डिझेलचे दर प्रचंड वाढले असून, त्यात सर्वसामान्य जनता भरडली जात आहे. त्यामुळे, इंधनाचे दर नियंत्रणात आणण्याची मागणी जनता दल (सेक्युलर)ने केली आहे.
कोरोना काळात आधीच बेरोजगारीने जनता त्रस्त आहे. त्यात इंधनाचे दर प्रचंड वाढल्याने महागाईचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. हे दर नियंत्रणात आणून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधानांना करण्यात आली आहे. यासोबतच राज्याच्या मुख्यमंत्र्यांना निवेदन देत शासनाच्या विविध विभागात असलेल्या ७० हजार रिक्त पदांवर तात्काळ पदभरती करावी आणि बेरोजगारीची समस्या दूर करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी शहर अध्यक्ष रमेश शर्मा, प्रदेश महासचिव डॉ. विलास सुरकर व अविनाश निमकर, मुन्ना शेख, वसंत डेकापूरवार, शिवराज परोपटे, सुरेश मोटघरे, संगीता शेंडे, आशा निमगडे, मो. शाहिद शेख, मंगला हिरकणे, तारा मेश्राम, विजय खोब्रागडे, मोरेश्वर गभणे, आनंद मोटघरे, तानाजी कडवे, अनिता सोमकुवर, अतुल ढोमणे, अनिल बोपचे उपस्थित होते.
............