लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विशेष मोहिमेंतर्गत हिंगणा व बुटीबोरी औद्योगिक वसाहतीतील ९०० उद्योगांची तपासणी करण्यात आली आहे. या तपासणीमध्ये ज्या उद्योगांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी उपाययोजनांची तंतोतंत अंमलबजावणी केलेली नाही अशा उद्योगांवर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिले आहेत. ९० अधिकाऱ्यांच्या पथकांनी तपासणी केली.कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये म्हणून आवश्यक त्या उपाययोजना व शासनाच्या निर्देशाचे पालन करण्याचे आवाहन उद्योजकांना करण्यात आले आहे. ही तपासणी मोहीम कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी होईस्तो सुरू राहणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव शहरी आणि ग्रामीण भागात होत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात चिंता वाढली आहे. हिंगणा आणि बुटीबोरी औद्योगिक वसाहत ग्रामीण भागात येतात. हिंगणा औद्योगिक वसाहतीतील तीन उद्योगातील कामगारांना कोविड-१९ ची लागण झाली आहे. त्याची जिल्हा प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व औद्योगिक वसाहतींमधील उद्योगांची तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार २० ते २४ जूनदरम्यान दोन्ही औद्योगिक वसाहतीतील उद्योगाची तपासणी करण्यात आली. उद्योगांमध्ये शासनाने निर्देश दिल्याप्रमाणे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी उपाययोजनांचे पालन होते किंवा नाही याबाबत तपासणी करण्याबाबत विशेष मोहीम हाती घेतली आहे.शासनाची निर्देशित नियमावली खालीलप्रमाणे :कामाचे ठिकाणी मास्क किंवा फेस कव्हर घालणेप्रवेशद्वार, सभेचे हॉल, मोकळी जागा, व्हरांडा, भिंती, यंत्रसामग्री, लिफ्ट, वॉशरूम, टॉयलेट, जेवणाची जागा इत्यादींचे दररोज निर्जंतुकीकरण करणेकामगाराचे तापमान मोजण्यासाठी थर्मल स्कॅनिंग सुविधा ठेवणेवारंवार हात धुण्याची व्यवस्था व सॅनिटायझरची सुविधागैरहजर असणाऱ्या कामगारांचा तपशील ठेवणेगैरहजर असल्यास त्याच्या कारणाचा तपशील ठेवणेसामाजिक अंतर पाळणेकामगारांच्या जेवणाच्या वेळा विभागून देणेलिफ्टचा २ ते ४ व्यक्तींकरिताच वापर करणेलिफ्टऐवजी पायऱ्यांचा वापर करणेतंबाखू, गुटखा याच्या वापरावर बंधन ठेवणे
Corona Virus : हिंगणा व बुटीबोरी औद्योगिक वसाहतीतील ९०० उद्योगांची तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2020 1:22 AM
विशेष मोहिमेंतर्गत हिंगणा व बुटीबोरी औद्योगिक वसाहतीतील ९०० उद्योगांची तपासणी करण्यात आली आहे. या तपासणीमध्ये ज्या उद्योगांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी उपाययोजनांची तंतोतंत अंमलबजावणी केलेली नाही अशा उद्योगांवर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिले आहेत. ९० अधिकाऱ्यांच्या पथकांनी तपासणी केली.
ठळक मुद्देनियमांची अंमलबजावणी न करणाऱ्यांवर कारवाईचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश : ९० अधिकाऱ्यांचे पथक