लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विदर्भात नागपूर, अकोला, वर्धा, सेवाग्रामनंतर आता अमरावतीमध्ये कोरोना चाचणीची परवानगी नागपूर येथील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेने (एम्स) दिली आहे. त्यामुळे चाचण्या अधिक गतीने होऊन करोनाचा संसर्ग वेळीच ओळखण्यास मदत होणार आहे. कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी ‘इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च’ने (आयसीएमआर) नागपूर ‘एम्स’ल ‘मेंटर इन्स्टिट्युशन’चा दर्जा दिला आहे. या अंतर्गत शासकीय, खासगी वैद्यकीय महाविद्यालयांना व आता विद्यापीठांनासुद्धा कोरोना चाचणीच्या प्रशिक्षणासोबतच प्रयोगशाळा सुरू करण्यात मदत करण्यापासून ते मंजुरी देण्याची जबाबदारी सोपवली आहे. त्यानुसार संत श्री गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या एमडी पॅथालॉजिस्टसह आणखी दोघांना कोरोना चाचणीचे प्रशिक्षण दिले. प्रशिक्षणानंतर एम्सने विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत प्रायोगिक स्तरावर नमुने तपासणीसाठी दिले. परंतु चुकीचा अहवाल दिला. एम्सच्या मार्गदर्शनानंतर दुसरा अहवाल बरोबर दिला. यामुळे २९ एप्रिल रोजी विद्यापीठाच्या प्रयोगशाळेला परवानगी देण्यात आली. ‘आयसीएमआर’ युसर आयडी व पासवर्ड उपलब्ध करून दिल्यानंतर अधिकृत तपासणीला सुरूवात होणार आहे. -आठ वैद्यकीय महाविद्यायांना लवकरच प्रशिक्षणएम्स’च्या संचालक मेजर जनरल डॉ. विभा दत्ता म्हणाल्या, अमरावती विद्यापीठाला कोरोना चाचणीची परवानगी देण्यात आली आहे. यवतमाळ मेडिकल मेडिकल कॉलेजच्या चमूला या संदर्भातील प्रशिक्षण देण्यात आले. लवकरच तिथेही चाचणी सुरू होईल. विदर्भासह इतर भागातील आठ वैद्यकीय महाविद्यालयात चाचणीसाठी आवश्यक यंत्रसामूग्री नाही. यामुळे त्यांना प्रशिक्षण देण्यात आलेले नाही. त्यांना यंत्र उपलब्ध होताच प्रशिक्षण दिले जाईल.-विदर्भातील प्रत्येक जिल्हात कोरोना चाचणी‘एम्स’मधील कोविड-१९ नोडल अधिकारी डॉ. मनीष श्रीगिरीवार म्हणाले, विदर्भातील प्रत्येक जिल्हात कोरोना चाचणी सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. चंद्रपूर, गडचिरोली व यवतमाळमध्ये यंत्र सामूग्री उपलब्ध करून देण्यासाठी त्या त्या संस्थेला मदत केली जात आहे.