लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना लॉकडाऊनचा परिणाम सर्वच उद्योगधंद्यावर पडला आहे. आईस्क्रीम उद्योगही त्यातून सुटला नाही. उत्पादक कंपन्यांपासून विक्री करणाऱ्या आईस्क्रीम पार्लरपर्यंत सर्वांना आर्थिक फटका बसला आहे. लॉकडाऊनमुळे या उद्योगाला उन्हाळ्यात ७० टक्के अर्थात विक्रीत ३५० कोटींचे नुकसान झाले आहे. ते भरून निघणे कठीण असल्याचे मत पार्लरच्या संचालकांनी व्यक्त केले.आईस्क्रीम उद्योगाचा पीक सिझन मार्चपासून सुरू होऊन जूनच्या अखेरपर्यंत चालतो. आईस्क्रीमची मागणी वाढण्यापूर्वीच कोरोना लॉकडाऊनने ठप्प झाली. शासनाच्या आदेशानुसार सर्व दुकाने बंद झाली. दोन महिन्याच्या लॉकडाऊनमुळे आर्थिक तोटा भरून निघणे कठीण आहे. जून महिन्यातही दुकाने बंद राहण्याची शक्यता आहे. यामुळे यावर्षीचा गर्मीचा सिझन विक्रीविना जाणार आहे. विक्रीच नसल्यामुळे आईस्क्रीम कंपन्यांनीही उत्पादन बंद केले तर काहींनी थोडेफार सुरू ठेवले. परराज्यातील कंपन्यांच्या आईस्क्रीमची नागपुरात आवक झालीच नाही. त्याचा परिणाम असा की, आईस्क्रीम निर्मितीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाला मागणी नाहीच. कंपन्या बंद झाल्याने हजारो कामगार बेरोजगार झालेत. याशिवाय विक्री पार्लरमधील कर्मचाऱ्यांचा रोजगार हिरावला. या उद्योगातील सर्वच रोजगार ठप्प झाला.सिझनमध्ये होते वर्षभराची कमाईमार्च महिन्यात दहा दिवस आणि एप्रिल व मे महिन्याचा व्यवसाय ठप्प झाल्याने थोडीफार कमाई नव्हे तर आईस्क्रीम पार्लरमधील फ्रीजरच्या देखरेखीसाठी अतिरिक्त खर्च आणि विजेचे बिल भरावे लागत आहे. या व्यवसायात वर्षभराची कमाई उन्हाळ्याच्या तीन महिन्यात होते. पुढे लग्नसराई आणि समारंभ वगळता पावसाळा आणि हिवाळ्यात विक्री होणार नाही. नागपुरात ५०० पेक्षा जास्त आईस्क्रीम पार्लर आहेत. या सर्वांना नुकसान सोसावे लागत आहे. उन्हाळ्याचा सिझन पाहता कंपन्यांनी पूर्वीच कच्च्या मालाची खरेदी केली होती. तो माल खराब झाला आहे. त्याचाही फटकाही कंपन्यांना बसला आहे.बर्फ कंपन्यांना नुकसानउन्हाळ्यात आईस्क्रीमप्रमाणे बर्फ गोळ्यांनाही मागणी असते. पण यंदा ही दुकाने थाटली नाहीत. त्याचा परिणाम विक्रीवर झाला आणि कंपन्यांनी बर्फ निर्मितीच बंद केली. लग्नसमारंभ नसल्याने मागणीच ठप्प झाली आहे. कोरोनाच्या संकटातून बाहेर निघण्यास आणखी काही महिने लागतील, असे विक्रेत्यांनी सांगितले.
कोरोनामुळे आईस्क्रीम उद्योग ठप्प : ३५० कोटींचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2020 9:36 PM
कोरोना लॉकडाऊनचा परिणाम सर्वच उद्योगधंद्यावर पडला आहे. आईस्क्रीम उद्योगही त्यातून सुटला नाही. उत्पादक कंपन्यांपासून विक्री करणाऱ्या आईस्क्रीम पार्लरपर्यंत सर्वांना आर्थिक फटका बसला आहे. लॉकडाऊनमुळे या उद्योगाला उन्हाळ्यात ७० टक्के अर्थात विक्रीत ३५० कोटींचे नुकसान झाले आहे.
ठळक मुद्देआईस्क्रीमविना संपूर्ण सिझन