शहरं
Join us  
Trending Stories
1
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
3
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
4
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
5
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
6
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
7
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
8
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
10
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार
11
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
12
मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न निकाली काढणार; एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
13
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
14
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
15
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
16
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
17
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
18
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
19
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
20
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?

CoronaVirus in Nagpur : नागपुरात महिनाभरानंतर कोरोनाच्या मृत्यूसंख्येत घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2020 10:52 PM

Corona Virus, death , Nagpur news कोरोना रुग्णसंख्येचा वेग हजाराच्या दरम्यान असताना मृत्यूच्या संख्येत घट होताना दिसून येत आहे. ही एक समाधानाची बाब आहे. विशेष म्हणजे, मागील महिन्यात सर्वाधिक, ६४ रुग्णांच्या बळीची नोंद झाली. शुक्रवारी ही संख्या २८ वर आली.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना रुग्णसंख्येचा वेग हजाराच्या दरम्यान असताना मृत्यूच्या संख्येत घट होताना दिसून येत आहे. ही एक समाधानाची बाब आहे. विशेष म्हणजे, मागील महिन्यात सर्वाधिक, ६४ रुग्णांच्या बळीची नोंद झाली. शुक्रवारी ही संख्या २८ वर आली. तब्बल महिनाभरानंतर मृत्यूची संख्या कमी झाली. आज ९२५ नव्या रुग्णांची भर पडल्याने रुग्णसंख्या ७९,९६८ तर मृतांची संख्या २,५७४ वर पोहचली.जिल्ह्यात आज आरटीपीसीआरच्या ३,५३२ रुग्णांच्या चाचण्या तर रॅपिड अ‍ॅन्टिजेनच्या २,४१३ अशा एकूण ५,९४५ चाचण्या झाल्या. तज्ज्ञांच्या मते, रोज हजारावर रुग्णांची नोंद होत असताना किमान त्यांच्या संपर्कातील आठ संशयित रुग्णांच्या म्हणजे आठ हजार तपासण्या होणे आवश्यक आहे. आज पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये शहरातील ६३१, ग्रामीणमधील २९३ तर जिल्ह्याबाहेरील एका रुग्णाचा समावेश आहे. मृतांमध्ये शहरातील २२, ग्रामीणमधील पाच तर जिल्ह्याबाहेरील एक रुग्ण आहे. रोजच्या बाधितांच्या तुलनेत बरे झालेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. १,५१३ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले. कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ६५,१७७ वर पोहचली असून याचे प्रमाण ८१.५० टक्के आहे.५०२० रुग्ण निगेटिव्हआज एकूण झालेल्या चाचण्यांतून ५०२० रुग्ण निगेटिव्ह आले. यात अ‍ॅन्टिजेन चाचणीत २२७ रुग्ण पॉझिटिव्ह तर २,१८६ रुग्णांना कोरोना नसल्याचे निष्पन्न झाले. तसेच एम्सच्या प्रयोगशाळेतून ३८ पॉझिटिव्ह तर २६६ निगेटिव्ह, मेडिकलच्या प्रयोगशाळेतून १४ पॉझिटिव्ह तर ६४२ निगेटिव्ह, मेयोच्या प्रयोगशाळेतून १३१ पॉझिटिव्ह तर ६३७ निगेटिव्ह, माफसूच्या प्रयोगशाळेतून १९ पॉझिटिव्ह तर ७७ निगेटिव्ह, नीरीच्या प्रयोगशाळेतून ४७ पॉझिटिव्ह तर २२९ निगेटिव्ह, खासगी लॅबमधूनही २२७ पॉझिटिव्ह तर २,१८६ रुग्ण निगेटिव्ह आल्याची नोंद झाली.रुग्ण दुपटीचा दर ५३ दिवसांवरनागपूर जिल्ह्यातील रुग्ण दुप्पटीचा दर २० सप्टेंबर रोजी २१.३ दिवसांवर होता. २५ सप्टेंबर रोजी हाच दर २९.१ दिवसांवर तर आज तो ५३.६ दिवसांवर आला आहे. तज्ज्ञाच्या मते, मृत्यूच्या व काहीशी रुग्णसंख्येत घट दिसून येत असली तरी मास्कचा वापर, फिजिकल डिस्टन्सिंग, वारंवार सॅनिटायझेन व लक्षणे दिसताच चाचणी करणे आवश्यक आहे.कोरोनाची आजची स्थितीदैनिक संशयित : ५,९४५बाधित रुग्ण : ७९,९६८बरे झालेले : ६५,१७७उपचार घेत असलेले रुग्ण : १२,२१७मृत्यू : २,५७४

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यू