शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
3
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
4
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
5
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
6
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
7
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
8
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
9
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
10
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
11
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
12
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

कोरोनाचा पुन्हा धोका; कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 4:08 AM

मनपा आयुक्त राधाकृष्णन बी यांचे निर्देश लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नागपुरात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत असून कोविड-१९ ...

मनपा आयुक्त राधाकृष्णन बी यांचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : नागपुरात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत असून कोविड-१९ बाधित रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. नियंत्रणासाठी पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांची कोरोनाची चाचणी करणे आवश्यक आहे. यासाठी कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवा, असे निर्देश मनपा आयुक्त राधाकृष्णन बी यांनी गुरुवारी वरिष्ठ अधिकारी, वैद्यकीय अधिकाऱ्यांंना बैठकीत दिले.

सध्या ॲक्टिव्ह कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २,५०० पर्यंत झाली आहे. दररोज २०० ते ३०० बाधित होत आहेत. कोणत्याही परिस्थितीत कोरोना रुग्णसंख्या कमी झाली पाहिजे. यासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे. मनपा आयुक्तांनी नागरिकांना सामाजिक अंतराचे पालन करणे, सॅनिटायझरचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. सोबतच त्यांनी कोरोना चाचणीची संख्या वाढविण्याचेही आदेश दिले. तसेच मास्कचा वापर न करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश उपद्रव शोध पथकाला दिले. बैठकीत अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा, राम जोशी, संजय निपाणे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर, डॉ. नरेंद्र बहिरवार, डॉ. टिकेश बिसेन आदी उपस्थित होते.

...

संपर्कात येणाऱ्यांनी चाचणी करावी

घरातील घरकाम करणाऱ्या महिला, दूध, भाजी विक्रेता, जेवण तयार करणारे, वाॅचमन, दुकानदारांची ज्यांचा कामानिमित्त असंख्य लोकांशी संपर्क येतो अशा सर्वांनी वेळोवेळी कोरोनाची चाचणी करावी, तसेच ज्या नागरिकांची रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट जर निगेटिव्ह आली परंतु त्यांना जर लक्षणे असतील तर त्यांची आरटीपीसीआर चाचणी त्याच केंद्रावर करण्यात यावी, असे आवाहन आयुक्तांनी केले आहे.

...

खासगी रुग्णालयांनी काळजी घ्यावी

खासगी रुग्णालयामध्ये भरती असलेल्या रुग्णांची प्रकृती जास्त बिघडली तर त्याला मेयो किंवा मेडिकल रुग्णालयात पाठविले जाते, असे निदर्शनास आले आहे. खासगी रुग्णालयांनी तसे न करता कोरोना रुग्णांची स्वत:च्या रुग्णालयात काळजी करायला पाहिजे आणि त्याच्यावर चांगले उपचार करून त्याला वाचविण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन केले.

...

पोलीस आयुक्तांशी चर्चा

मनपा आयुक्त राधाकृष्णन बी यांनी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्यासोबत दूरध्वनीवरून चर्चा केली आणि त्यांना मास्कचा वापर न करणारे, सामाजिक अंतराचे पालन न करणाऱ्या नागरिकांविरुद्ध कारवाई करण्याचे निवेदन केले. मिशन बिगीन अगेन लागू झाल्यानंतर नागरिकांनी स्वत:ची काळजी घेणे कमी केले आहे, त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. पोलीस आयुक्तांनी याबाबत कार्यवाही करण्यात येणार असल्याचे सांगितले.

....

आयुक्तांचे आवाहन

-कोरोना विरुद्धच्या लढाईत स्वत:चे योद्धा बना.

- घराबाहेर पडताना मास्क वापरा, सामाजिक अंतराचे पालन करा,

- वेळोवेळी हात स्वच्छ धुवा.

-ज्येष्ठ नागरिकांना घराच्या बाहेर पडू देऊ नका.

- कोरोनाचा प्रसार रोखण्याची प्रशासन आणि नागरिकांनी जबाबदारी घ्यावी.