लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिल्ह्यात सात दिवसात ५०० वर रुग्ण व आठ मृत्यू झाले आहेत. गेल्या चार महिन्यातील ही सर्वाधिक नोंंद आहे. गुरुवारी यात ७८ रुग्णांची भर पडली. रुग्णसंख्या २६४९ झाली आहे. विशेष म्हणजे, गेल्या चार दिवसापासून सुरू असलेले मृत्यूसत्र आज थांबले. मेयो, मेडिकल व एम्समधून ३४ रुग्ण बरे होऊन घरी परतल्याने बरे झालेल्यांची संख्या १६५४ झाली आहे. उपचाराखाली ९५५रुग्ण आहेत. कोरोनाचा विळखा दिवसागणिक घट्ट होत आहे. गेल्या सात दिवसात रुग्णांची संख्या ५० वर राहिली असून, मंगळवारी १४८ रुग्णांची नोंद झाली आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे वैद्यकीय क्षेत्रात चिंतेचे वातावरण आहे. आज मेयोने तपासलेल्या नमुन्यांमध्ये पाच, मेडिकलच्या प्रयोगशाळेत दोन, एम्सच्या प्रयोगशाळेत २३, नीरीच्या प्रयोगशाळेत १७, माफसूच्या प्रयोगशाळेत १०, खासगी लॅबमधून १६, रॅपिड अॅण्टीजन टेस्टमधून चार तर इतर प्रयोगशाळेतून एक असे ७८ रुग्ण पॉझिटिव्ह आले.सलून व्यावसायिक, अंगणवाडी सेविका, पोलिसही बाधितनागपूर ग्रामीणमध्ये हातपाय पसरलेल्या कोरोनाचे रुग्ण आता इतर व्यवसायात दिसून येऊ लागले आहेत. कळमेश्वर ब्राह्मणी येथील २४ वर्षीय सलून व्यावसायिक कोरोनाबाधित आढळला. मौद्यात अंगणवाडी सेविकेला कोरोनाची लागण झाली तर दोन रुग्ण पॉझिटिव्ह आले. कामठीत तीन रुग्ण पॉझिटिव्ह आले. यात एक जुनी कामठी पोलीस स्टेशनचा एक पोलीस कर्मचारी आहे. ग्रामीणमध्ये आतापर्यंत ४७९ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.मेयोत बंदिवानांचा वॉर्ड फुल्लइंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयातील (मेयो) कोविड हॉस्पिटलमध्ये राखीव ठेवण्यात आलेल्या २४ खाटांचा बंदिवानांचा वॉर्ड फुल्ल झाला. या सर्व रुग्णांना लक्षणे असल्याने त्यांना मध्यवर्ती कारागृहातील कोविड केअर सेंटरमध्ये पाठविण्यात आलेले नाही. आता यापुढील बंदिवानाना मेडिकलमध्ये भरती केले जाणार आहे.या वसाहतीत आढळून आले रुग्णकाटोल रोड १, मंगळवारी १, भांडे ले-आऊट १, मनीषनगर ३, झिंगाबाई टाकळी ५, यशोधरानगर १, वाठोडा १, विलासनगर जुना बाभुळखेडा १, जुनी सोमवारीपेठ १, मानेवाडा १, अजनी २, सूर्यनगर २, आहुजानगर जरीपटका ३, अयोध्यानगर १, सैफीनगर १, शिवशक्तीनगर १, रमाईनगर नारी १, म्हाळगीनगर ३, अष्टविनायक भक्ती अपार्टमेंट गोरेवाडा १, न्यू सुभेदार १, पाचपावली गोंड मोहल्ला १, सोमवारीपेठ १, मोमीनपुरा १ असे एकूण ३६ रुग्ण सायंकाळी ५ वाजेपर्यंत पॉझिटिव्ह आले.संशयित : २६२७बाधित रुग्ण : २६४९घरी सोडलेले : १६५४मृत्यू : ४०
CoronaVirus in Nagpur : नागपुरात पुन्हा ७८ पॉझिटिव्ह रुग्णांची भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2020 12:07 AM
जिल्ह्यात सात दिवसात ५०० वर रुग्ण व आठ मृत्यू झाले आहेत. गेल्या चार महिन्यातील ही सर्वाधिक नोंंद आहे. गुरुवारी यात ७८ रुग्णांची भर पडली. रुग्णसंख्या २६४९ झाली आहे.
ठळक मुद्देरुग्णसंख्या २६४९ : उपचाराखाली ९५५ रुग्ण