शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
2
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
3
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
4
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
5
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
6
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
7
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
8
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
9
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
10
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
11
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
12
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
13
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
14
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
15
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
16
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
17
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
18
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
19
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...

कोरोना इफेक्ट! पौरोहित्य करणारे आर्थिक संकटाच्या फेऱ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2020 6:00 AM

धार्मिक अनुष्ठानाने घराघरांना देवळांची चमक देणाऱ्या या पौरोहित्य करणाऱ्या वर्गावर उपासमारीचे संकट ओढवले आहे. कोरोनाच्या संक्रमणामुळे पुरोहितवर्गही हवालदिल झालेला आहे.

ठळक मुद्देना भिक्षुकी-दक्षिणा, ना घरात अन्नाचा दाणाघरोघरी होणारे नैमित्तिक विधी स्थगित!

प्रवीण खापरेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : घरोघरी धार्मिक अनुष्ठानांच्या माध्यमातून भक्तीचे दीप उजळविणारे भिक्षुक लॉकडाऊनमुळे संकटात सापडले आहेत. धार्मिक अनुष्ठानाने घराघरांना देवळांची चमक देणाऱ्या या पौरोहित्य करणाऱ्या वर्गावर उपासमारीचे संकट ओढवले आहे. कोरोनाच्या संक्रमणामुळे पुरोहितवर्गही हवालदिल झालेला आहे.साधारणत: एकट्या नागपुरात पाच ते सात हजार प्रत्यक्ष पौरोहित्य करणारी मंडळी आहे. पौरोहित्यावरच ही मंडळी आपले संपूर्ण आयुष्य घालवते. मौंज, विवाह, वास्तूशांती, सत्यनारायण पूजनापासून ते अंत्यसंस्कार करण्यापर्यंत प्रत्येकाचे पुरोहित वेगळे आहे. मात्र, लॉकडाऊनमुळे सगळेच घरातल्या घरात बंद झाले आहेत. सगळे सोहळे, अनुष्ठाने रद्द झाली आहेत. गुढीपाडवा, रामनवमी, हनुमान जयंती आणि अक्षयतृतीया यासारख्या पौरोहित्यासाठी अत्यंत महत्त्वाचे सण याच लॉकडाऊनमध्ये निघून गेले. या मुहूर्तांवर यज्ञादी अनुष्ठानांचे अत्याधिक महत्त्व असते. एप्रिल, मे आणि जून हे सर्वसामान्य जनतेच्या दृष्टिकोनातून विवाहसोहळ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे असतात. ते सगळे सोहळे रद्द अथवा स्थगित झाले. या सगळ्यांमध्ये पुरोहितवर्ग अत्यंत महत्त्वाचा असतो. एकातºहेने हे सगळे सोहळे, अनुष्ठाने रद्द झाल्याने यातून मिळणाऱ्या दक्षिणा व भिक्षुकीपासून पुरोहितवर्ग वंचित झाला आहे. त्याचा फटका संपूर्ण वर्षभर बसणार असल्याने हा वर्ग चिंतित आहे. पूजाविधी नाही म्हणून दक्षिणा व भिक्षुकी नाही आणि म्हणून संकटाची स्थिती यांच्यावर ओढवल्या गेली आहे.मुहूर्त गेला तो परत येणार नाही - स्वप्निल लांबडे: पूजन, विवाह, मौंज, वास्तू असे सोहळे मुहूर्तावर केले जातात आणि म्हणूनच पुरोहितांची गरज भासते. हे मुहूर्त निघून गेल्यावर ते मुहूर्त पुन्हा येणार नाही. त्यामुळे आता न झालेले कार्य पुढे करावे, असेही होणार नाही, शिवाय या सगळ्यांवर पुरोहितवर्ग जगत असतो. काही तर अत्यंत गरीब आहेत. बऱ्याचदा एका मुहूर्ताला १० कामे एकसाथ येत असतात आणि पुढचे १० दिवस काहीच काम नसते. आता तर संपूर्ण महिना उलटून गेला. अशास्थितीत केवळ याच कामावर जगणारा आमचा पुरोहित उपासमारीशी झुंजत असल्याचे स्वप्निल लांबडे गुरुजी यांनी ‘लोकमत’कडे सांगितले. 

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस