शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
3
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
4
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
5
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
6
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
7
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
8
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
9
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
10
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
11
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
12
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
13
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
14
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
15
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
16
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
17
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
18
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
19
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
20
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!

भाजपाशासित राज्यांमध्येच कोरोना रूग्णांच्या आकड्याची लपवाछपवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 6:04 PM

Nagpur News भाजपा शासित राज्यांमध्येच आकड्यांची लपवाछपवी सुरू आहे, असा आरोप मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केला.

ठळक मुद्देसंभाव्य तिसऱ्या लाटेच्या मुकाबल्यासाठी राज्य सरकार सज्ज

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राज्यात कोरोना संक्रमित रुग्णांचे प्रमाण अधिक आहे, कारण येथे चाचण्या मोठ्या प्रमाणावर होत आहेत. महाराष्ट्रात आकड्यांची कसलीही बनवाबनवी नाही. या उलट भाजपा शासित राज्यांमध्येच आकड्यांची लपवाछपवी सुरू आहे, असा आरोप मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केला.महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांचे आकडे आभासी असल्याची टीका विरोधी पक्षाकडून होत असल्याबद्दल पत्रकारांनी प्रश्न विचारला असता वडेट्टीवार म्हणाले, महाराष्ट्रातील आकडे आभासी नाहीत, उलट खरे आहेत. रुग्णांच्या आकड्याची कसलीही लपवाछपवी महाराष्ट्रात नाही. आरटिपीसीआर चाचण्यांवर अधिक भर असल्यामुळे रुग्ण संख्या अधिक दिसत आहे. त्यांच्यावरील उपचारासाठी राज्य सरकारचे नियोजन सुद्धा सुरू आहे. याउलट भाजपशासित राज्यातील स्थिती आज अत्यंत वाईट आहे.  उत्तर प्रदेशातील एका आमदाराच्या पत्नीला उपचारात अडचण आल्यामुळे संबंधित आमदार रडत असल्याचे चित्र सोशल मीडियावर दिसत आहे. यावरून परिस्थिती समजून घ्यावी.केंद्र सरकारने राज्यसरकारला लस आणि ऑक्सिजनसाठी मदत केली असे सांगितले जात असले, तरी राज्य सरकारने त्यासाठी केंद्राला पैसे मोजले आहेत. राष्ट्रप्रमुख या नात्याने पंतप्रधान यांनी महाराष्ट्राला निधी दिला असेल तरी महाराष्ट्राने केंद्राला दिलेला महसूल देखील अधिक आहेत हे लक्षात घ्यावे.

25 हजार मेट्रिक टन ऑक्सीजन साठवणुकीचे प्रयत्नसंभाव्य तिसऱ्या लाटेच्या मुकाबल्यासाठी राज्य सरकार सज्ज आहे. यासाठी 800 कोटी रुपये खर्च करून ऑक्सिजन घेण्यात आला आहे. 1,600 टनांपर्यंत ऑक्सिजनची मागणी जाण्याची शक्‍यता असल्याने त्यादृष्टीने नियोजन केले जात आहे. राज्यभर ऑक्सीजन प्लांट उभारण्याचे प्रयत्न सुरू असून तसे काम देखील सुरु झाले आहे. ऑक्सिजनची गरज लक्षात घेऊन 25 हजार मेट्रिक टन ऑक्सीजन साठवणुकीचे प्रयत्न सुरू आहेत. संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी सरकार सज्ज असून नियोजन केले आहे. गावागावांमध्ये खनिज विकास निधीतून आयसोलेशन सेंटर उभारण्यासाठी सुरुवात केली आहे. त्यामुळे गावातच रुग्णांची वैद्यकीय गरज पूर्ण होईल.लसीकरण वेगाने वाढावे यासाठी नियोजन सुरू आहे. लस उत्पादक कंपन्यांसोबत करार करण्याचे काम सुरु आहे.

टॅग्स :Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवार