शहरं
Join us  
Trending Stories
1
जसप्रीत बुमराह 'नंबर १'! कसोटी क्रमवारीत विराट, यशस्वीची मोठी झेप; रोहित, पंत, गिलची घसरण
2
"मुलगी जर दिसायला चांगली असेल..."; अजितदादा समर्थक आमदाराचे महिलांबाबत वादग्रस्त विधान
3
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यासह बड्या नेत्यांचा खात्मा करणार, इराणने प्रसिद्ध केली मोस्ट वाँटेडची यादी
4
“आरक्षण वाचवायचे असेल तर वंचित बहुजन आघाडीला सत्तेत निवडून द्या”; प्रकाश आंबेडकरांचे आवाहन
5
कमी तिथे आम्ही नव्हे, तर भारत म्हणजे 'हमी'! पुतिन यांच्यानंतर अजित डोवाल फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांना भेटले; कारण काय?
6
"...मग मनोज जरांगेंनी आधी तिथला उमेदवार जाहीर करावा", लक्ष्मण हाकेंचे चॅलेंज काय?
7
बांगलादेशवर मोठा विजय मिळवत 'कॅप्टन' रोहित शर्माचा विक्रम, विराट कोहलीला टाकलं मागे
8
लीड रोड करुनही झाली नाही लोकप्रिय; १० मिनिटांच्या 'त्या' भूमिकेने केलं स्टार, आता म्हणते...
9
'या' चुका तुम्हाला करतील कर्जबाजारी; 5 गोष्टी समजून घ्या
10
Palak Sindhwani: गुडबाय! 'तारक मेहता...' मधील सोनूचा मालिकेला रामराम; शेअर केली भावूक पोस्ट
11
मनोज जरांगेंनी कंबर कसली; दसरा मेळाव्याची सुरु केली तयारी, विविध ठिकाणी देणार भेटी
12
Irani Cup live : कडक सॅल्युट! सर्फराज खानचे अप्रतिम 'द्विशतक', मुंबईचा 'संकटमोचक' लै भारी लढला
13
धक्कादायक! झारखंडमध्ये रेल्वे ट्रॅकला बॉम्बने उडवले; भीषण स्फोटाने परिसर हादरला
14
ऑनलाईन गेमच्या नादात सेल्समन बनला चोर; शोरुममधील ७ लाखांच्या दागिन्यांवर डल्ला
15
गोविंदाप्रमाणेच बॉलिवूड अभिनेत्रीच्या पतीलाही स्वत:च्याच बंदुकीतून लागली होती गोळी, लग्नानंतर ११ दिवसांतच उद्ध्वस्त झालेला संसार
16
"काँग्रेसनं लबाडीच्या राजकारणामुळं स्वतःला संपवलं", मनोज तिवारींचा जोरदार हल्लाबोल
17
“मोदी सातत्याने महात्मा गांधींचे नाव घेतात, पण अहिंसेचे पालन करत नाहीत”; काँग्रेसची टीका
18
इस्रायलसोबत युद्ध सुरू असतानाच इराणचं मोठं विधान; म्हणाला- नेतन्याहू या शतकातील 'नवा हिटलर, तर भारत..."
19
“भाजपाने आधीच हार मानली, २०२४ च्या विधानसभेला मविआचेच सरकार येणार”; नाना पटोलेंचा दावा
20
Gold Price Review: सोन्यापेक्षा चांदी अधिक महागली, महिन्याभरात ७१०२ रुपयांनी वाढली किंमत; कारण काय?

वेदना कोरोनाच्या : नागपुरात कोरोनाने हिरावले ४७६ बालकांचे आई-बाबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2021 8:18 PM

Corona effect

ठळक मुद्देसहा कुटुंबांत तर आई-वडील दोघेही गेले देवाघरी

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अनेक कुटुंबे उद‌्ध्वस्त केली आहेत. या लाटेत तरुणांचेही जीव गेले आहेत. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आतापर्यंत २२५०च्या वर मृत्यू झाले आहेत. कोरोनाने जिल्ह्यातील ४७० बालकांच्या भविष्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. या बालकांचे कोरोनामुळे आई अथवा वडील गेले आहेत; तर ६ बालकांचे आई-वडील दोघेही देवाघरी गेले आहेत.

घरातील कर्ता पुरुष, स्त्री यांचा मृत्यू कोरोनाने झाला. जीव गमावलेल्यांपैकी अनेकांची मुले १८ वर्षांखालील आहेत. आई-वडिलांपैकी कुणी एक असेल तर त्यांना थोडाफार आधार तरी आहे; पण ज्या बालकांनी आई-वडील दोघेही गमावले, त्यांचे संगोपन व संरक्षणाचा प्रश्न आहे. बालकांच्या या प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयाने सु-मोटो याचिका दाखल करून घेतली. न्यायालयाने सरकारला काही निर्देश दिले. न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्य शासनाने जिल्हास्तरावर कृती दल स्थापन करण्याचे निर्देश दिले. यात जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलीस आयुक्त व ग्रामीणचे अधीक्षक, जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाचे सचिव, जिल्हा बालकल्याण समितीचे अध्यक्ष, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्याधिकारी, जिल्हा माहिती अधिकारी, जिल्हा बालसंरक्षण अधिकारी व जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांचा समावेश केला. जिल्हाधिकारी या कृती दलाचे अध्यक्ष असून, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी हे समन्वयक आहेत. प्रत्येक सदस्याला त्याचे कर्तव्य व जबाबदाऱ्या दिल्या आहेत.

 कृती दल काय करणार

१) ज्या मुलांचे दोन्ही पालक कोरोनाने हिरावले, अशा बालकांना बालगृहात ठेवले जाणार.

२) मुलांच्या संगोपनासह शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी शासनाकडून उचलली जाणार.

३) बालगृहात ठेवलेल्या मुलांच्या आरोग्याची नियमित तपासणी केली जाणार.

४) मुलांची जबाबदारी बाल संरक्षण विभागातील कर्मचाऱ्यांवर सोपविली जाणार.

५) या बालकांचे आर्थिक व मालमत्ताविषयक हक्क अबाधित राहतील याची दक्षता घेतली जाणार.

 जिल्ह्यात निराधार झालेले बालके

आईला गमावलेले - ८७

वडिलांना गमावलेले - ३८३

दोघांनाही गमावलेले - ६

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnagpurनागपूर