नागपूर : मागील काही दिवसांपासून दैनंदिन कोरोनाबाधितांच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. रविवारी ३२९ नव्या रुग्णांची नोंद झाली असताना ३७५ रुग्ण बरे झाले. रुग्णसंख्येच्या तुलनेत आतापर्यंत ९३.६५ टक्के रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आज ८ बाधितांचा मृत्यू झाला. रुग्णांची एकूण संख्या १३०४६९, तर मृतांची संख्या ४०७२ झाली. विशेष म्हणजे, मागील आठवड्यात २४६८ बाधितांची भर पडली.
नागपूर जिल्ह्यात रविवारी ३१३२ कोरोना चाचण्या झाल्या. यात २८८८ आरटीपीसीआर, तर २४४ रॅपिड अँटिजन चाचण्यांचा समावेश होता. पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये शहरातील २७२, ग्रामीण भागातील ५४, तर जिल्ह्याबाहेरील ३ रुग्ण आहेत. मृतांमध्ये शहरातील ३, ग्रामीणमधील २, तर जिल्ह्याबाहेरील ३ आहेत. आतापर्यंत शहरात १०३५७८ कोरोनाबाधितांची व २६९५ मृतांची नोंद झाली. ग्रामीणमध्ये २६०५६ बाधितांची व ७२४ मृत्यू झाले. विशेष म्हणजे, जिल्ह्याबाहेरील रुग्णांची संख्या ८३५ वर गेली असून, मृतांची संख्या ६५३ झाली आहे. सध्या ४२१३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यातील १२१९ रुग्ण विविध रुग्णालयांत, तर २९९४ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत.
-मेडिकलमध्ये १५५४, तर मेयोमध्ये १३३१ मृत्यू
मेडिकलमध्ये आतापर्यंत ६०४० रुग्ण बरे झाले आहेत, तर १५५४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या १६२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मेयोमध्ये २१७० रुग्ण बरे झाले असून, १३३१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या ५२ रुग्ण उपचार घेत आहेत. एम्समधून ९१४ रुग्ण बरे झाले आहेत. २३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ४२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
-दैनिक संशयित : ३१३२
-बाधित रुग्ण : १३०४६९
_-बरे झालेले : १२२१८४
- उपचार घेत असलेले रुग्ण : ४२१३
- मृत्यू : ४०७२