२) १० सप्टेंबर २०२१ पर्यंत एकूण किती कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात आले? - ५२४
जिल्हा - नागपूर
कमी केलेले एकूण कर्मचारी - ५२४
डॉक्टर - ७५
नर्स - १८४
शिपाई - ०५ (स्टोअर अधिकारी)
तंत्रज्ञ - ३५
रुग्णवाहिका चालक - ००
इतर - २२५ (चतुर्थ श्रेणी कर्मचारी)
४) हे कर्मचारी कमी केल्यामुळे रुग्णसेवेवर काय परिणाम झाला?
- कोरोनाचे रुग्ण कमी झाले असले तरी मेयो, मेडिकल या शासकीय रुग्णालयात कोरोनाचे पाच ते दहा रुग्ण भरती आहेत. यामुळे त्यांच्या सेवेत डॉक्टरांसह, परिचारिका, तंत्रज्ञ व सफाई कर्मचारी आदी वेगळे मनुष्यळ द्यावे लागत आहेत. यातच ‘नॉन कोविड’चे रुग्ण वाढले आहेत. यांना सेवा देण्यास मनुष्यबळ कमी पडताना दिसून येत आहे.
५) कमी केलेल्या कर्मचाऱ्यांपैकी एखाद्याचा कोट
-इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) ब्रदर म्हणून काम केलेले आदित्य वाघमारे म्हणाले, मेयोमध्ये १०८ नर्स व ब्रदर मिळून कोरोनाच्या रुग्णांची सेवा केली. परंतु शासनाची गरज संपताच त्यांनी आम्हांला काढून टाकले. सध्या आमच्यामधील केवळ १० टक्केच लोकांना दुसरीकडे नोकरी मिळाली असून ९० टक्के लोक नोकरीच्या शोधात आहे. अचानक नोकरी गेल्याने व कुटुंबाची जबाबदारी असल्याने बहुसंख्य जण तणावात आहेत.
६) कमी केलेल्या कर्मचाऱ्यांपैकी एखाद्याची केस स्टडी -
- सुरक्षा रक्षक पुरविणाऱ्या खासगी कंपनीने कोरोना काळात काम नसल्याने अनेकांना कामावरून कमी केले. यात ‘जगदीश’ही बेरोजगार झाला. एका मित्राच्या मदतीने शासकीय रुग्णालयात सफाईचे कंत्राट मिळालेल्या कंपनीत कामाला लागला. सुरुवातीला किळसवाण्या वाटणाऱ्या या कामात त्याने स्वत:ला गुंतवून घेतले. कुटुंबांला कोरोना होऊ नये म्हणून स्लम वसाहतीत एक खोली करून राहू लागला. परंतु कोरोनाचे रुग्ण कमी होताच मागील महिन्यात कंपनीचे कंत्राट संपले. यामुळे हातातील नोकरीही गेली. दोनदा नोकरी गेल्याने तो पुरता खचून गेला आहे.
७) कामावरून कमी केलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना भेडसावणाऱ्या अडचणी
:: १ तारखेला वेतन मिळत नव्हते
:: १५ ते २० दिवस उशीरा वेतन मिळत होते
:: शेवटच्या महिन्यातील १५ दिवसांचे वेतन मिळालेले नाही
:: कायम स्वरुपातील कर्मचारी आपल्या कामांची जबाबदारीही लादत होते
:: सुट्ट्या मिळत नव्हत्या
८) जिल्हा आरोग्य अधिकारी किंवा तत्सम अधिकाऱ्यांचे कोट
महानगरपालिकेच्या इंदिरा गांधी रुग्णालय व आयसोलेशन हॉस्पिटलची रुग्ण क्षमता वाढविण्यात आली आहे. यामुळे यासाठी लागणारे मनुष्यबळ जे मेयो आणि मेडिकलमधून कमी केलेले आहे त्यातून घेण्याचा विचार सुरू आहे. लवकरच यावर निर्णय घेण्यात येईल.
-डॉ. संजय चिलकर, आरोग्य अधिकारी (रुग्णालय) महानगरपालिका नागपूर