नागपूर : कोरोनाची दुसरी लाट तीव्र असताना शहराच्या तुलनेत ग्रामीणमध्ये पॉझिटिव्हीटी रुग्णांची संख्या अधिक होती. परंतु या महिन्यात १९ ऑगस्टपर्यंत ग्रामीणमध्ये २४ रुग्णांची नोंद झाली तर मागील आठ दिवसांपासून एकही रुग्ण आढळून आला नाही. यामुळे ग्रामीणमधून कोरोना हद्दपार झाला का, असा प्रश्न नागरिक विचारत आहे. शुक्रवारी शहरात २ तर जिल्हाबाहेरील १ नव्या रुग्णाची भर पडली.
नागपूर जिल्ह्यात शुक्रवारी ५२०७ चाचण्या झाल्या. यात शहरातील ४०२४ तर ग्रामीणमधील ११८३ चाचण्यांचा समावेश होता. जिल्ह्यात झालेल्या आज एकूण तपासणीपैकी पॉझिटिव्हीटीचा दर केवळ ०.१ टक्क्यांवर आला. या महिन्यात ग्रामीणमध्ये दैनंदिन रुग्णांची संख्या ५वर गेलेली नाही. २० ऑगस्टपासून तर एकाही रुग्णाची नोंद झाली नाही. यामुळे ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणेला मोठा दिलासा मिळाला आहे. आज कोरोनातून ९ रुग्ण बरे झाले. कोरोनावर मात केलेल्या रुग्णांची संख्या ४,८२,८२२ झाली असून याचे प्रमाण ९७.९३ टक्के आहे. सध्या कोरोनाचे ६९ रुग्ण अॅक्टीव्ह असून यातील ३२ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये तर ३७ रुग्ण विविध शासकीयसह खासगी रुग्णालयात भरती आहेत.
:: कोरोनाची शुक्रवारची स्थिती
दैनिक चाचण्या: ५२०७
शहर : २ रु ग्ण व ० मृत्यू
ग्रामीण : ० रुग्ण व ० मृत्यू
ए. बाधित रुग्ण :४,९३,००९
ए. सक्रिय रुग्ण : ६९
ए. बरे झालेले रुग्ण : ४,८२,८२२
ए. मृत्यू : १०११८