शहरं
Join us  
Trending Stories
1
सारे अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात, मुकेश अंबानींनी तर अमेरिकेतच पैसा ओतला... मोठी डील...
2
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
3
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
4
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
5
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
6
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
7
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
8
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
9
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
10
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
11
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
12
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
13
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
14
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
15
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
16
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
17
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
18
SA vs SL Test : श्रीलंकेचा संघ ४२ धावांत All Out! ६४ ओव्हर्समध्ये पडल्या २० विकेट्स
19
'ये है मोहोब्बते' फेम अभिनेत्याचा झाला साखरपुडा, होणाऱ्या बायकोसाठी लिहिली सुंदर पोस्ट
20
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम

कोरोनामुळे झाला फायदा, मुलांना द्यायचे संस्कार पाठ झाले बळकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 4:09 AM

- शुभंकरोती प्रार्थना, नमाज पठण अन् बायबलचे धडे गिरवायला लागली मुले लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोना संक्रमणामुळे गेल्या ...

- शुभंकरोती प्रार्थना, नमाज पठण अन् बायबलचे धडे गिरवायला लागली मुले

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोरोना संक्रमणामुळे गेल्या दीड वर्षापासून शाळा बंद आहेत. शाळा बंद असल्या तरी ऑनलाईन शिक्षण, मुलांच्या परीक्षा सर्व सुरूच आहेत. मात्र, याचा परिणाम म्हणून मुलांना आपल्या पालकांसोबत भरपूर वेळ मिळत आहे. त्याचा लाभ म्हणजे, पुस्तकी शिक्षणात रमलेल्या मुलांना आपल्या धार्मिक व सांस्कृतिक परिपाठाकडे वळविण्यावर होत असल्याचे दिसून येत आहे. विविध धर्म - पंथीय लोक आपापल्या परंपरेनुसार मुलांमध्ये संस्कार रुजविण्याचे सोपस्कार पार पाडायला लागले आहेत. त्यात शुभंकरोती पाठ, अथर्वशिर्ष पाठ, मनाचे श्लोक, नमाज पठण, कलमा पठण, बायबल वाचन आदींबाबत मुले जागरूक व्हायला लागली आहेत.

--------------

प्रत्येक धर्मात संस्कारांचे धडे

हिंदू (वैदिक) - हिंदू म्हणा वा वैदिक धर्मात बाल्यसंस्काराला अतिशय महत्त्व दिले आहे. बाल्यावस्थेत देण्यात येणाऱ्या प्राथमिक संस्कारात सकाळ - संध्याकाळ भगवंताकडे आपल्याला हे जीवन दिल्याचे आभार मानून सर्व सृष्टीचे कल्याण करण्याची विनवणी केली जाते. आई, वडील, आजी, आजोबा यांना ईश्वरस्थानी मानण्यात आले आहे. बाल्यावस्थेतील प्रत्येक संस्कारात ‘वसुधैव कुटुंबकम’ हे तत्त्व प्रमाण मानले गेले आहे.

मुस्लिम - मुलांना बाल्यावस्थेपासूनच त्यांचे किरदार (व्यक्तिमत्त्व) घडविण्याचे संस्कार दिले जातात. एका व्यक्तिचा आदर करणे, त्याचे रक्षण करणे म्हणजेच संपूर्ण मानवजातीचा आदर, रक्षण करणे, हा भाव बाल्यावस्थेतच रुजवला जातो. शिक्षणावर भर दिला जातो आणि कुरआनमधील तत्त्वांचे आजीवन पालन करण्याची तालिम दिली जाते. मुस्लिमांमध्ये तालिमला अतिशय महत्त्व आहे. तुमच्या अस्तित्त्वाने समाजात आनंद पसरावा आणि सर्व आनंदी राहावेत, हा भाव रुजवला जातो. आईच्या पायाखाली जन्नत (स्वर्ग) असल्याचा भाव सांगितला जातो.

ख्रिश्चन - मुलांमध्ये ईश्वराविषयीची ओढ निर्माण केली जाते. सर्वप्रथम ईश्वर आहे आणि बायबलद्वारे त्याचा गजर करायचा आहे, याचे भान प्रदान केले जाते. यासोबतच दैनंदिन प्रार्थना, बायबलचे पठण, आई-वडिलांसोबतच थोरा-मोठ्यांसोबत कसे वागावे, दीन-दुबळ्यांशी कसे वर्तन असावे, समाजाला आपल्याकडून काय देता येईल, आदी वर्तनांवर भाष्य करत त्यांना त्यासाठी प्रोत्साहित केले जाते.

--------------------

पुजारी म्हणतात...

मुलाचे पाय पाळण्यात दिसतात, हे खरे आहे तरी संस्कारांमुळे मुलगा भविष्यात कसले कर्तृत्त्व गाजवेल, हे ठरवता येते. देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो, याचे भान संस्कारातून येते. हे भान जागवणे म्हणजेच संस्कार होय. त्यामुळे, आपल्या पुरातन परंपरा, प्रार्थना, वेद - उपनिषदांतील तत्त्व मुलांना समजावण्यासाठी अगदी प्राथमिक बाबी महत्त्वाच्या ठरतात. शाळा बंद असल्याने, मुले घरी आहेत आणि पालक आपले प्राचीन संस्कार रुजवत आहेत, ही उत्तम बाब आहे.

- स्वप्नील लांबडे

मौलाना म्हणतात...

मुले भविष्यातील नागरिक आहेत आणि एक उत्तम नागरिक म्हणून उभा राहण्यासाठी तो एक उत्तम मनुष्य होणे गरजेचे आहे. त्यासाठी त्याला संस्कार हे महत्त्वाचे ठरतात. मुस्लिम धर्म हीच बाब हेरतो आणि त्याअनुषंगाने मदरसे, घरात धार्मिक वातावरण असण्यावर भर देतो. धर्माचे महत्त्व अतिवादी नाही, ही भावना त्याच्यात प्रथम निर्माण केली जाते. सध्या मदरसे बंद आहेत. मात्र, त्याचा लाभ मुले घरीच धार्मिक तालिम घेत आहेत. पालकही त्यात पुढाकार घेत आहेत, हे उत्तमच.

- मौलाना निजामुद्दीन निजाम

फादर म्हणतात...

आत्मविश्वासाने मुले पुढे जावीत आणि एक उत्तम नागरिक बनावे, हा भाव महत्त्वाचा आहे. शालेय शिक्षणात या बाबी आहेत. मात्र, त्याचे संस्कार घरातूनच मिळतात. त्याअनुषंगाने बायबल, ईश्वर यावर विश्वास वाढविण्यासाठी पालक सध्या लॉकडाऊनचा लाभ घेत आहेत. मुलांना चर्चकडून ऑनलाईन सत्रांतून मार्गदर्शन केले जात आहे. त्यासाठी प्रत्येक शनिवारी लहान - लहान व्हिडिओ पाठवून त्यांच्या मनात धार्मिक बाबींविषयी ओढ निर्माण केली जात आहे.

- फादर थॉमस जोसेफ

.......................