लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपुरातील कोरोनाबाधित रुग्णांच्या निवासापासून तीन किलोमीटर परिसरात सर्व्हेची घोषणा केल्यानंतर लक्ष्मीनगर आणि धरमपेठ झोनअंतर्गत येणाऱ्या सुमारे ५० हजार कुटुंबातील दोन लाख लोकांपर्यंत मनपाच्या आरोग्य विभागाची चमू पोहोचली. आता या दोन झोन व्यतिरिक्त संपूर्ण नागपूर शहरात असा सर्व्हे होणार आहे. यासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.दोन झोनमध्ये सर्व्हे सुरू आहे. आता मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशानुसार सर्व दहा झोनमध्येही हा सर्व्हे करण्यात येणार आहे. कोरोनाविषयक जनजागृती आणि शहरातील आरोग्याची माहिती अशा दुहेरी हेतूने हे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. यासंदर्भात माहिती देताना सहायक आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण गंटावार म्हणाले, या संपूर्ण सर्र्व्हेेक्षणादरम्यान संपूर्ण नागरिकांची माहिती घेण्यात येणार आहे. आरोग्यविषयक प्रश्न विचारण्यात येणार आहे. नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यावी. आपल्या घरापर्यंत येणाºया प्रत्येक कर्मचाºयाकडे ओळखपत्र राहणार आहेत. त्यामुळे त्यांना सहकार्य करण्याचे आवाहन डॉ. गंटावार यांनी केले आहे.नागरिकांकडून माहिती घेतल्यानंतर, ज्या कुणाला आरोग्याचा काही त्रास जाणवत असेल त्यांनी अथवा त्यांच्या कुटुंबीयांना मनपाच्या नियंत्रण कक्षात फोन करून याबाबत माहिती द्यावयची आहे. कुणालाही दवाखान्यापर्र्यंत जाण्याची गरज नाही. नागरिकांनी माहिती दिल्यानंतर डॉक्टरांची चमू संबंधित घरापर्यंत जाईल आणि तेथे उपचार देईल. त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाचे पुढील आदेश येईपर्यंत घराबाहेर पडण्याची गरज नाही, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
नागपुरात घरोघरी होणार ‘कोरोना’ सर्व्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2020 11:12 AM
संपूर्ण नागपूर शहरात ‘कोरोना’ सर्व्हे होणार आहे.
ठळक मुद्देमनपा आयुक्तांचे निर्देश नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन