लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता नागपुरात पुन्हा नव्याने ३१ नियमित रुग्णालये आता डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये परिवर्तित होणार आहे. त्यामुळे आता अशा हॉस्पिटलची संख्या ६२ होणार आहे. यासंदर्भातील मनपा प्रशासनाने शनिवारी आदेश जारी केला असून २४ तासात संबंधित हॉस्पिटलकडून कोविड रुग्ण दाखल करण्यास सज्ज असल्याबाबतचा अहवाल मागितला आहे.या आदेशात नमूद केल्यानुसार, २४ तासात हॉस्पिटलकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील ४८ तासात कोविड-१९ पॉझिटिव्ह रुग्ण संबंधित हॉस्पिटलला भरती करता येतील. जे रुग्ण दाखल होतील त्यांच्यावर शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार उपचार करण्यात यावे असेही मनपाचे सहायक वैद्यकीय अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार यांनी या आदेशात नमूद केले आहे.रिअल टाइम अहवाल द्यावा लागणारनवीन खाजगी कोविड हॉस्पिटलला त्याच्याकडे दाखल करण्यात आलेल्या रुग्णांचा रिअल टाइम अहवाल मनपाच्या पोर्टलवर नियमित अद्ययावत करणे अनिवार्य आहे.अशी आहेत नवीन कोविड हॉस्पिटलएचसीजी एनसीएचआरआय कॅन्सर सेंटर ऑटोमोटिव्ह चौक, श्रीमती निंबुनाबाई तिरपुडे हॉस्पिटल अॅण्ड रिसर्च सेंटर चॉक्स कॉलनी कामठी रोड, अवंती इन्स्टिट्यूट ऑफ कॉर्डिऑलॉजी प्रा.लि. धंतोली, म्यूर मेमोरियल हॉस्पिटल सीताबर्डी, व्हीनस क्रिटीकल केअर हॉस्पिटल १० नंबर पूल कामठी रोड, शतायु हॉस्पिटल अॅण्ड रिसर्च सेंटर वर्धा रोड, क्रिसेंट हॉस्पिटल अॅण्ड हार्ट सेंटर लोकमत चौक धंतोली, डॉ. दळवी चिल्ड्रन हॉस्पिटल अॅण्ड रिसर्च सेंटर गरोबा मैदान, मिडास मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल प्रा.लि. रामदासपेठ, अर्नेजा इन्स्टिट्यूट ऑफ कॉर्डिऑलॉजी रामदासपेठ, ट्रीट मी हॉस्पिटल हिंदुस्तान कॉलनी वर्धा रोड, श्री हॉस्पिटल अॅण्ड क्रिटीकल केअर सेंटर, सक्करदरा, प्लॅटिना हार्ट हॉस्पिटल हॉटेल हरदेवजवळ सीताबर्डी, खिदमत हॉस्पिटल शांतिनगर, स्पंदन हार्ट इन्स्टिट्यूट अॅण्ड रिसर्च सेंटर (इंडिया) प्रा.लि. धंतोली, क्रिटीकेअर हॉस्पिटल अॅण्ड रिसर्च सेंटर सीताबर्डी, सनफ्लॉवर हॉस्पिटल रामदासपेठ, अश्विनी किडनी अॅण्ड डायलेसीस सेंटर रामदासपेठ, शेंबेकर हॉस्पिटल प्रा.लि. अजनी चौक खामला रोड, ट्रिनीटी हॉस्पिटल हिंदुस्तान कॉलनी वर्धा रोड, क्रिटीकल केअर युनिट हिंदुस्तान कॉलनी वर्धा रोड, गिल्लुरकर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल रेशीमबाग उमरेड रोड, गेटवेल हॉस्पिटल अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट धंतोली, क्रिम्स हॉस्पिटल रामदासपेठ, आयकॉन हॉस्पिटल भरत नगर अमरावती रोड, सेनगुप्ता हॉस्पिटल अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट रविनगर चौक, शुअरटेक हॉस्पिटल अॅण्ड रिसर्च सेंटर लि. धंतोली, आनंद हॉस्पिटल हनुमान नगर, केशव हॉस्पिटल मानेवाडा चौक, आस्था क्रिटीकल केअर अॅण्ड अवतार मेहरबाबा हॉस्पिटल सुयोग नगर नागपूर.