शहरं
Join us  
Trending Stories
1
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
2
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमानात
4
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
5
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
6
अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
7
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य
8
कर्नाटकच्या विरोधी पक्षनेत्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून HIV बाधित करण्याचा होता प्लॅन? पोलीस निरीक्षकाला अटक
9
महाराष्ट्रात योगी आदित्यनाथ यांनी खरंच बुलडोझरवर चढून प्रचार केला का? जाणून घ्या सत्य
10
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
11
Maharashtra Election 2024 Live Updates: अमित शाहांचा उद्धव ठाकरेंना सवाल; "खरी शिवसेना कधीही..."
12
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
13
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई
14
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
15
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींचं रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”: चेन्नीथला
16
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
17
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
18
Raamdeo Agrawal on Share Market : शेअर बाजारातील घसरणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल
19
Video: तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
20
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल

CoronaVirus in Nagpur : नागपुरात ३४० पॉझिटिव्ह, १७ रुग्णांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2020 11:07 PM

कोरोनाबाधित रुग्णांमध्ये ३० जुलै रोजी सर्वाधिक ३४२ रुग्णांची नोंद झाली होती, तर मंगळवारी पुन्हा रुग्णांची संख्या ३४०वर पोहचली. यातच मृत्यूसत्र सुरूच असून १७ मृतांची भर पडली.

ठळक मुद्देचार दिवसात ६३ मृतांची नोंद : ग्रामीणमधील १०५ तर शहरातील २३५ रुग्ण बाधित

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाबाधित रुग्णांमध्ये ३० जुलै रोजी सर्वाधिक ३४२ रुग्णांची नोंद झाली होती, तर मंगळवारी पुन्हा रुग्णांची संख्या ३४०वर पोहचली. यातच मृत्यूसत्र सुरूच असून १७ मृतांची भर पडली. रुग्णांची एकूण संख्या ६,४८३ तर मृतांची संख्या १८९ झाली आहे. वाढते रुग्ण व मृत्यूंमुळे आरोग्य यंत्रणेसोबतच सामान्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. आतापर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये ग्रामीणमधील २,०१० तर शहरातील ४,४७३ रुग्ण आहेत.नागपूर जिल्ह्यात गेल्या चार दिवसांत ६३ कोरोनाबाधित रुग्णांचे मृत्यू झाले. आतापर्यंतच्या चार दिवसांतील मृत्यूची ही सर्वाधिक संख्या आहे. इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) आज १० मृत्यूची नोंद झाली. यात अमरावती वरुड येथील ५५ वर्षीय पुरुष, इतवारी येथील ४५ वर्षीय पुरुष, पारडी येथील ६५वर्षीय महिला, सतरंजीपुरा येथील ५५वर्षीय महिला, चंदननगर येथील ८० वर्षीय महिला, पांढुर्णा येथील ३५ वर्षीय पुरुष, गोधनी रोड झिंगाबाई टाकळी येथील ५७ वर्षीय पुरुष, नारी रोड म्हाडा कॉलनी येथील ८० वर्षीय महिला, पाचपावली येथील ६५ वर्षीय महिला व पाचपावली येथील ५१ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. मेडिकलमध्ये पाच रुग्णांचे मृत्यू झाले. यात गोकुळपेठ येथील ८३ वर्षीय पुरुष, ओमकारनगर येथील ६९ वर्षीय पुरुष, चंद्रपूर येथील ५२वर्षीय महिला, अकोला येथील ५४ वर्षीय पुरुष तर कन्हान येथील ३४ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. उर्वरित दोन मृतांची माहिती जिल्हा शल्यचिकित्सा कार्यालयातून उपलब्ध झाली नाही. मृतांमध्ये ग्रामीणमधील दोन, तर शहरातील १५ असे एकूण १७ मृत्यू आहेत. यातील दोन मृत्यू जिल्ह्याबाहेरील आहेत.रॅपिड अ‍ॅन्टिजेन चाचणीतून ५२ पॉझिटिव्हजरीपटका वसाहतीत मंगळवारी रॅपिड अ‍ॅन्टिजेन चाचणी करण्यात आली. यात ५२ रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली. या शिवाय मेयोच्या प्रयोगशाळेतून ७१, मेडिकलच्या प्रयोगशाळेतून ७५, एम्सच्या प्रयोगशाळेतून ३६, नीरीच्या प्रयोगशाळेतून २१, माफसूच्या प्रयोगशाळेतून २४, खासगी लॅबमधून ६१ असे एकूण ३४० रुग्ण पॉझिटिव्ह आले. यात ग्रामीणमधील १०५ तर शहरातील २३५ रुग्णांचा समावेश आहे. १२० कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. बरे झालेल्यांची संख्या ३,८७४ आहे. सध्या २,४२० रुग्ण उपचार घेत आहेत.या वसाहतीत आढळून आले बाधित रुग्णमनपाच्या आरोग्य विभागाकडे सायंकाळी ५ वाजेपर्यंत नोंद झालेल्या बाधित रुग्णांमध्ये सिव्हिल लाईन्स १, इतवारी ५, गुलशननगर १, नारी रोड ११, डिप्टी सिग्नल २, पारडी ३, वर्धमाननगर १७, लालगंज ३, हसनबाग १, तांडापेठ ३, यशोधरानगर २, मानकापूर ३, छापरू नगर १, बिनाकी ले-आऊट ४, किनखेडे ले-आऊट भारतनगर १, जुनी मंगळवारी ३, झिंगाबार्ई टाकळी ५, टिमकी २, बेझनबाग १, नंदनवन ५, मेयो १, तेलंगखेडी १, मानेवाडा ४, पवननगर १, महाल ५, गरोबा मैदान १, गांधीनगर १, इंदोर चौक १, सदर ६, मिनिमातानगर १, यादवनगर १, खामला २, नरेंद्रनगर १, मेडिकल चौक १, जरीपटका ५२, जुना बगडगंज ३, गांधी पुतळा १, न्यू मनीषनगर १, काटोल रोड ३, सतनामी नगर ४, सिरसपेठ १, गायत्रीनगर २, रामदासपेठ १, लकडगंज २, नारा रोड ५, नेहरूनगर १, वर्धा रोड ३, दिघोरी २, प्रेमनगर १, शांतीनगर १, गड्डीगोदाम २, सेमिनरी हिल्स ३, सूर्यनगर १, धम्मदीप नगर १, शंकरनगर १, पांढराबोडी १, मेकोसाबाग २, कळमना १, वाठोडा ५, टेकानाका १, गोळीबार चौक २, गोरेवाडा ३, रामेश्वरी २, पाचपावली २, कुंजीलाल पेठ १, गणेशपेठ २, शेंडेनगर १, गंगाबाई घाट परिसर २, क्रिसेंट हॉस्पिटल १, सुभाष रोड १, गावंडे ले आऊट २, राणी दुर्गावती चौक २, सक्करदरा २, सुभेदार ले- आऊट २, काछीपुरा १, मध्यवर्ती कारागृह १, चंदननगर २, वैशालीनगर १, सोमलवाडा १, सुभाष पुतळा १, कमाल चौक १, लष्करीबाग १, धाबा १, पोलीस लाईन टाकळी २, गोकुळपेठ १, हुडकेश्वर १, मोमिनपुरा १, नालसाहाब चौकमधील १ रुग्णाचा समावेश आहे.दैनिक संशयित :३५२बाधित रुग्ण : ६,४८३बरे झालेले : ३,८७४उपचार घेत असलेले रुग्ण : २,४२०मृत्यू : १८९

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याnagpurनागपूर