सुमेध वाघमारे
नागपूर : विदर्भातील ११ जिल्ह्यांमध्ये १५ ते ३१ जानेवारीदरम्यान १,०१,४२५ रुग्णांची नोंद झाली असताना, १ ते ६ फेब्रुवारी या सहा दिवसात २२,६९२ रुग्ण पॉझिटिव्ह आले. तब्बल ७७.६२ टक्क्याने रुग्णात घट आली. शिवाय मृत्यूमध्येही ६० टक्क्याने घट आल्याचे दिसून येत आहे.
नागपूर जिल्ह्यात १५ ते ३१ जानेवारीपर्यंत ५४,७७६ रुग्ण, १२० मृत्यू, भंडारा जिल्ह्यात ५,०७५ रुग्ण, ४ मृत्यू, वर्धा जिल्ह्यात ५,६२९ रुग्ण, ९ मृत्यू, गोंदिया जिल्ह्यात ३,१२१ रुग्ण, ६ मृत्यू, चंद्रपूर जिल्ह्यात ७,०१० रुग्ण, ६ मृत्यू, गडचिरोली जिल्ह्यात ३,२०१ रुग्ण, ७ मृत्यू, अकोला जिल्ह्यात ४,५५२ रुग्ण, १३ मृत्यू, अमरावती जिल्ह्यात ६,३६७ रुग्ण, १४ मृत्यू, यवतमाळ जिल्ह्यात ३,९१४ रुग्ण, ४ मृत्यू, बुलढाणा जिल्ह्यात ५,४८३ रुग्ण, ३ मृत्यू, तर, वाशिम जिल्ह्यात २,२९७ रुग्ण, १ मृत्यू असे एकूण १,०१,४२५ रुग्ण व १८७ मृत्यूची नोंद झाली असताना, मागील सहा दिवसांत या ११ जिल्ह्यांमध्ये २२,६९२ रुग्ण, ७५ रुग्णांचे जीव गेले. रुग्णसंख्येच्या तुलनेत मृत्यूच्या संख्येत कमी घट झाल्याचे विदर्भातील चित्र आहे.