लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वेस्टर्न कोलफिल्ड्स लि. (वेकोलि)द्वारे एप्रिल महिन्यासाठी कोळश्याच्या लिलावाच्या दरात १० टक्के कपात करण्यात आली आहे. यामुळे वीज केंद्रांना स्वस्त दरात कोळसा उपलब्ध होईल. वेकोलिने कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या सध्याच्या परिस्थितीमुळे हा निर्णय घेतला आहे.वेकोलिने नोव्हेंबर २०१९ मध्ये आपल्या ६६ पैकी ११ खदानी वीज केंद्रासाठी आरक्षित केल्या होत्या. यात दिनेश, मकरधोकडा-१, गोकुल, भानेगाव, सिंगोरी, पेनगंगा, एकोना, पवनी -२ व ३, मुंगोली, नीलजई आणि गोंडेगाव खदानींचा समावेश आहे. यापूर्वी वीज केंद्रे पूर्ण भारतातील कोळसा खदानीमधून कोळसा घेत होते. त्यामुळे वाहतुकीचा खर्च अधिक येत होता. परंतु वेकोलिच्या या खदानींमधून कोळसा घेत असल्याने वीज केंद्रांचे एका टनामागे हजार रुपये वाचत आहेत. या मोबदल्यात वीज केंद्रांकडून अधिसूचित दरापेक्षा ४५० रुपये अतिरिक्त देण्याची मागणी करण्यात आली आहे. महाराष्ट्र, मध्यप्रदेश, गुजरात, कर्नाटकातील राज्य विद्युत केंद्र आणि इतर खासगी वीज केंद्र या ११ खदानींमधून अॅड ऑन किमतीवर कोळसा घेत आहे. स्पेशल फॉरवर्ड ई-ऑक्शन अंतर्गत या कोळशाचा लिलाव होतो. आता या खदानींमधील स्पेशल फॉरवर्ड तथा स्पॉट ई-ऑक्शनच्या दरामध्ये १० टक्के कपात करण्यात आली आहे.
कोरोनाचा परिणाम : एक महिन्यासाठी कोळसा स्वस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2020 11:33 PM
वेस्टर्न कोलफिल्ड्स लि. (वेकोलि)द्वारे एप्रिल महिन्यासाठी कोळश्याच्या लिलावाच्या दरात १० टक्के कपात करण्यात आली आहे. यामुळे वीज केंद्रांना स्वस्त दरात कोळसा उपलब्ध होईल.
ठळक मुद्देवेकोलिने घेतला निर्णय