लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी राज्यात आजपासून संचारबंदी व जिल्हाबंदी लागू करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. त्या पार्श्वभूमीवर नागपुरातही सद्यस्थितीचा आढावा डॉ. नितीन राऊत यांनी घेतला. या कालावधीत सर्व धर्मीयांची प्रार्थनास्थळे बंद राहतील. मात्र अत्यावश्यक सेवेतील वाहनांना सवलत दिली जाणार आहे. मात्र ही वाहने प्रशासनाकडून प्राधिकृत करून घेणे आवश्यक आहे. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा या कालावधीत नियमित सुरू राहणार आहे, असे पालकमंत्र्यांनी सांगितले. जीवनावश्यक वस्तू, औषधे, अन्नधान्य तसेच त्यांची ने-आण करणारी वाहने सुरू राहतील. पशुखाद्य मिळेल, पशूंचे दवाखानेही उघडे राहतील. कृषी मालाशी सबंधित वाहतूक सुरू राहील. तेव्हा नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, कोरोनाशी असलेला हा लढा यशस्वी करण्यासाठी सहकार्य करा, असे आवाहनही पालकमंत्री नितीन राऊत यांनी केले.विनाकारण घराबाहेर पडू नका - गृहमंत्रीकोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून शासनाकडून वेळोवेळी उपाययोजना करण्यात येत आहे. याअंतर्गत संचारबंदीचा कठोर निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय केवळ नागरिकांच्या हितासाठीच घेण्यात आला असून नागरिकांनी या संचारबंदीदरम्यान विनाकारण घराबाहेर पडू नये. कुठल्याही परिस्थिती गर्दी होणार नाही, याची काळजी घ्या, असे आवाहन राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले आहे.
संचारबंदीदरम्यान सहकार्य करा- पालकमंत्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2020 12:45 AM