लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रेल्वे रुग्णालयात रेल्वे कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात यावी, या मागणीसाठी स्वतंत्र रेल्वे बहुजन कर्मचारी युनियनने संविधान चौकात आंदोलन केले.मध्य रेल्वेच्या तसेच दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात अनेक अधिकारी आणि कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहेत. अनेक कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा बिकट परिस्थितीत कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून काम करीत आहेत. त्यामुळे रेल्वे रुग्णालयात कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करावी, रेल्वे रुग्णालयात आयसोलेशन वॉर्ड तयार करावा, पॉझिटिव्ह कर्मचाऱ्यांसाठी वेगळा वॉर्ड तयार करावा, रेल्वे रुग्णालय तसेच रेल्वेच्या प्रत्येक विभागात कर्मचाऱ्यांसाठी आॅक्सिमीटरची सुविधा उपलब्ध करून द्यावी, रेल्वे रुग्णालयात कर्मचाऱ्यांची गर्दी होऊ नये यासाठी लोकोशेड, रेल्वे क्वॉर्टर आणि प्रत्येक विभागात कोरोना चाचणी शिबिर आयोजित करण्यात यावे, पॉझिटिव्ह कर्मचाऱ्यांसाठी ऑनलाईन मार्गदर्शनाची व्यवस्था करावी, रेल्वे कर्मचाऱ्यांना ५० लाखाचा विमा द्यावा, रेल्वेने करार केलेल्या रुग्णालयात रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी खाटांची व्यवस्था करावी आदी मागण्या आंदोलनादरम्यान करण्यात आल्या. आंदोलनात स्वतंत्र रेल्वे बहुजन कर्मचारी युनियनचे राष्ट्रीय अध्यक्ष गौतम पाटील, महासचिव विकास गौर, कोषाध्यक्ष आनंद कांबळे, नीलेश वानखेडे, नरेंद्र पानतावणे आदींचा समावेश होता.
रेल्वे रुग्णालयात कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करा : आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2020 10:06 PM
रेल्वे रुग्णालयात रेल्वे कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात यावी, या मागणीसाठी स्वतंत्र रेल्वे बहुजन कर्मचारी युनियनने संविधान चौकात आंदोलन केले.
ठळक मुद्दे स्वतंत्र रेल्वे बहुजन कर्मचारी युनियन