शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्षाध्यक्ष मी अन् यांनी कसे काय तिकीट दिले?;शरद पवारांनी उडवली अजित पवारांची खिल्ली
2
"मुख्यमंत्री नाही, पण ५ मिनिटांसाठी तरी पंतप्रधान होणार", महादेव जानकरांनी व्यक्त केला विश्वास 
3
अभिनेत्री कश्मीरा शाहचा भीषण अपघात, रक्ताने माखले कपडे; नेमकं काय घडलं?
4
"कुटुंबातील महिलांमध्ये वाद निर्माण करण्याची काँग्रेसची योजना", 'गृहलक्ष्मी'वरून चित्रा वाघ यांचा निशाणा
5
Basmath Vidhan Sabha 2024: दोन राष्ट्रवादीत लढत! जयप्रकाश दांडेगावकर vs राजू नवघरे रिंगणात... गुरूच्या विरोधात शिष्य!
6
दादर-माहीमची निवडणूक अटीतटीची होईल की एकतर्फी? अमित ठाकरे म्हणाले, "मी तुम्हाला..."
7
शाळांच्या सुट्टीबद्दल शिक्षण आयुक्तालय आणि महापालिकेचा परस्परविरोधी निर्णय
8
'मुन्नाभाई MBBS'मधला स्वामी आता दिसतो खूपच वेगळा, लेटेस्ट फोटो पाहून चाहते झाले अवाक्
9
Fact Check: 'जर्सी नं. 7' धोनीच्या सन्मानार्थ RBI ७ रुपयांचं नाणं आणणार?; व्हायरल दाव्यामागील सत्य वेगळंच
10
Maharashtra Election 2024 Live Updates: महाराष्ट्राची निवडणूक ही विचारसरणीची निवडणूक- राहुल गांधी
11
खासगी विमान, ३० हून अधिक लक्झरी कार्स, परदेशात मालमत्ता; नायजेरियाच्या राष्ट्रध्यक्षांची संपत्ती किती?
12
विलंबामुळे वाढले टेन्शन, हुकणार होती लग्नाची गाडी; मुंबईवरून निघालेल्या नवरदेवासाठी थांबविली रेल्वे!
13
ऑनलाइन तेल पडले महागात! अमेरिकेत मुलाची केस गळती, वाशीतल्या वडिलांना लाखोंचा गंडा
14
कैलाश गहलोत भाजपात जाणार, रविवारी दिला होता मंत्रिपदासह आपचा राजीनामा
15
संजय निरुपम यांनाच वोट करा! जान्हवीचा व्हिडिओ पाहून चाहत्यांचा संताप, म्हणाले- "किती पैसे मिळाले?"
16
Sankashti Chaturthi 2024: तुमचा आज संकष्टीचा उपास आहे? जाणून घ्या चंद्रोदयाची वेळ आणि नियम!
17
एकावर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' कंपनी; शेअरमध्ये तुफान तेजी, कोणता आहे हा स्टॉक?
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी पुढील निवडणूक पाहणार की नाही..."; रोहिणी खडसेंसाठी एकनाथ खडसेंची भावनिक साद
19
जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार 
20
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 

कोरोनाचा कहर, ३,३७० पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 4:08 AM

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : जिल्ह्यात कोरोनाची स्थिती आणखी गंभीर होत असून बुधवारी तर बाधितांच्या संख्येचा नवा रेकॉर्डच झाला. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : जिल्ह्यात कोरोनाची स्थिती आणखी गंभीर होत असून बुधवारी तर बाधितांच्या संख्येचा नवा रेकॉर्डच झाला. २४ तासांत जिल्ह्यामध्ये तब्बल ३ हजार ३७० पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली; तर मृत्यूचा आकडा १६ इतका होता. लॉकडाऊन लावल्यानंतरदेखील साथ नियंत्रणात येत नसल्याचे चित्र असून दुसरी लाट आणखी धोकादायक ठरण्याची शक्यता वैद्यकीय तज्ज्ञांकडून वर्तविण्यात येत आहे.

सप्टेंबर २०२० मध्ये कोरोनाचा रुग्णसंख्येने उच्चांक गाठला होता. त्यानंतर रुग्णसंख्या कमी होऊ लागली. नोव्हेंबर महिन्यात दैनंदिन रुग्णसंख्या ५०पर्यंत आली होती. मात्र, फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून रुग्णसंख्या वाढायला लागली. मागील काही दिवसांपासून तर सातत्याने रुग्णसंख्या वेगाने वाढते आहे. अगोदर दररोज पाचशे, मग हजार, त्यानंतर दोन हजार व आता तर थेट सव्वातीन हजारांहून अधिक आकडा झाला आहे. नागपूर जिल्ह्यात रुग्णांची एकूण संख्या १,७८,७५६, तर मृतांची संख्या ४,५०५ वर पोहोचली आहे.

चाचण्यांचेही रेकॉर्ड, शहरात २,२६८ रुग्ण

नागपूर जिल्ह्यात मंगळवारी १५ हजार संशयित रुग्णांच्या चाचण्या करण्यात आल्या. यातून शहरातील २,६६८ , तर ग्रामीणमधील ६९९ रुग्ण पॉझिटिव्ह आले. जिल्ह्याबाहेरील रुग्णांचाही यात समावेश आहे. मृतांमध्ये शहरातील ८, ग्रामीणमधील पाच, तर जिल्ह्याबाहेरील तीन रुग्णांचे मृत्यू झाले. शहरात रुग्णांची एकूण संख्या १,४२, ८३९ व मृत्यूची संख्या २,८९४ झाली. ग्रामीणमध्ये बाधितांची संख्या ३४९३० झाली असून, ८०६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सक्रिय रुग्ण २१ हजारांपार

सक्रिय रुग्णसंख्येनेदेखील नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. सद्य:स्थितीत नागपूर जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या २१ हजार ११८ इतकी झाली आहे. यातील १७ हजार १७० रुग्ण नागपूर शहरातील आहेत. विविध सरकारी व खासगी रुग्णालयांत ६,१४१ रुग्ण दाखल आहेत. दिवसभरात १ हजार २१६ रुग्ण बरे झाले.

कोरोनाची आकडेवारी

दैनिक चाचण्या : १५,०००

एकूण बाधित रुग्ण :१,७८,७५६

सक्रिय रुग्ण : २१,११८

बरे झालेले रुग्ण : १,५३,१३३

एकूण मृत्यू : ४,५०५

बेजबाबदार नागरिक, ढिसाळ प्रशासन

कोरोनाबाधितांचे आकडे वाढत असल्याने लॉकडाऊन लावण्यात आले. मात्र शहरातील अनेक भागांत नागरिक विनामास्कचे कामाशिवाय फिरताना दिसून येत आहे. अनेकजण तर सायंकाळी घराजवळ घोळका करून गप्पा मारतात. मात्र पोलिसांकडून अंतर्गत भागात हवे तसे पेट्रोलिंग वाढविण्यात आलेले नाही. शिवाय महापालिकेच्या पथकांकडूनदेखील दंडवसुलीवरच जास्त भर दिसून येत आहे. प्रशासनाचा कुठलाही वचक नसल्यानेच सुपर स्प्रेडर्स खुलेआमपणे फिरत आहेत.