शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत 'लोकमत'च्या बातमीवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
4
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
5
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
6
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
7
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
8
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
10
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..
11
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
12
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
13
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
14
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
15
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
16
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
17
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
18
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
19
विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी शिक्षकांचे 'अपार' कष्ट; २५ टक्के नोंदणी अपूर्ण
20
शेती आणि शेतकरी - यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतून दोघेही हद्दपार!

CoronaVirus in Nagpur : नऊ वस्त्या कोरोनाच्या नवीन ‘हॉटस्पॉट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 11:04 PM

Corona's new 'hotspot', nagpur news चार दिवसांत १३९८ नव्या रुग्णांची भर पडल्याने आरोग्य विभागात खळबळ उडाली. यामुळे मागील सात दिवसांत पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांच्या वस्त्यांची माहिती घेतली असता नऊ वस्त्या कोरोनाच्या नवीन हॉटस्पॉट ठरल्याचे सामोर आले.

ठळक मुद्दे३१९ नवे रुग्ण, ४ मृत्यू खामला, स्वावलंबीनगर, जयताळा, अयोध्यानगर, न्यू बीडीपेठ, वाठोडा, दिघोरी, जरीपटका, जाफरनगरात वाढला धोका

लोकमत  न्यूज  नेटवर्क

नागपूर : चार दिवसांत १३९८ नव्या रुग्णांची भर पडल्याने आरोग्य विभागात खळबळ उडाली. यामुळे मागील सात दिवसांत पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांच्या वस्त्यांची माहिती घेतली असता नऊ वस्त्या कोरोनाच्या नवीन हॉटस्पॉट ठरल्याचे सामोर आले. याला मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी दुजोरा दिल्याने गंभीरता वाढली आहे. शुक्रवारी ३१९ नवे रुग्ण व ४ रुग्णांचे बळी गेले. रुग्णांची एकूण संख्या १३७८१४, तर मृतांची संख्या ४२१९ झाली.

कोरोनाच्या आणीबाणीच्या काळात सर्वाधिक रुग्णांची नोंद मनपाच्या गांधीबाग व सतरंजीपुरा झोनमध्ये झाली होती. मोमीनपुरा, तकीया, भानखेडा, टिमकी, हंसापुरी, कसाबपुरा, नाईक तलाव, बांग्लादेश व सतरंजीपुरा आदी वसाहती हॉटस्पॉट ठरल्या होत्या. ऑगस्ट महिन्यापासून तर नागपूरच्या सर्वच वसाहतींमधून रुग्ण आढळून येत असल्याने ‘हॉटस्पॉट’ मागे पडले. आता पुन्हा याची चर्चा होत आहे. मनपा प्रशासनानुसार खामला, स्वावलंबीनगर, जयताळा, अयोध्यानगर, न्यू बीडीपेठ, वाठोडा, दिघोरी, जरीपटका, जाफरनगरात मागील सात दिवसांत रुग्ण वाढले. येथील रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांची कोरोना चाचणी करण्याचे निर्देश मनपा आयुक्तांनी दिले आहे. वाढत असलेल्या रुग्णसंख्येला घेऊन गुरुवारी अधिकाऱ्यांची बैठक झाली, तर शुक्रवारी हॉटेल व्यावसायिक व व्यापाऱ्यांशी चर्चा करून कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांची कठोरतेने पालन करण्याचे निर्देश मनपा आयुक्तांनी दिले.

चाचण्यांची संख्या कमी, रुग्णसंख्येतही घट

गुरुवारी पाच हजारांवर चाचण्या झाल्याने रुग्णसंख्या वाढली होती. परंतु आज चाचण्यांची संख्या कमी होताच रुग्णसंख्येतही घट झाली. ४०२३ आरटीपीसीआर, ४८३ रॅपिड अँटिजेन असे एकूण ४५०६ चाचण्या झाल्या. यात आरटीपीसीआरमध्ये ३०३, तर अँटिजेनमधून १६ रुग्ण पॉझिटिव्ह आले. बाधितांमध्ये शहरातील २६८, ग्रामीणमधील ४९, तर जिल्हाबाहेरील २ रुग्णांचा समावेश आहे. मृतांमध्ये शहर व ग्रामीणमध्ये प्रत्येकी एक तर जिल्हाबाहेरील २ मृत्यू आहे. आज २२५ रुग्ण बरे झाले. कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या १,२९,९६१ झाली. सध्या ३,६३४ रुग्ण उपचाराखाली आहेत. यातील १०३९ रुग्ण रुग्णालयात, तर २,५९५ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहे.

कारागृहात पुन्हा सहा पॉझिटिव्ह

मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेला कुख्यात डॉन अरुण गवळीसह पाच बंदिवान पॉझिटिव्ह आल्याने बुधवारी खळबळ उडाली. गुरुवारी त्यांच्या संपर्कातील १५ संशयितांची तपासणी केली असता आज सहा रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. यात ५ बंदिवान, तर एक कारागृहातील कर्मचारी आहे. शनिवारी यांच्या प्रकृतीची तपासणी मेडिकलमध्ये केली जाणार असल्याची माहिती आहे.

तर दुकानदारांवर थेट कारवाई

दुकानांमध्ये होत असलेली गर्दी, मास्कचा होत नसलेला वापर व गायब झालेल्या सॅनिटायझरला मनपा आयुक्तांनी गंभीरतेने घेतले आहे. पोलीस प्रशासनाला सोबत घेऊन ‘न्यूसेंस डिटेक्शन स्क्वॉड’ ला (एनडीएस) थेट कारवाईचे निर्देश दिले.

भाजी, दूधविक्रेत्याची नियमित तपासणी

भाजी, दूधविक्रेत्यांसह, दुकानदार, घर कामगार दिवसभरात अनेकांच्या संपर्कात येतात. यामुळे खबरदारी म्हणून आरोग्य विभागाला यांची नियमित तपासणी करण्याचेही निर्देश देण्यात आले. जनावरांच्या गोठ्यांची तपासणीसाठी वेगळे पथक तयार करण्यात येणार असल्याचीही माहिती मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी दिली.

दैनिक चाचण्या : ४,५०६

बाधित रुग्ण : १,३७,८१४

बरे झालेले : १,२९,९६१

 उपचार घेत असलेले रुग्ण : ३,६३४

 मृत्यू : ४,२१९

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnagpurनागपूर