सुमेध वाघमारेनागपूर : दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढताना दिसून येत आहेत. गुरुवारी २२ रुग्णांची नोंद झाली. सहा महिन्यानंतरची ही एका दिवसातील सर्वाधिक नोंद आहे. मागील चार दिवसांत कोरोनाने अर्धे शतक गाठल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. नागपूर जिल्ह्यात गुरुवारी २४२ कोरोनाच्या चाचण्या झाल्या. त्या तुलनेत ९ टक्के रुग्ण पॉझिटिव्ह आले. यात १५ रुग्ण शहरातील असून ६ रुग्ण ग्रामीण भागातील तर १ रुग्ण जिल्हाबाहेरील आहे. सध्या ७२ रुग्ण अॅक्टीव्ह आहेत. यातील ४९ रुग्ण शहरातील, १९ रुग्ण ग्रामीणमधील तर ४ जिल्हाबाहेरील आहेत. ५३ रुग्ण शासकीयसह विविध खासगी रुग्णालयात उपचाराखाली आहेत. मागील चार दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या ५२वर पोहचली. तीन वर्षातील रुग्णांची एकूण संख्या ५ लाख ८७ हजार ५४८ झाली असून मृतांची संख्या १० हजार ३५८वर स्थिर आहेत.
चार दिवसांत कोरोनाने गाठले अर्धे शतक; ७२ रुग्ण अॅक्टीव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2023 9:37 PM