शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
3
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
4
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
5
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
6
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
7
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
8
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
9
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
10
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
11
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
12
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
13
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
14
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
15
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
16
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
17
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
20
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान

मनुष्यबळाअभावी कोरोना रुग्णांना मिळत नाहीत रुग्णालयात खाटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2020 9:24 PM

सरकारी व खासगी या दोन्ही प्रकारच्या रुग्णालयांमध्ये मनुष्यबळाची कमतरता आहे. त्यामुळे या रुग्णालयांचा पूर्ण क्षमतेने उपयोग करता येत नाही. परिणामी, सर्व कोरोनाबाधित रुग्णांना या रुग्णालयांमध्ये भरती होण्यासाठी खाटा उपलब्ध होत नाहीत. ही समस्या सोडविण्यासाठी मनुष्यबळ वाढवणे आवश्यक आहे. तसेच, नागपुरातील रुग्णालयांवर संपूर्ण विदर्भासह मध्य प्रदेशातील कोरोनाबाधित रुग्णांचा ताण आहे. ही बाबदेखील खाटा अनुपलब्धतेसाठी कारणीभूत ठरते अशी माहिती महानगरपालिकेने सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला दिली.

ठळक मुद्देमनपाची हायकोर्टात माहिती : नागपूरबाहेरचे रुग्णही ठरताहेत कारणीभूत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सरकारी व खासगी या दोन्ही प्रकारच्या रुग्णालयांमध्ये मनुष्यबळाची कमतरता आहे. त्यामुळे या रुग्णालयांचा पूर्ण क्षमतेने उपयोग करता येत नाही. परिणामी, सर्व कोरोनाबाधित रुग्णांना या रुग्णालयांमध्ये भरती होण्यासाठी खाटा उपलब्ध होत नाहीत. ही समस्या सोडविण्यासाठी मनुष्यबळ वाढवणे आवश्यक आहे. तसेच, नागपुरातील रुग्णालयांवर संपूर्ण विदर्भासह मध्य प्रदेशातील कोरोनाबाधित रुग्णांचा ताण आहे. ही बाबदेखील खाटा अनुपलब्धतेसाठी कारणीभूत ठरते अशी माहिती महानगरपालिकेने सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला दिली.यासंदर्भात उच्च न्यायालयात जनहित याचिका प्रलंबित आहे. त्यात उच्च न्यायालयाने गेल्या तारखेला शहरात किती रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णांवर उपचार केले जातात व त्या रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णांसाठी किती खाटा उपलब्ध आहेत याची माहिती सादर करण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार महानगरपालिकेने न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करून यासंदर्भात विस्तृत माहिती दिली. सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार, कोरोनाबाधित रुग्णांची कमी गंभीर, मध्यम गंभीर व जास्त गंभीर अशा तीन गटात विभागणी केली जाते. घरात विलिगीकरण करणे शक्य नसलेल्या कमी गंभीर रुग्णांना कोविड केअर सेंटरमध्ये भरती केले जाते. महानगरपालिकेने आमदार निवास, पाचपावली पोलीस क्वॉर्टर व व्हीएनआयटी येथे असे कोविड केअर सेंटर सुरू केले आहे. तसेच, व्हीएनआयटी व सिम्बॉयसिस येथे दोन नवीन सेंटर सज्ज होत आहेत. या पाचही सेंटरमध्ये एकूण १५२० रुग्णांना भरती केले जाऊ शकते. सध्या या ठिकाणी ३५७ रुग्ण भरती आहेत. मध्यम गंभीर रुग्णांना डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये ठेवले जाते. अशा रुग्णांवर इंदिरा गांधी रुग्णालय येथे उपचार केले जात आहेत. या रुग्णालयात १२० खाटा असून सध्या ३० रुग्ण भरती आहेत. जास्त गंभीर अवस्थेतील रुग्णांसाठी डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलची व्यवस्था करण्यात आली आहे. शहरात एम्स, मेडिकल व मेयोसह ३३ खासगी रुग्णालये डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल आहेत. या ठिकाणी एकूण १५१० खाटा उपलब्ध आहेत. लता मंगेशकर रुग्णालय व शालिनीताई मेघे रुग्णालयातही कोरोना रुग्णांसाठी ५४० खाटा आहेत. याशिवाय ३१ नवीन खासगी रुग्णालयांना कोरोना रुग्णांवर उपचार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या रुग्णालयांत १७०७ खाटा उपलब्ध आहेत अशी माहिती मनपाने दिली आहे. न्यायालयाने हे प्रतिज्ञापत्र रेकॉर्डवर घेऊन प्रकरणावर १० सप्टेंबर रोजी पुढील सुनावणी निश्चित केली. न्यायालय मित्र अ‍ॅड. श्रीरंग भांडारकर यांनी याचिकेचे तर, मनपातर्फे अ‍ॅड. सुधीर पुराणिक यांनी कामकाज पाहिले.नागरिकांना माहिती देण्यासाठी यंत्रणानागरिकांना कोरोना उपचारासाठी उपलब्ध असलेल्या सुविधेची अचूक माहिती मिळावी याकरिता यंत्रणा विकसित करण्यात आली आहे. मनपाद्वारे विकसित डॅशबोर्डवर कोणत्या रुग्णालयांत किती खाटा उपलब्ध आहेत याची माहिती मिळते. ही माहिती कोरोना रुग्णालये नियमित अपडेट करतात. तसेच, नागरिकांना मार्गदर्शन करण्यासाठी कॉल सेंटर व वेबसाईट सुरू करण्यात आली आहे. त्यावरही नागरिकांना आवश्यक माहिती उपलब्ध होते, असे मनपाने प्रतिज्ञापत्रात स्पष्ट केले.सहकारी रुग्णालयात उपचार अशक्यउच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महानगरपालिकेने उत्तर अंबाझरी मार्गावरील नागपूर नागरिक सहकारी रुग्णालयाचे निरीक्षण केले. त्याच्या अहवालानुसार, या रुग्णालयाची इमारत जीर्ण झाली असून तिचे स्ट्रक्चरल ऑडिट करणे आवश्यक आहे. रुग्णालयात कोरोना उपचारासाठी आवश्यक पायाभूत सुविधा, मानुष्यबळ व उपकरणे नाहीत. हे रुग्णालय पाच वर्षांपासून कार्यरत नाही. त्यामुळे या रुग्णालयाचा सध्या कोविड सेंटर म्हणून उपयोग केला जाऊ शकत नाही. त्यासाठी आवश्यक सुधारणा करणे गरजेचे असून त्याला मोठा खर्च लागणार आहे, असे मनपाच्या प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले.मनुष्यबळ भरतीसाठी जाहिरातमहानगरपालिकेने तज्ज्ञ डॉक्टर, एमबीबीएस डॉक्टर, नर्सिंग कर्मचारी व अर्ध वैद्यकीय कर्मचारी भरतीसाठी जाहिरात दिली आहे. त्यानंतर एकही तज्ज्ञ डॉक्टरने अद्याप अर्ज केला नाही. परंतु, पाच एमबीबीएस डॉक्टरचे अर्ज आले आहेत. तसेच, इतर कर्मचाऱ्यांनी पुरेशा संख्येत अर्ज केले आहेत, अशी माहिती न्यायालयाला देण्यात आली.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयcorona virusकोरोना वायरस बातम्या