शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
2
पाकिस्तानी फवाद खानचा 'लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही; राज ठाकरेंचा इशारा
3
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
4
पु्ण्याकडे येत होती ट्रेन, अचानक आला मोठा आवाज आणि रुळांवरून घसरलं इंजिन
5
'लाफ्टर शेफ' शोला लागली नजर? एकानंतर एक सेलिब्रिटींसोबत अपघात; राहुल वैद्यच्या चेहऱ्यावर...
6
IND vs BAN 4th Day Live : बांगलादेशने लय पकडली पण अश्विन-जडेजाने डोकेदुखी वाढवली; भारताची विजयाकडे वाटचाल
7
मोठा अनर्थ टळला! रेल्वे ट्रॅकवर गॅस सिलिंडर; लोको पायलटच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला 
8
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
9
चीन समर्थक दिशानायके यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपती निवडणुकीत घेतली विजयी आघाडी   
10
ENG vs AUS : इंग्लंडचे पुनरागमन पण मिचेल स्टार्क भिडला! यजमानांचा पुन्हा पराभव; ऑस्ट्रेलियाची गाडी सुस्साट
11
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
12
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
13
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
14
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
15
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
16
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
17
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
18
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
19
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
20
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट

थंडीत गॅस सिलिंडरची चणचण

By admin | Published: December 28, 2015 3:20 AM

कृत्रिम टंचाई निर्माण करून काळ्या बाजारात सुरू असलेल्या घरगुती गॅस सिलिंडरच्या विक्रीकडे शासनाच्या अधिकाऱ्यांनी

काळ्या बाजारात विक्री : हॉटेल्स व चारचाकी वाहनांमध्ये वापरनागपूर : कृत्रिम टंचाई निर्माण करून काळ्या बाजारात सुरू असलेल्या घरगुती गॅस सिलिंडरच्या विक्रीकडे शासनाच्या अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने ऐन थंडीच्या दिवसात आणि सणासुदीत घरगुती गॅस सिलिंडरची चणचण जाणवत आहे. आॅनलाईन नोंदणी केल्यानंतरही एजन्सीसमोर ग्राहकांचा रांगा दिसून येत आहे. हिंदुस्तान पेट्रोलियम, भारत पेट्रोलियम आणि इंडियन आॅईल कॉर्पोरेशन या तिन्ही कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी ग्राहकांच्या तक्रारी सोडवाव्यात, अशी मागणी ग्राहक संघटनांनी केली आहे. ग्राहकांना न्याय न मिळाल्यास वरिष्ठांकडे न्याय मागू, अशा इशारा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.चक्क रस्त्यांवर सिलिंडरची विक्री!थंडीच्या दिवसात घरगुती गॅस सिलिंडरला जास्त मागणी असते. वीज परवडत नसल्याने गॅसच्या गिझरचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. काळ्या बाजारात एक हजारात सिलिंडर विकल्या जात आहे. शहरातील सर्वच हॉटेल्स, टपरी आणि चारचाकी वाहनांमध्ये घरगुती गॅसचा सर्रास वापर सुरू आहे. त्यामुळे सिलिंडरच्या डिलेव्हरीला तब्बल १५ दिवस लागत आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, कंपनीतर्फे गॅसचा सुरळीत पुरवठा सुरू आहे. टंचाई कशामुळे होत आहे, याची शहानिशा करावी लागेल. अधिकाऱ्यांना न घाबरता डिलेव्हरी बॉय रस्त्यावर गाड्या उभ्या करून एक हजारात सिलिंडरची विक्री करीत असल्याचे दिसून येते. एजन्सीच आम्हाला सिलिंडर विक्रीसाठी उपलब्ध करून देतात, असे डिलेव्हरी बॉयचे म्हणणे असल्याने त्यांची हिंमत वाढली आहे. प्रशासनाने लक्ष द्यावेव्यावसायिकांना मात्र जादा पैसे देऊन घरगुती सिलिंडर वेळेवर मिळत आहे. परंतु सर्वसामान्य नागरिकांना जादा पैसे देऊनही सिलिंडर मिळणे अवघड झाले आहे. सिलिंडर वितरण व्यवस्थेकडे महसूल प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे. परंतु ही जबाबदारी संबंधित अधिकारी घेण्यास टाळाटाळ करीत आहे. अर्थपूर्ण व्यवहार होत असल्यामुळे डोळेझाक होत आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांमधून प्रशासनाच्या गलथान कारभारावर तीव्र संताप व्यक्त होत आहे. वितरक आणि ग्राहकांमध्ये वाद सुरू असल्याचे सर्वत्र दिसून येत आहे. ‘गाडी आली नाही’ असे सांगून सिलिंडर नाकारले जात आहे. गॅस एजन्सींनी आपले मनमानी धोरण राबवून ग्राहकांची अडवणूक सुरू केली असून त्यावर नियंत्रण ठेवायला हवे, असे मत एका ग्राहकाने लोकमतशी बोलताना व्यक्त केले.वाहनांमध्ये घरगुती गॅसघरगुती ग्राहकांना स्वयंपाकासाठी गॅस सिलिंडर उपलब्ध होत नसताना वाहनधारक व व्यावसायिक वापरासाठी मात्र या गॅसचा सर्रास उपयोग सुरू असल्याचे दिसून येते. शहरात गॅसचे पंप फार कमी आहेत. या तुलनेत गॅसवर धावणाऱ्या गाड्या जास्त आहेत. जीवनावश्यक कायद्यांतर्गत स्वयंपाकासाठी वापरला जाणारा गॅस वाहनांमध्ये वापरता येत नाही. टपरीचालक, चहाची दुकाने, कॅन्टीन, उपाहारगृह आणि हॉटेल्समध्ये घरगुती सिलिंडरचा उघड वापर केला जात आहे.२४२२ रुपयात नवे गॅस कनेक्शन!हिंदुस्थान पेट्रोलियम, भारत गॅस, इंडियन आॅईल या तिन्ही कंपन्यांतर्फे १ जानेवारी २०१५ पासून सबसिडीचे नवीन घरगुती गॅस कनेक्शन देणे सुरू आहे. काही कागदपत्रांची पूर्तता करून ग्राहकाला नवीन कनेक्शन केवळ २४२२ रुपयात विकत घेता येते. त्यात एजन्सीकडून गॅस शेगडी घेणे बंधनकारक नाही. ग्राहकाला हक्काची सेवा पुरविण्यात एजन्सी सक्षम नसेल तर त्या एजन्सीची तक्रार कंपनीकडे करता येईल. कनेक्शन संपल्याची कारणे देऊन कनेक्शन नाकारणाऱ्या एजन्सींवर तातडीने कारवाई करण्यात येईल, असे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. सेवा न देणाऱ्या एजन्सीची ग्राहकांनी कंपनीकडे बेधडक तक्रार करावी, असे आवाहन अधिकाऱ्यांनी केले आहे.